PSI/STI/ASO Combine Test No. 07

PSI/STI/ASO Combine Test No. 07, combine online mock tests.

सूचना

  • सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत  सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
  • आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
  • वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
  • अ)  या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
  • ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
  • सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
  • उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
  • प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 07
PSI/STI/ASO Combine Test No. 07

PSI/STI/ASO Combine Test No. 07

51) पुढील प्रश्नात आकृत्यांचा संच दिलेला आहे. त्यापैकि एक आकृती सोडून इतर सर्व आकृत्या विशिष्ट बाबतीत समान आहेत. अशी इतरांपेक्षा वेगळी (विसंगत) असणारी आकृती शोधून काढा.

(A) (B) (C) (D)

1) B 2) D

3) C 4) A

उत्तर : 3) C
स्पष्टीकरण :
वर दिलेल्या आकृती मध्ये आकृती C वेगळी आहे. कारण, इतर आकृतींमध्ये इंग्रजी वर्णमालेतील अक्ष्ररे दोन वेळा आलेली आहेत. पर्याय 3 इतरांपेक्षा वेगळी (विसंगत) असणारी आकृती आहे.

52)
अ) माझी स्थापना 1 जुलै, 1948 रोजी झाली.
ब) मी देशातील पहिली विकास बँक होय.
क) माझे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
ड) मध्यम व मोठ्या उद्योगांना वित्तीय तसेच बिगर – वित्तीय साहाय्य हे माझे कार्य आहे.
बरोबर विधानांचा विचार करून योग्य पर्याय ओळखा.

1) भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ (ICICI)
2) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ (IFCI)
3) भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI)
4) भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँक मर्यादित (IIBI)

उत्तर : 2) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ (IFCI)
स्पष्टीकरण :भारतीय औद्योगिक वित्त निगम : खाजगी क्षेत्रातील मोठ्या उद्योगांना दीर्घ मुदतीचा अर्थप्रबंध करण्यासाठी १९४८ साली स्थापन करण्यात आलेला निगम. देशातील अशा प्रकाची ही पहिली औद्योगिक विकास बँक होय. ह्या निगमाचे प्रारंभीचे अधिकृत भांडवल १० कोटी रुपये निर्धारित करण्यात आले. (आता ते २० कोटी रु. आहे). निगमाचे भागभांडवल भारतीय औद्योगिक विकास बँक, भारतीय आयुर्विमा निगम, अनुसूचित बँका व सहकारी बँका यांच्यामध्ये विभागलेले आहे.
निगमाला आपले व्यवहार चालविण्यासाठी २० कोटी रुपयांच्या भांडवलाशिवाय पुढील मार्गांनी पैसा उभारता येतो : २५ वर्षांच्या कालावधीपर्यंतचे रोखे व ऋणपत्रे विक्रीस काढता येतात. निगमाने विक्रीस काढलेल्या रोख्यांच्या मुद्दलाच्या वा व्याजाच्या रकमेची जिम्मेदारी भारत सरकारने दिलेली असते. केंद्र सरकारकडून कर्जे काढता येतात. परदेशांतून कर्जे उभारण्याचा अधिकार निगमाला देण्यात आला आहे. कर्जांच्या रकमांची जिम्मेदारी भारत सरार स्वीकारते. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अल्प (९० दिवस) व मध्यम (१८ महिने) मुदतीची तीन कोटी रुपयांपर्यंतची कर्जे निगमाला मिळू शकतात. निगमाने अतिशय आवश्यक होतील तेव्हाच व अत्यंत अल्परकमेची अशी कर्जे काढली आहेत. निगमाला लोकांकडून मुदतीच्या ठेवींच्या रूपाने पैसा उभारता येतो, परंतु आतापर्यंत निगमाने अशा ठेवी स्वीकारल्या नाहीत. संचित निधी.

भारतीय औद्योगिक वित्त निगमाला पुढीलपैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करून उद्योग-व्यवसायांना अर्थप्रबंध करता येतो – देशी किंवा परदेशी चलनांत कर्जे देणे. उद्योग-व्यवसायांचे रोखे, समभाग व अधिमान भाग व भांडवल विकत घेणे. उद्योग-व्यवसायांनी विग्रीस काढलेल्या रोख्यांच्या विक्रीची हमी देणे. उद्योग-व्यवसायांनी परदेशांतून आयात केलेल्या यंत्रसामग्रीच्या किंमतीबाबत हमी देणे. उद्योग-व्यवसायांनी खुल्या बाजारांत उभारलेल्या कर्जाची जिम्मेदारी स्वीकारणे आणि परदेशांतून मिळविलेल्या कर्जाची जिम्मेदारी स्वीकारणे.

53) पुढीलपैकी कोणत्या देशाचा मानव विकास निर्देशांक सर्वांत कमी आहे. (HDR-2014)
1) सौदी अरेबिया 2) नायजेरिया
3) उत्तर कोरीया 4) सिमुरा लिओन

उत्तर : 2) नायजेरिया
स्पष्टीकरण :
मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात. इ.स. 1990 साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते. 1990 पहिल्या मानवी विकास अहवालात मानवी कल्याणासाठी प्रगती करण्याचा एक नवीन दृष्टीकोन सादर केला. 1990 मध्ये पहिला मानवी विकास अहवाल प्रकाशित करण्यात आला.

54) दादाभाई नौरोजींच्या मते 1868 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न किती होते ?
1) ₹ 15 2) ₹ 20
3) ₹ 25 4) ₹ 30

उत्तर : 2) ₹ 20
स्पष्टीकरण :
वार्षिक दरडोई उत्पन्न हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात ( देश, प्रदेश, राज्य) राहण्याऱ्या प्रति व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पादनाचे मोजमाप करते. हे मोजमाप त्या क्षेत्राचे एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांचा भागाकर करून काढले जाते. देशाचे दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न व एकूण लोखसंख्या यांची सरासरी करून काढले जाते. तसेच प्रत्येक राज्याचे तेथील एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांची सरासरी करून एखाद्या राज्याचे दारडोई उत्पन काढले जाते.

55)
अ) आठव्या योजनेचा कालावधी 1 एप्रिल, 1992 ते 31 मार्च, 1997
ब) मुख्यभर – मानव विकास किंवा मनुष्यबळ विकास
क) आठव्या योजनेपासून सरकारने पुर्णपणे ‘सूचक नियोजन’ चा अवलंब केला.
1) फक्त ‘अ’ आणि ‘ब’ बरोबर 2) फक्त ‘क’ बरोबर
3) ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ बरोबर 4) फक्त ‘अ’ बरोबर

उत्तर : 3) ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ बरोबर
स्पष्टीकरण :
1989–91 हा भारतातील आर्थिक अस्थिरतेचा काळ होता आणि म्हणूनच पंचवार्षिक योजना लागू केली गेली नव्हती. 1990 ते 1992 च्या दरम्यान फक्त वार्षिक योजना होती. 1991 मध्ये, भारताला परकीय चलन (विदेशी मुद्रा) साठ्यात एक संकटाचा सामना करावा लागला, तेव्हा फक्त 1 अब्ज अमेरिकी डॉलरचा साठा शिल्लक होता. अशाप्रकारे, दबावाखाली येऊन देशाने समाजवादी अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याचा धोका पत्करला. पी.व्ही.नरसिंहराव हे भारतीय प्रजासत्ताकाचे नववे पंतप्रधान आणि कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख होते आणि त्यांनी भारताच्या आधुनिक इतिहासामधील सर्वात महत्वाच्या कारभाराचे नेतृत्व केले, एका महत्त्वपूर्ण आर्थिक परिवर्तनाची आणि राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणारे अनेक घटनांचे निरीक्षण केले. त्यावेळी डॉ.मनमोहन सिंग (नंतर भारताचे पंतप्रधान) यांनी भारतातील मुक्त बाजार सुधारणेची सुरूवात केली ज्यामुळे जवळजवळ दिवाळखोर देशाला काठावरुन आणले. ही भारतात उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण (एलपीजी) ची सुरुवात होती. उद्योगांचे आधुनिकीकरण हे आठव्या योजनेचे प्रमुख आकर्षण होते. या योजनेंतर्गत वाढती तूट आणि परकीय कर्ज सुधारण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची हळूहळू सुरुवात केली गेली. दरम्यान, 1 जानेवारी 1995 रोजी भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, दारिद्र्य कमी करणे, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा मजबूत करणे, संस्थागत इमारत, पर्यटन व्यवस्थापन, मानव संसाधन विकास, पंचायती राजांचा सहभाग,नगर पालिका, स्वयंसेवी संस्था, विकेंद्रीकरण आणि लोकांचा सहभाग. खर्चाच्या 26.6% क्षेत्रासह उर्जेला प्राधान्य दिले गेले. उद्दिष्टाचा वाढीचा दर 5.6% होता आणि वास्तविक विकास दर 6.8% होता. वर्षाकाठी सरासरी 5.6% चे लक्ष्य गाठण्यासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 23.2% गुंतवणूकीची आवश्यकता होती. वाढीव भांडवलाचे प्रमाण 4.1 आहे. गुंतवणूकीची बचत देशांतर्गत स्त्रोतांकडून व परकीय स्त्रोतांकडून होते, एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या 21.6% आणि सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 1.6% परकीय बचतीचा दर.

56) महात्मा गांधींबद्दल खालील विधानांचा अभ्यास करून योग्य विधाने निवडा.
विधान – (अ) : असहयोग आंदोलनाच्या स्थगितीमुळे सन 1924 च्या बेळगाव अधिवेशनात कॉंग्रेस – लीग विभक्त
विधान – (ब) : सन 1924 च्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून गांधीजींची निवड झाली होती.
1) विधान ‘ब’ बरोबर, मात्र ‘अ’ चूक 2) विधान ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चूक
3) विधान ‘अ’ बरोबर, मात्र ‘ब’ चूक 4) दोन्ही विधाने बरोबर आहेत.

उत्तर : 4) दोन्ही विधाने बरोबर आहेत
स्पष्टीकरण :
मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर 2, इ.स. 1869 – जानेवारी 30, इ.स. 1948) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत तसेच त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. 1944 मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. इ.स. 1915 मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. इ.स. 1921 मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधी आजीवन साम्प्रदायीकातावादाचे (सम्प्रदायांवर राजकारण करणे) विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.

इ.स. 1930 मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे 400 कि.मी. (250 मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. इ.स. 1942 मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

57) सन 1946 च्या त्रिमंत्री योजनेत खालीलपैकी कोणत्या मुद्यांच्या समावेश होता ?
अ) ब्रिटिश प्रांत व संस्थाने मिळून एक संघराज्य निर्माण व्हावे.
ब) धार्मिक मुद्यांवर बहुमताद्वारे निर्णय घेण्यात यावा.
क) प्रांताचे ‘अ’, ‘ब’, ‘क’ या तीन गटांत विभाजन करावे.
ड) प्रांत व संस्थानांना लोकसंख्येच्या आधारे प्रतिनिधित्व द्यावे.
1) ‘अ’ व ‘ब’ 2) ‘ब’ व ‘ड’
3) ‘अ’ व ‘ड’ 4) वरील सर्व

उत्तर : 4) वरील सर्व
स्पष्टीकरण :
मार्च 1946 मध्ये इंग्लंड चे त्रिमंत्री मंडळ भारतात आले. र्लॉड पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स व अलेक्झांडर हे या मंडळाचे सदस्य होते. भारताबाबतची इंग्लंडची योजना त्यांनी भारतीय नेत्यांपुढे मांडली. तिला ‘त्रिमंत्री योजना’ असे म्हणतात. ब्रिटिशांच्या शासना खालील प्रांत व संस्थाने यांचे मिळून भारतीय संघराज्य स्थापन केले जावे, या संघराज्याचे संविधान भारतीयांनीच तयार करावे, हे संविधान तयार होईपर्यंत भारताचा राज्यकारभार व्हाइसरॉयच्या सल्ल्याने भारतीयांच्या हंगामी सरकारने करावा असे या योजनेचे स्वरूप होते. या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मंजूर नव्हत्या. तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही म्हणून लीगही असंतुष्ट होती. यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णत: मान्य झाली नाही.

58) खालील विधानांचा योग्य अभ्यास करून अचूक विधाने निवडा.
विधान – (अ) : खासगी शैक्षणिक संस्थेत आरक्षणाची तरतूद करण्याचा राज्यसंस्थेला अधिकार
विधान – (ब) : अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आरक्षणासाठी अपवाद असतात.
1) विधान ‘अ’ बरोबर ‘ब’ चूक 2) विधान ‘ब’ बरोबर ‘अ’ चूक
3) दोन्ही विधाने चूक 4) दोन्ही विधाने बरोबर

उत्तर : 4) दोन्ही विधाने बरोबर
स्पष्टीकरण :
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी 75%.आर्थिक दृष्टीने मागासवर्ग 10% EWS आरक्षण आहे. नोव्हेंबर-डिसेंबर इ.स. 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 32% असलेल्या मराठा समाजाला 13% आरक्षण दिले आहे, तत्पूर्वी राज्यात 52% आरक्षण होते. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासकीय नोकऱ्यात अनाथ व्यक्तिंसाठी 1% आरक्षण लागू केले आहे.

59) इंदिरा आवास योजनेबाबत खालील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
विधान – (अ) : या योजनेतील लाभार्थी निवड ग्रामसभेमार्फत होते.
विधान – (ब) : या योजनेनुसार घर बांधण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.
1) विधान ‘अ’ बरोबर ‘ब’ चूक 2) दोन्ही विधाने बरोबर
3) विधाने ‘ब’ बरोबर ‘अ’ चूक 4) दोन्ही विधाने चूक

उत्तर : 1) विधान ‘अ’ बरोबर ‘ब’ चूक
स्पष्टीकरण :
इंदिरा आवास योजना 1989 पासून डिसेंबर, 1995 अखेरपर्यंत जवाहर रोजगार योजनेची उपयोजना म्हणून राबविली जात होती. त्यानंतर दि.1.1.1996 पासून ही योजना स्वतंत्रपणे केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यात येत आहे. या योजनेच्या निधीच्या उपलब्धतेची पध्दत 75:25 प्रमाणे आहे. (75% केंद्र शासन आणि 25% राज्यशासन). या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर / कच्चे घर असलेल्या कुटूंबांसाठी घरकुल बांधणीसाठी अनुदान देण्यात येते. सदर योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तिचे नांव ग्रामसभेने मंजूर केलेल्या बेघर कुटूंबाच्या प्रतिक्षा यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सदर योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार उपलब्ध निधीच्या 40 टक्के निधी बिगर अनुसूचित जाती / जमातीसाठी राखून ठेवण्यात येतो. अनुसूचित जाती / जमातीसाठी 60 टक्के निधी आरक्षित ठेवला जातो. अपंगांसाठी 3 टक्के आरक्षण ठेवण्यात येते. हे आरक्षण समस्तर असे असते. सन 2007-08 पासून अल्पसंख्यांकांसाठी 15 टक्के आरक्षण ठेवण्यात येत आहे. दरवर्षी घरकुलांचे उद्दिष्ट केंद्र शासनाव्दारे निश्चित करण्यात येते. तसेच जिल्हा निहाय घरकुलांचे वाटप केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून जिल्हयांना परस्पर करण्यात येते. त्यामध्ये राज्याला बदल करता येत नाही. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने इंदिरा आवास योजनेतील घरकुलांबाबतची कार्यवाही प्रकल्प संचालक, संबंधित जिल्हा यंत्रणा यांचेमार्फत पूर्ण करण्यात येते. दिनांक 1 एप्रिल, 2013 पासून केंद्र शासनाने दर्जेदार घरे बांधण्याकरिता प्रति घरकूल रू.70,000/- इतकी सुधारित किंमत निर्धारित केली आहे. राज्य शासनाने प्रति घरकुल राज्य अतिरिक्त हिस्सा रू.25,000/- एवढा निश्चित केला असल्याने राज्यातील प्रति घरकुलाची किंमत रू.1,00,000/- इतकी निश्चित करण्यात आलेली आहे.

60) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचा पुढीलपैकी कोणता उद्देश नाही ?
1) आंतरराष्ट्रीय नाणे सहकार्याला प्रोत्साहन देणे.
2) आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विस्तारासाठी आणि समतोल वृद्धीसाठी मदत करणे.
3) विनिमय स्थिरतेला प्रोत्साहन देणे.
4) सर्व पर्याय अयोग्य

उत्तर : 4) सर्व पर्याय अयोग्य
स्पष्टीकरण :
संपूर्ण जगात इ.स. 1929 साली मंदीची लाट पसरली होती. त्यानंतर इ.स. 1931 मध्ये इंग्लंडने सुवर्णचलन बंद केले. पुन्हा नंतर यात दुसऱ्या महायुद्धाचीही भर पडली. या तिन्ही घटनांचे विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर, चलनात्मक धोरणावर व आंतरराष्ट्रीय व्यापारावर विपरीत परिणाम घडून आले. अनेक देशांनी आपापले चलनविषयक वेगवेगळे धोरण सुरू केले. यामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यापार अडचणीत आला. अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन लॉर्ड जे. एम. केन्स याने आंतरराष्ट्रीय सलोखा प्रस्थापित होण्यासाठी एक योजना सादर केली. या योजनेवर विचार करण्याससाठी अमेरिकेतील ब्रेटनवूड येथे जुलै इ.स. 1944 मध्ये एक परिषद बोलाविण्यात आली. या परिषदेला 44 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) व आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण व विकास बॅंक (जागतिक बॅंक) स्थापण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर, इ.स. १९४५ रोजी झाली व प्रत्यक्ष कामकाज १ मार्च, इ.स. १९४७ रोजी सुरू झाले.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणारा पहिला देश फ्रान्स होता, हळूहळू आंतरराष्टीय नाणेनिधीची सदस्यसंख्या वाढून 189 झाली आहे. जे जागतिक बॅंकेचे सदस्य असतात ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचेही सदस्य असतात, 12 एप्रिल 2016 ला ‘ नौरू प्रजासत्ताक ‘ या देशाला सदस्यत्व मिळाल्यामुळे आंतरराष्टीय नाणेनिधीची सदस्यसंख्या 189 झाली आहे.

61) खालील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
कथन : जर रेफ्रीजरेटरच्या फ्रीजरमध्ये बर्फाचा थर जमा झाला तर शितकरण प्रक्रिया व्यवस्थित पार पडत नाही
कारण : बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहे.
1) कथन व कारण बरोबर, मात्र कारण बरोबर, मात्र कारण योग्य स्पष्टीकरण देत नाही.
2) कथन बरोबर, कारण चूक
3) कथन चूक, कारण बरोबर
4) कथन व कारण बरोबर असून कारण योग्य स्पष्टीकरण देते.

उत्तर : 4) कथन व कारण बरोबर असून कारण योग्य स्पष्टीकरण देते.
स्पष्टीकरण :
पाण्याच्या घनरुप अवस्थेला बर्फ असे म्हणतात. बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक असतो.

62) अमिबाबाबत खालील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
विधान – (अ) : पूर्ण वाढ झालेल्या अमिबामध्ये प्रजननास सुरुवात होते.
विधान – (ब) : अमिबामध्ये अलैंगिक प्रजनन होते.
1) दोन्ही विधाने चूक 2) विधाने ‘अ’ बरोबर, ‘ब’ चूक
3) विधाने ‘ब’ बरोबर, ‘अ’ चूक 4) दोन्ही विधाने बरोबर

उत्तर : 4) दोन्ही विधाने बरोबर
स्पष्टीकरण :
आदिजीव (प्रोटोझोआ) संघातील र्‍हायझोपोडा या वर्गातील अगदी साधी शरीररचना असणारा अमीबा हा प्राणी आहे.
अमीबा प्रजातीच्या अनेक जाती असून त्या खार्‍या व गोड्या पाण्यात आणि दमट व ओलसर जमिनीत राहतात. अमीबा प्रोटिअस ही जाती सार्वत्रिक आहे. अमीबाच्या शरीराचा आकार सतत बदलत असतो. ग्रीक पुराणानुसार प्रोटिअस या समुद्रदेवतेकडे आकार बदलण्याची क्षमता होती. यावरून सतत आकार बदलू शकणार्‍या या प्राण्याला अमीबा प्रोटिअस असे नाव दिले गेले आहे. अमीबाच्या बहुतेक जाती सूक्ष्म (लांबीला साधारण 20 मायक्रॉन) असून काही नुसत्या डोळ्यांनी (0.25 मिमी.) दिसू शकतात. याचे शरीर एकाच पेशीचे असते. ते पातळ, लवचिक, पापुद्र्यासारख्या जीवद्रव्यपटलाने आच्छादलेले असते. या पटलाच्या आत जीवद्रव्य असून त्याचे बहिर्द्रव्य आणि अंतर्द्रव्य असे थर असतात. कोणत्याही प्रकारचे कण नसलेल्या स्वच्छ थराला बहिर्द्रव्य म्हणतात आणि कणमय असणार्‍या वाकीच्या सर्व भागाला अंतर्द्रव्य म्हणतात. अंतर्द्रव्यात गोलसर केंद्रक आणि एक किंवा दोन संकोचशील रिक्तिका असतात. सूक्ष्मजीव, डायाटम व जैव पदार्थांचे कण हे अमीबाचे अन्न होय. शरीरापासून निघालेल्या बोटांसारख्या व आकाराने मोठ्या होऊ शकणार्‍या अंगकाने अन्न अथवा भक्ष्य वेढून ते जीवद्रव्यात घेतले जाते. भक्ष्याभोवती पाण्याचा पातळसा थर असतो. याला अन्नरिक्तिका म्हणतात. त्यात अन्नाचे पचन होते. या बोटासारख्या अंगकांना छद्मपाद, असत्पाद वा धाकलेपाय असेही म्हणतात. हे पाय तात्पुरते असून काम झाले की, परत आत घेता येतात. हे पाय वापरून अमीबा पाण्याच्या तळालगत रांगत चालतो. चालताना फक्त याची टोके टेकलेली असतात. अमीबा ज्या पाण्यात राहतो, त्यात विरघळलेला ऑक्सिजन जीवद्रव्य पटलातून विसरणाने जीवद्रव्यात जातो आणि आत उत्पन्न होणारा कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर पडतो. चयापचयामुळे उत्पन्न होणारे यूरियासारखे टाकाऊ पदार्थ जीवद्रव्य पटलातून बाहेर पडतात. शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण तसेच उत्सर्जन ही कार्ये संकोचशील रिक्तिकेद्वारे होतात.

63) बाली परिषदेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता ?
विधान – (अ) : सन 2020 पर्यंत हरित वायूंचे उत्सर्जन 25 ते 40 टक्के कमी करणे.
विधान – (ब) : सन 2050 पर्यंत हरित वायूंचे उत्सर्जन 50% कमी करणे.
1) फक्त विधान ‘अ’ बरोबर 2) फक्त विधान ‘ब’ बरोबर
3) विधान ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर 4) विधान ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चूक

उत्तर : 3) विधान ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर
स्पष्टीकरण :
3-14 डिसेंबर 2007 साली UNFCCC अंतर्गत बाली (इंडोनेशिया) परिषद पार पडली. त्यात हरितगृह वायुंमुळे निर्माण होणाऱ्या जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्यावरील उपाययोजनांवर व्यापक चर्चा करण्यात आली. या परिषदेचे नाव UNFCCC Conference of Parties-13 असे होते.

2005 – कोपेनहेगन परिषद – डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे 7 ते 18 डिसेंबर, 2009 दरम्यान UNFCCC ची 15 वी परिषद (Conference of Parties-15) पार पडली. 2005 पासून अंमल सुरू झालेल्या हवामान बदलावरील क्योटो कराराचा कार्यक्रम 2012 मध्ये संपुष्टात येणार आहे. त्याच्या जागेवर एका नवीन करारास अंतिम रूप देण्यासाठी ही परिषद घेण्यात आली होती. मात्र, विकसित व विकसनशील देशांमधील मतभेदांमुळे कार्बन डायॉक्साईडच्या उत्सर्जनावर निश्चित बंधने घातला जाणारा अंतिम करार संमत होऊ शकला नाही.

64) स्वातंत्र्य चळवळीतील पुढील घटना योग्य कालानुरुप लावा.
अ) पाकिस्तान दिवस साजरा ब) अॅटली घोषणा
क) नेहरूंच्या अध्यक्षतेखाली सरकारचे संघटन ड) मुस्लीम लीगच्या प्रत्यक्ष कार्यवाही दिवस
1) ‘अ’ – ‘ब’ – ‘ड’ – ‘क’ 2) ‘अ’ – ‘ड’ – ‘क’ – ‘ब’
3) ‘ब’ – ‘क’ – ‘ड’ – ‘अ’ 4) ‘अ’ – ‘ड’ – ‘ब’ – ‘क’

उत्तर : 2) ‘अ’ – ‘ड’ – ‘क’ – ‘ब’
स्पष्टीकरण :
इ.स.1942 साली तत्कालीन नॅशनल कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ब्रिटिशांकडे भारताच्या स्वातंत्र्याची जोरदार मागणी करायला सुरुवात केली. छोडो भारत असे या आंदोलनाचे नाव होते. यामध्ये संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणावर उत्सफूरतपणे लोकांनी सहभाग नोंदविला. भारतीयांचा संघर्ष ब्रिटिश सत्ता दडपून शकली नाही आणि क्रांतीकारकांच्या ब्लिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिहने दिसू लागली. गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले.

प्रत्यक्ष कृती दिन (1 ऑगस्ट 1946), ज्याला कलकत्ता किलिंग्ज म्हणून ओळखले जाते, हा कलकत्ता शहरात मुस्लिम आणि हिंदू यांच्यात व्यापक जातीय दंगलीचा दिवस होता. बंगाल ब्रिटिश भारत प्रांतात आता कोलकाता म्हणून ओळखले जाते. त्या दिवसाला वीक ऑफ द लाँग नाइव्हज म्हणून ओळखल्या जाणार्‍या दिवसाची सुरुवात देखील झाली.

दुसऱ्या महायुद्धानंतर सन 1945 मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर क्लमेंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरूवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च 1947 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर क्लमेंट अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार 24 मार्च, 1946 रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय कॉंग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.

65) घटना समिती ही ‘हिंदूंची संस्था’ होती अशी टीका पुढीलपैकी कोणी केली होती ?
1) लॉर्ड सायमन 2) मुहम्मद अली जीना
3) सर अब्बास अली 4) राजा रामनंदी

उत्तर : 1) लॉर्ड सायमन
स्पष्टीकरण :
इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन ऊर्फ सायमन कमिशन हे 1927 साली ब्रिटिश भारताच्या वसाहतींत घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसदसदस्यांचा आयोग होता. या आयोगाची निर्मीती 1919 या कायद्याप्रमाणे झाली, या कायद्यानुसार दर दहा वर्षांनी रॉयल कमिशनच्या नेमणुकीची तरतुद होती. 1919 च्या कायद्याने कोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांना नवीन योजना जाहीर करण्यासाठी सायमन कमिशनची नियूक्ती केली. या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांच्या आडनावावरून बऱ्याचदा या आयोगास सायमन कमिशन असे उल्लेखले जाते. या आयोगाच्या भारतातील आगमनापासून त्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आयोगाविरोधातील निदर्शनांपैकी लाहोरातील एका निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले व त्यातून त्यांचा मृत्यू झाला.

66) भारतात काही प्रदेशांमध्ये सरकारद्वारा ‘केशरी डाळी’ वर प्रतिबंध आणला गेला आहे. खालीलपैकी कोणत्या याचा परिणाम दिसून आला होता ?
1) डोळे 2) दोन्ही पाय
3) कमरेखालील सर्व अवयव 4) मेंदू

उत्तर : 3) कमरेखालील सर्व अवयव
स्पष्टीकरण :
या आजारात केसरी डाळीतल्या एका विशिष्ट अमिनोअ‍ॅसिडमुळे आपल्या पायांकडे जे मेंदूकडून जाणारे पिरॅमिडल ट्रॅक असतात (पायांच्या हालचालींकरिता) ते मरण पावून पायामध्ये अपंगत्व येते. पाय हळूहळू शक्तिहीन तसेच कडक होत जातात.(याला वैद्यकीय भाषेत अप्पर मोटार न्यूरॉन साईन्स असे म्हणतात.) अशा दोन्ही पाय शक्तीहीन आणि कडक होण्याच्या आजाराला स्पास्टिक पॅराप्लेजिया म्हणतात. या डाळीत एक प्रकारचे अमिनो अ‍ॅसिड असते. B-n-oxalyl-L-a B diaminopropionic acid नावाचे. (आम्ही शिकताना याला BOAA असे संक्षिप्त रूप होते. आता B-ODAP हे रूप वापरतात. तर हे अमिनो अ‍ॅसिड ही डाळ खाणार्‍याच्या आतड्यांतून शोषून रक्तात मिसळल्यावर तिथून स्पायनल कॉर्डसच्या पायाला हालचालींचे सिग्नल देणार्‍या मज्जातंतूंकडे म्हणजे पिरॅमिडल ट्रॅक्सकडे जात होते. काही वेळा तिथून मेंदूमध्ये जे पिरॅमिडल ट्रॅकचे मज्जारज्जू निघतात तिथेही जाऊन ते नष्ट करत होते.

हे नेमके कारण जरी १९६४ साली वैज्ञानिकांनी शोधून काढले तरी त्याआधीच केसरी डाळ आणि न्यूरोलॅथरिझमाचा संबंध लक्षात येऊन १९६१ सालापासूनच ह्या डाळीची पैदास करणे, विकणे आणि खाणे यांवर भारतात निर्बंध आले होते.

67) महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीबद्दल खालीलपैकी कोणते विधान अचूक आहेत ?
1) सह्याद्री पर्वताचा प्रस्तारभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली.
2) याची दक्षिण – उत्तर लांबी 720 कि.मी. आहे.
3) उत्तरेकडे याची रुंदी कमी तर दक्षिणेकडे जास्त आहे.
4) कोकणचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या जवळपास दहा टक्के आहे.

उत्तर : 4) कोकणचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या जवळपास दहा टक्के आहे.
स्पष्टीकरण :
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अरुंद किनारी प्रदेशाचा मुख्यतः महाराष्ट्रातील
भाग. महाराष्ट्रातील याचे क्षेत्रफळ 30,400चौ. किमी. व लोकसंख्या एकट्या बृहन्मुंबईची 59,70,575 धरून 1,04,93,323 (1971) आहे. पूर्वीच्या अनेक उल्लेखांप्रमाणे उत्तरेकडे दमणगंगा व दक्षिणेकडे काळी नदी असा याचा विस्तार मानला, तर दमणचे क्षेत्र 70 चौ. किमी. व लोकसंख्या 38,741 गोव्याचे क्षेत्रफळ 3,700 चौ. किमी. व लोकसंख्या 7,94,570; कारवारची लोकसंख्या 27,777 आणि गोवे व कारवार यांदरम्यानच्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व लोकसंख्या यांची त्यात भर घालावी लागेल. याच्या पूर्वेस सह्याद्री आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. याची दक्षिणोत्तर लांबी सु. 500 ते 600 किमी. व रूंदी 55 ते 65, क्वचित 96 किमी. पर्यंत आहे.

68) खालील पर्वतरांगांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम लावा.
1) सातपुडा – मैकाल – महादेव – राजमहल 2) मैकाल – महादेव – सातपुडा – राजमहल
3) राजमहल – महादेव – मैकाल – सातपुडा 4) सातपुडा – महादेव – मैकाल – राजमहल

उत्तर : 4) सातपुडा – महादेव – मैकाल – राजमहल
स्पष्टीकरण :
सातपुडा (Satpura) ही भारताच्या मध्यभागी असलेली व तिच्या उत्तरेला असलेल्या विंध्य पर्वतरांगांना समांतर अशी पर्वतरांग आहे. या सातपुड्याच्या उत्तरेला नर्मदा व दक्षिणेला तापी या नद्यांची खोरी आहेत. या पर्वतरांगेला सात घड्या आहेत, म्हणून हिचे नाव सातपुडा पडले. उत्तरेकडून येताना सातपुडा ओलांडला की महाराष्ट्रात प्रवेश झाला असे समजले जाते. दक्षिणी गुजरातच्या पूर्व सरहद्दीपासून या पर्वतरांगांची सुरुवात होऊन ती महाराष्ट्रातीलट्र (खानदेश व विदर्भ)पर्यंत आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांपर्यंत पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. सह्याद्रीमधील महाबळेश्वरपासून आग्नेयेकडे निघणारी शंभू-महादेव डोंगररांग महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यांतून पुढे कर्नाटकात प्रवेश करते. या डोंगर रांगेवर वसलेल्या शिखरशिंगणापूर (ता. फलटण, जिल्हा – सातारा) येथे असलेल्या शंभू महादेवाच्या पवित्र स्थानामुळे या डोंगर रांगेस शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात. भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक पर्वतश्रेणी. ‘मैकल’ या नावानेही ही पर्वतश्रेणी ओळखली जाते. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे 21° 11′उ. ते. 22° 40′ उ. व 80° 46′ पू. ते 81° 46′ पू. यांदरम्यान. साधारण उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली मैकल पर्वतरांग म्हणजे विंध्य व सातपुडा ह्यांना जोडणारा दुवा आहे. त्रिकोणाकृती सातपुडा पर्वतरांगेचा मैकल हा पूर्वेकडील पाया समजला जातो. सर्वसाधारणपणे हिची उंची 610 मी. पेक्षा अधिक आढळत नाही. मात्र त्यातील लाफा टेकडीची उंची 1,067 मी. आहे. सातपुडा-मैकल हा भारतातील हिमालयाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा जलविभाजक असून, त्यातील अमरकंटक या तीर्थस्थानाजवळ नर्मदा नदी उगम पावते. ती मैकलकन्या नावाने प्रसिद्ध आहे. तिच्याशिवाय सोन, पांडू, कनहार, रिहांड, बिजुल, गोपाड, बनास इ. नद्या या जलविभाजकात उगम पावतात.

69) “सतीची चाल म्हणजे शास्त्राच्या संमतीचे केलेला खून आहे.” हे कथन कोणत्या समाजसुधारकाचे आहे ?
1) ईश्वरचंद्र विद्यासागर 2) कृष्णशास्त्री चिपळूणकर
3) सर अहमद खान 4) राजा राममोहन रॉय

उत्तर : 4) राजा राममोहन रॉय
स्पष्टीकरण :
राजा राममोहन रॉय हे एक भारतीय समाजसुधारक होते. मुगल सम्राट दुसरा अकबर याने राममोहन रॉय यांना राजा ही उपाधी बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. राजा राममोहन रॉय यांना भारतात नवविचाराचे जनक म्हंटले जाते. त्यांनी सर्वप्रथम “ब्रह्मपत्रिका”नावाचे वृत्तपत्र सुरू केले. राजा राममोहन रॉय ह्यांनी त्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी 1828 साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. जुन्या प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर 12 एप्रिल 1822 रोजी मिरातउलअखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी 1828 साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले. राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विलियम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने सन 1829 मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली.

70) उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी पाकिस्तानी शहरांचा कोणता क्रम योग्य ठरेल ?
1) इस्लामाबाद – गुजरावाला – पेशावर – मुलतान
2) पेशावर – गुजरावाला – मुलतान – इस्लामाबाद
3) पेशावर – इस्लामाबाद – गुजरावाला – मुलतान
4) इस्लामाबाद – मुलतान – पेशावर – गुजरावाला

उत्तर : 3) पेशावर – इस्लामाबाद – गुजरावाला – मुलतान
स्पष्टीकरण :
पाकिस्तान एक देश असून, भारताच्या वायव्य सिमेवरील देश आहे. पाकिस्तान हे के॓द्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे (परगणा) आणि चार के॓द्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची ही सर्वात मोठे शहर आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे 16 कोटी असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमा॓क आहे. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, भूगोल, वन्यप्राणी यात प्रचंड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, औद्योगिकरण हे उर्जितावस्तेत आहेत. पाकिस्तानच्या निर्मितीपासून, लष्करी राजवट, राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेले वादग्रस्त संबंध यामुळे सतत अस्थिरतेला पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागले. देश अजूनही गरिबी, दारिद्र्य, निरक्षरता आणि भ्रष्टाचार अशा समस्यांशी झगडत आहे.

71) खनिजसंपत्तीबाबत महाराष्ट्रातील परिस्थिती खालीलपैकी कशी आहे ?
अ) खनिजसंपत्तीबाबत फारसी समाधानकारक नाही.
ब) खनिजांचे अत्यंत विषम वितरण
क) महाराष्ट्राच्या पूर्व व दक्षिण भागात खनिज उत्पादन
ड) बहुतेक संपत्ती ही स्फटिकी व रूपांतरित खडकात आढळते.
1) ‘अ’, ‘ब’ व ‘क’ 2) ‘ब’ व ‘ड’
3) वरील सर्व बरोबर 4) ‘अ’, ‘ब’ व ‘ड’

उत्तर : 3) वरील सर्व बरोबर
स्पष्टीकरण :
महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त 12.33 टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

72) जीवनवस्तुमानाबाबत खालील विधानांचा अभ्यास करून योग्य विधाने निवडा.
विधान – (अ) : कोणत्याही पोषणपातळीतील सर्व सजीवांच्या एकत्रित शुष्क वजनाच्या द्रव्यसंचयाला जीवनवस्तुमान असे म्हणतात.
विधान – (ब) : सर्वसामान्यपणे 70 ते 80% जीवनवस्तुमान एका पातळीकडून दुसर्‍या पातळीत हस्तांतरित होते.
1) विधान ‘ब’ बरोबर, मात्र विधान ‘अ’ चूक 2) दोन्ही विधाने बरोबर
3) दोन्ही विधाने चूक 4) विधान ‘अ’ बरोबर, मात्र विधान ‘ब’ चूक

उत्तर : 4) विधान ‘अ’ बरोबर, मात्र विधान ‘ब’ चूक
स्पष्टीकरण :
भौतिकशास्त्रानुसार, एखाद्या पदार्थाचे वस्तुमान, अर्थात वस्तुता म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलल्या एकूण वस्तूचे मोजमाप होय. पदार्थाच्या जडत्वावरूनही वस्तुमान ठरवतात. पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय क्षेत्रात असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. वस्तू कितीही सूक्ष्म असली, तरी त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान हे असतेच आणि वस्तुमान असले म्हणजे वजनही असतेच. वस्तुमानच नाही अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. स्थानपरत्वे वजन बदलू शकते कारण स्थानपरत्वे गुरूत्वाकर्षण बदलू शकते. परंतु विश्वात त्या पदार्थाचे वस्तुमान मात्र आहे तेच निश्चित राहते. त्यात कोणताही बदल होत नाही. गुरुत्वाकर्षण बल सारखे असेल, तर वस्तुमानाच्या समप्रमाणात वजन बदलते.

73) निष्क्रिय विरोध हा सिद्धान्त कोणी मांडला होता ?
1) लो. टिळक 2) अरविद घोष
3) गोपाळ कृष्ण गोखले 4) महात्मा गांधी

उत्तर : 2) अरविद घोष
स्पष्टीकरण :
श्री ऑरोबिंदो ऊर्फ (श्री अरविंद) योगी अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्‍ज्ञ, आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात. योगी अरविंद यांनी कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित ‘पूर्णयोगा’ची मांडणी त्यांनी केली. ‘माणूस हा उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर अतिमानसाचा उदय व्हायचा आहे’; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी ‘दिव्य जीवन’ या ग्रंथातून केली आहे.

74) संन्याशी विद्रोहाबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ते निवडा.
अ) तीर्थयात्रेस इंग्रजांनी प्रतिबंध केल्याने संन्याशी संतप्त
ब) द्विजनारायण व केना सरकार यांचे नेतृत्व
क) वॉरन हेस्टिंग्जद्वारे या उठावाचे दमन करण्यात आले.
ड) बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ मध्ये उल्लेख.
1) ‘अ’, ‘ब’ व ‘क’ 2) ‘ब’, ‘क’ व ‘ड’
3) ‘अ’ व ‘ड’ 4) सर्वच योग्य

उत्तर : 4) सर्वच योग्य
स्पष्टीकरण :
बंकिमचंद्रांनी मागील शतकातील ‘संन्याशांचे बंड’ या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘आनंद मठ’ ही कादंबरी इ.स. 1882 साली लिहिली. त्यांनी या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत समाविष्ट केले. या कादंबरीत देशभक्त संन्यासी वंदे मातरम् हे गीत सामूहिकपणे गाताना दाखवले आहे.

75) एलोरा येथील सुप्रसिद्ध ‘दशावतार मंदिर’ खालीलपैकी कोणी तयार केले ?
1) दंतिदुर्ग 2) अमोघवर्ष – I
3) कृष्ण – I 4) इंद्र – I

उत्तर : 1) दंतिदुर्ग
स्पष्टीकरण :
राष्ट्रकूट हे इ.स. 753 – इ.स. 982 या कालखंडादरम्यान भारतीय उपखंडाच्या दक्षिण, मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे राजघराणे होते. या कालखंडात राष्ट्रकूटांनी आंतरसंबंधित, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमधून राज्य केले. राष्ट्रकूट राजघराणे याच्या भरभराटीच्या काळात राष्ट्रकूटांचे सत्ता ही विद्या पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दंतिदुर्ग हा या घराण्यातील प्रथम सत्ताधीश त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती कृष्णराजा पहिला याने वेरुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले. राष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या काळात जैन धर्माचा प्रसार झाला. अजिंठा वेरूळ येथील लेणी राष्ट्रकूटांच्या काळात कोरण्यात आली. गोविंद राष्ट्रकुट पहिला हा राष्ट्रकूट साम्राज्याचा प्रभावी राजा होऊन गेला त्याने साम्राज्य विस्तारासाठी मोठे प्रयत्न केले. राष्ट्रकूटांच्या कालखंड हा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वैभव संपन्न असा कालखंड होता या काळामध्ये सांस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राचे मोठी प्रगती घडून आली.

Combine Test No. 01Download
Combine Test No. 02Download
Combine Test No. 03Download
Combine Test No. 04Download
Combine Test No. 05Download
Combine Test No. 06Download
Combine Test No. 07Download
Combine Test No. 08Download
Combine Test No. 09Download
Combine Test No. 10Download
Combine Test No. 11Download
Combine Test No. 12Download
Combine Test No. 13Download
Combine Test No. 14Download
Combine Test No. 15Download
Combine Test No. 16Download
Combine Test No. 17Download
Combine Test No. 18Download
Combine Test No. 19Download
Combine Test No. 20Download
Combine Test No. 21Download
Combine Test No. 22Download
Combine Test No. 23Download
Combine Test No. 24Download
Combine Test No. 25Download
Combine Test No. 26Download
Combine Test No. 27Download
Combine Test No. 28Download
Combine Test No. 29Download
Combine Test No. 30Download
Combine Test No. 31Download
Combine Test No. 32Download
Combine Test No. 33Download
Combine Test No. 34Download
Combine Test No. 35Download
Combine Test No. 36Download
Combine Test No. 37Download
Combine Test No. 38Download
Combine Test No. 39Download
Combine Test No. 40Download

About Suraj Patil

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply