Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs -Current affair 2021 test Question paper-8

 • 18 जानेवारी 2021 रोजी झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाच्या 148 व्या सत्र बैठकीचे अध्यक्ष

      उत्तर :-   डॉ हर्ष वर्धन (केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, भारत सरकार).

 • 148 व्या WHO कार्यकारी मंडळ बैठकीत, वर्ष 2020 हे _____ म्हणून पाळण्याची घोषणा केली गेली

  उत्तर :-   ‘विज्ञान वर्ष’ (Year of Science).

 • 148 व्या WHO कार्यकारी मंडळ बैठकीत, वर्ष 2021 हे _____ म्हणून पाळण्याची घोषणा केली गेली

 उत्तर :-   ‘जागतिक ऐक्यभाव व उत्तरजीवित्व वर्ष’ (Year of Global Solidarity and Survival).

 • 25 जानेवारी ते 29 जानेवारी या काळात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘दावोस एजेंडा’ कार्यक्रमाची संकल्पना

उत्तर :-  “ए क्रूशियल इयर टू रीबिल्ड ट्रस्ट”.

Current affair November 2021 online test-7
Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8

 • 18 जानेवारी रोजी, भारत आणि ____ या देशांच्या सरकारांनी 14 उद्योग क्षेत्रांमध्ये कुशल भारतीय कामगारांच्या चळवळीला चालना देण्यासाठी सहकार करारावर स्वाक्षरी केली

उत्तर :-  जपान.

 • भारत सरकारने दरवर्षी 23 जानेवारी या दिवशी ____ यांची जयंती “पराक्रम दिवस” म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला

उत्तर :-  नेताजी सुभाषचंद्र बोस

 • ____ आणि इंडियन फार्म फॉरेस्ट्री डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFDC) या संस्थांनी आदिवासी उपजीविका निर्मितीसाठी एकत्र काम करण्याच्या हेतूने सामंजस्य करार केला

उत्तर :-  भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED)

 •  ‘प्रेस क्लब ऑफ बेंगळुरू’ यांच्यातर्फे देण्यात आलेल्या ‘प्रेस क्लब पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराचा विजेता

उत्तर :-  अझिम प्रेमजी (विप्रो लिमिटेड कंपनीचे ​​अध्यक्ष)

 • महाराष्ट्रातले 9 वे ‘खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स’ (KISCE)

उत्तर :-  शिव छत्रपती क्रिडा संकुल, पुणे

 • कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना मदत करण्यासाठी अधिकृत मनी चेंजरसाठी ‘इंस्टाएफएक्स / InstaFX’ नामक एक नवीन मोबाईल अॅप तयार करणारी बँक

उत्तर :-   ICICI बँक (अशी सुविधा देणारी देशातली पहिली बँक)

 • एकाच ठिकाणी 3.2 दशलक्ष सौर पटलांसह जगातला सर्वात मोठा सौर प्रकल्प

उत्तर :- स्वीहान (अबू धाबी, संयुक्त अरब अमिराती)

 • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण वर्षभर साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांची औपचारिक सुरुवात ____ रोजी होणार आहे

उत्तर :-   23 जानेवारी 2021.

 • 23 जानेवारी 2021 रोजी ____ येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजींच्या जीवन आणि कार्यावर आधारित कायमस्वरुपी प्रदर्शन व प्रोजेक्शन मॅपिंग प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे

उत्तर :-   कोलकाता.

 • ____ येथे नेताजींच्या जीवन आणि कार्यावर आधारित “आमरा न्युतोन जौंबोनेरी दूत” नामक एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे

उत्तर :-   कोलकाता.

 • केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय क्वांटंम कंप्युटिंग आधारित संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि नव्या शास्त्रीय शोधांना प्रोत्साहन देण्यासाठी ______ कंपनीच्या मदतीने देशात ‘क्वांटम कंप्युटिंग अॅप्लिकेशन प्रयोगशाळा’ उभारणार आहे

उत्तर :-   AWS (अॅमेझॉन वेब सर्विस).

 • _____ आणि संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO), संरक्षण मंत्रालय यांनी शाश्वत भू-जोखीम व्यवस्थापनासंबंधी तांत्रिक देवाणघेवाण आणि सहकार्याच्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करार केला

उत्तर :-  रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय.

 • रेल्वे मंत्रालयाने रेल्वे क्र. 12311/12312 ‘हावडा-कालका मेल’चे नामकरण “____” असे केले

उत्तर :-  नेताजी एक्सप्रेस.

 • 20 जानेवारी रोजी सौर ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि ____ यांच्यात सामंजस्य करार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली

उत्तर :-   उझबेकिस्तान.

 • 26 जानेवारी 2021 पासून लागू होणारी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालायची नवीन योजना

उत्तर :-   ‘MSME-सस्टेनेबल (ZED)’ योजना.

 • थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून ‘वीज अनुदान’ देणारे पहिले राज्य

उत्तर :-  मध्यप्रदेश.

 • ‘शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) कायदा-2020’; ‘शेतकऱ्यांचे (सबळीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा कायदा-2020’; आणि ‘अत्यावश्यक वस्तु (दुरुस्ती) कायदा-2020’ या तीन कायद्यांविषयीचा तंटा सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचे सदस्य

 उत्तर :-  भूसिंदर सिंग मान, अनिल घनवट, अशोक गुलाटी आणि प्रमोद कुमार जोशी.

 • 1 फेब्रुवारीपासून जीवन विमा महामंडळाचे (LIC) नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD)

उत्तर :-   सिद्धार्थ मोहंती.

 • आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या अपघातानंतर, या व्यक्तीकडे आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला

उत्तर :-   किरेन रिजिजू (युवा कल्याण व क्रिडा मंत्री).

 • प्रथम भारतीय सरकारी कर्मचारी, नागरी सेवक आणि सशस्त्र सेना व निमलष्करी दलामध्ये काम पाहिलेले संरक्षण सेवा अधिकारी ज्यांची ‘आयर्न मॅन’ किताब जिंकल्यानंतर ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली

उत्तर :-   IPS अधिकारी कृष्णा प्रकाश.

 • कीलुवा-कोना (हवाई, अमेरिका) येथे ‘वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन’ यांच्यावतीने आयोजित केली जाणारी एकदिवसीय स्पर्धा, ज्यामध्ये ट्रायथलॉनमध्ये भाग घेणाऱ्यांना केवळ 16 ते 17 तासांच्या निर्धारित वेळेत 3.8 किलोमीटर अंतर पाण्यात पोहून, 180.2 किलोमीटर अंतर सायकल चालवित आणि 42.2 किलोमीटर अंतर धावून कापावे लागते

उत्तर :-   आयर्नमॅन ट्रायथलॉन.

About Sayli Bhokre

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-15

Current affair November 2021 online test-15-Current affair 2021 test Question paper-15-Current affair test Question paper …

Contact Us / Leave a Reply