PSI/STI/ASO Combine Test No. 10

PSI/STI/ASO Combine Test No. 10

सूचना

  • सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत  सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
  • आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
  • वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
  • अ)  या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
  • ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
  • सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
  • उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
  • प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 10
PSI/STI/ASO Combine Test No. 10

PSI/STI/ASO Combine Test No. 10

  1. अ) मेंडेलिव्हच्या आवर्तसारणी हायड्रोजनला निश्चित स्थान दिलेले आहे, जे यापूर्वी दिलेले नव्हते.

ब) मोस्लेच्या आवर्तसारणीत प्रत्येक गणात धातू गुण खालून वर कमी कमी होत जातो.

वरीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

1) (ब) फक्त 2) (अ) फक्त

3) (अ) व (ब) दोन्ही नाही 4) (अ) व (ब) दोन्ही

उत्तर : 2) (अ) फक्त

स्पष्टीकरण :

इ.स. 1869 साली रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव याने प्रथम ही आवर्त सारणी आधुनिक पद्धतीने मांडली. मेंडेलीवने मूलद्रव्यांना त्यांच्या अणु-वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडले. त्यानंतर मेंडेलीवने मूलद्रव्यांची आडव्या ओळीत मांडणी करण्यास सुरूवात केली. जर त्याला आधी मांडलेल्या मूलद्रव्याशी साधर्म्य असलेले दुसरे मूलद्रव्य सापडले, तर ते त्याने नवीन ओळीत पहिल्या मूलद्रव्याच्या खाली मांडले. मेंडेलीव्हला अश्या सारणीतून मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमधील आवर्तानुसारी कल ठळकपणे दाखवायचे होते. काळागणिक जसजशी नव्या मूलद्रव्यांची भर पडत गेली, तसतशी मेंडेलीव्हच्या मूळ सारणीची रचना वाढत वाढत बदलली गेली. मेंडेलीव्हची आवर्त सारणी जरी तत्कालीन ज्ञात मूलद्रव्यांची मांडणी करण्यात यशस्वी ठरली, तरी कालांतराने, तिच्यामधील काही त्रुटी समोर आल्यात. उदा. एकाच मूलद्रव्याची विविध अणु-वस्तुमान असलेली समस्थानिके मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीत विविध जागा घेतील, परंतु असे करणे अयोग्य आहे, कारण सगळ्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात.

इ.स. 1913 मध्ये हेनरी मोस्ले या ब्रिटिश शास्त्रज्ञाने असे शोधून काढले की, अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म नसून, तो अणुअंक हा आहे. मोस्लेने मेंडेलीव्हच्या सारणीत अणुअंकानुसार मूलद्रव्यांची फेरमांडणी केली आणि आज वापरली जाणारी आधुनिक आवर्त सारणी तयार केली.

  1. सामान्यपणे उष्णता ऊर्जा ही कॅलरी या एककत व्यक्त करतात तर 1 कॅलरी = किती ज्यूल ?

1) 41.8 ज्यूल 2) 1.48 ज्यूल

3) 148 ज्यूल 4) 4.18 ज्यूल

उत्तर : 4) 4.18 ज्यूल

स्पष्टीकरण :

उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते. CGS आणि MKS पद्धतीमध्ये उष्णता वेगवेगळ्या एककामध्ये मोजतात. MKS पद्धतीमध्ये उष्णता तापमान 14.50C ते 15.50C ने वाढविण्यासाठी लागणार्‍या उष्णतेस 1 Kcal उष्णता म्हणतात. CGS पद्धतीमध्ये उष्णता कॅलरीमध्ये मोजतात. एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.50C ते 15.50C पर्यंत 10C ने वाढविण्यासाठी लागणार्‍या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात. 1 कॅलरी = 4.18 ज्यूल.

  1. मुख्य नाभीवर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा अंतर्वक्र आरशामुळे कशी मिळेल ?

1) वास्तव व उलटी 2) आभासी व उलटी

3) वास्तव व सुलटी 4) आभासी व सुलटी

उत्तर : 1) वास्तव व उलटी

स्पष्टीकरण :

अंतर्वक्र आरसा: ह्याचा आतला अंतर्वक्र पृष्ठभाग परावर्तन करतो, आणि बाहेरचा पृष्ठभाग चकचकीत असतो. बहिर्वक्र आरसा: ह्याचा बाहेरचा बहिर्वक्र पृष्ठभाग परावर्तन करतो, आणि आतला पृष्ठभाग चकचकीत असतो. अंतर्वक्र आरशांचे परावर्तन करणारे पृष्ठभाग आतल्या बाजूला फुगिर असतात. ह्यांना अभिसारी आरसे पण म्हणतात कारण त्यावर पडणार्‍या सर्व समांतर शालकांना ते अभिसृत करते. सपाट आरशांच्या विपरीत, अंतर्वक्र आरसे त्यांच्या समोर जिथे प्रकाश केंद्रस्थ होतो तिथे खर्‍या प्रतिमा निर्माण करतात. अंतर्वक्र आरसे उपग्रह डिश, वाहनांचे हेडलाइट, खगोलशास्त्रीय दुर्बिणी आणि इतर क्षेत्रात वापरता येतात.

  1. डोळ्यात प्रवेश करणार्‍या प्रकाशाचे नियंत्रण करणे व त्याचे प्रमाण नियमित ठेवणे यासाठी उपयुक्त असणारा डोळ्यातील भाग कोणता ?

1) Cornea कॉर्निआ 2) Pupil प्यूपिल

3) Eris इरीस 4) Suspensary Ligaments सस्पेन्सरी लिगामेन्ड्स

उत्तर : 2) Pupil प्यूपिल

स्पष्टीकरण :

डोळ्यातील बाहुली (इंग्रजी:Pupul, प्युपिल) हे बुबुळाच्या मध्यभागातील लहान छिद्र आहे. जे डोळ्यातील दृष्टिपटलापर्यंत प्रकाश पोहोचवते. डोळ्यात येणाऱ्या प्रकाश किरणांची तीव्रता परितारीतील बाहुली स्वतःचा आकार बदलून नियंत्रित करते व्यास परितारिकेचे स्नायू नियंत्रित करतात.

  1. खालीलपैकी कोणता धातू कक्ष तापमानाला द्रवरूप अवस्थेत असतो ?

अ) पारा ब) ब्रोमिन क) गॅलीअम ड) वरील सर्व

1) (ड) 2) (अ) व (ब)

3) (अ) फक्त 4) (अ) व (क) फक्त

उत्तर : 4) (अ) व (क) फक्त

स्पष्टीकरण :

धातू सामान्य तापमानाला स्थायुरूपात असतात, अपवाद फक्त पाऱ्याचा. पारा सामान्य तापमानाला द्रवरूपात असतो. धातूंचा पृष्ठभाग चकचकीत असून बहुसंख्य धातूंचा रंग चांदीप्रमाणे पांढरा असतो. लाल रंगाचे तांबे, पिवळ्या रंगाचे सोने आणि पिवळसर चंदेरी सिशियम या धातूंचे रंग वेगळे असतात.

  1. खालील वर्णनावरुन व्यक्ती ओळखा.

अ) 1882 मध्ये गौरक्षण संघटना स्थापन केली.

ब) ते भारतीयांना उपरोधिकपणे मुलांची मुले म्हणत.

क) 1875 मध्ये मुंबईमध्ये त्यांनी एका समाजाची स्थापना केली.

पर्यायी उत्तरे :

1) स्वामी विरजानंद 2) मूळशंकर तिवारी

3) स्वामी रामानंद 4) करसनदास तिवारी

उत्तर : 2) मूळशंकर तिवारी

स्पष्टीकरण :

स्वामी दयानंद सरस्वती (जन्म : मोरबी, 12 फेब्रुवारी 1824; मृत्यू : मुंबई, 30 ऑक्टोबर 1883) हे भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक प्रसिद्ध आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे.

  1. खालील विधानांचा विचार करून त्यापैकि कोणते विधान अचूक नाही ते निवडा.

अ) राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे यजमानपद सार्वजनिक सभेने स्विकारले होते.

ब) या अधिवेशनात तत्कालिन मुंबई प्रांतातील 38 प्रतिनिधींनी भाग घेतला होता.

क) या अधिवेशनाचे अध्यक्ष एक कलकता उच्च न्यायालयातील वकिल होते, ज्यांनी खिश्चन धर्म स्विकारलेला होता.

ड) या अधिवेशनात एकूण 11 ठराव मांडण्यात आले, जे बहुमताने पारित झाले.

पर्यायी उतारे :

1) विधान (अ) व (ड) 2) विधान (ब) व (क)

3) विधान (क) व (ड) 4) फक्त विधान (क)

उत्तर : 1) विधान (अ) व (ड)

स्पष्टीकरण :

इंग्रज अधिकारी सर अॅलन ह्युम यांनी सन 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली. या संघटनेची पहिली बैठक डिसेंबर 1885 मुंबई येथे बोलाविण्यात आली. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे 28 डिसेंबर 1885 रोजी गवालिया टॅंक जवळील गोकूळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरले होते. कलकत्याचे प्रसिद्ध वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनाला देशाच्या कानाकोपर्‍यातून एकूण 72 प्रतीनिधी हजर होते.

  1. योग्य जोड्या लावा. ‘अ’ गट ‘ब’ गट

अ) महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन 1) औरंगाबाद

ब) महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन 2) उमरी

क) महाराष्ट्र परिषदेचे तिसरे अधिवेशन 3) लातूर

ड) महाराष्ट्र परिषदेचे चौथे अधिवेशन 4) परतूर

पर्यायी उत्तरे :

अ   ब   क   ड 

1) 2 1 4 3

2) 4 3 2 1

3) 3 2 1 4

4) 1 2 3 4

उत्तर : 2) 4 3 2 1

स्पष्टीकरण :

महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन = परतूर

महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन = लातूर

महाराष्ट्र परिषदेचे तिसरे अधिवेशन = उमरी

महाराष्ट्र परिषदेचे चौथे अधिवेशन = औरंगाबाद

  1. खालीलपैकी कोणाच्या मार्गदर्शनाखाली कलकत्याजवळ माणिकतोळा येथे बॉम्ब बनवण्याचे कार्य सुरू झाले ?

अ) बारिंद्रकुमार घोष ब) हेमचंद्र दास क) उल्लास दत्त ड) प्रफुल्ल चाकी

पर्यायी उत्तरे :

1) फक्त (अ) 2) (अ) व (क) फक्त

3) (ब) व (क) फक्त 4) (अ) व (ड) फक्त

उत्तर : 3) (ब) व (क) फक्त

  1. “तेव्हा खळाळले होते पाणी तडातड उडाल्या शृंखला अस्मानात कडाड मोडली होती आम्ही रणगाड्याची हाडे, मुंबापुरी नगरात” असे वर्णन एका कवीने कोणत्या उठावाचे चळवळीचे केले होते ?

1) 1857 चा उठाव 2) छोडो भारत चळवळ

3) तलवार युद्धनौके वरील सेनादलाचा उठाव 4) मुंबईतील कामगारांचा संप / बंद.

उत्तर : 3) तलवार युद्धनौके वरील सेनादलाचा उठाव

  1. खालील वर्णनावरून संघटनेचे नाव ओळखा.

अ) या संघटनेला ब्राह्यनेतराची पहिलीच राजकीय संघटना म्हणून ओळखले जाते.

ब) ब्रिटिश सत्तेशी निष्ठा राखणे हे या संघटनेच्या काही उद्दिष्टांपैकी एक होते.

क) या संघटनेची स्थापना ऑगस्ट 1916 मध्ये करण्यात आली.

पर्यायी उत्तरे :

1) शिवाजी सत्यशोधक समाज 2) मराठा राष्ट्रीय संघ

3) ऑल इंडिया मराठा लीग 4) डेक्कन रयत समाज

उत्तर : 4) डेक्कन रयत समाज

स्पष्टीकरण :

शाहू महाराजांनी बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी इ.स. 1916 साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला.

  1. 21 नोव्हेंबर 1955 मध्ये गोळी लागून ठार झालेला ………….. हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील पहिल्या हुतात्मा ठरतो.

1) वेदप्रकाश गुंजोटी 2) सीताराम पवार

3) दत्ता ताम्हणे 4) गोविंदराव पानसरे

उत्तर : 2) सीताराम पवार

स्पष्टीकरण :

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला.

या चळवळीमुळे 1 मे इ. स. 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण 108 जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

  1. कॉंग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक प्रश्नांची चर्चा व्हावी या विचारांच्या विरोधात खालीलपैकी कोणत्या व्यक्ती होत्या ?

अ) उमेशचंद्र बॅनर्जी ब) बद्रुद्दीन तय्यबजी

क) न्या. रानडे ड) अॅलन ह्युम

पर्यायी उत्तरे :

1) (अ), (ब) व (क) फक्त 2) (ब), (क) व (ड) फक्त

3) (क) व (ड) फक्त 4) (क) फक्त

उत्तर : 3) (क) व (ड) फक्त

स्पष्टीकरण :

  1. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र / मासिक / साप्ताहिक पुणे येथून सुरू झाले होते ?

अ) अरुणोदय ब) निबंधमाला

क) दिनबंधू ड) ज्ञानप्रकाश

पर्यायी उत्तरे :

1) (अ), (ब) व (ड) फक्त 2) (ब), (क) व (ड) फक्त

3) (ड), (ब) व (क) फक्त 4) वरीलपैकी सर्व.

उत्तर : 2) (ब), (क) व (ड) फक्त

स्पष्टीकरण :

विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एकहाती मजकूर असलेले निबंधमाला हे मासिक (पहिला अंक : 25 जानेवारी 1874) सुरू केले होते. ते सात वर्षे अखंड चालले. दीनबंधू या वृत्तपत्राची सुरुवात बहुजन समाजात जागृती व्हावी व त्यांचा उध्दार करण्यासाठी सुरु केले होते. महात्मा फुले यांचे एक जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू पत्र सुरु केले. कृष्णराव भालेकर यांनी पुण्यात 1 जानेवारी 1877 साली दीनबंधू पत्र सुरु करून त्याचे पहिले अंक प्रसिद्ध केले. ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र होते. याची सुरुवात 1849 मध्ये झाली. कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी यांनी स्थापन केलेले हे वृतपत्र 103 वर्षे चालले आणि शेवटी 1951 साली बंद पडले.

  1. “मालगुझारी पद्धत” खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सुरू करण्यात आली होती ?

1) मुंबई प्रांत 2) पंजाब प्रांत

3) मध्य प्रांत 4) बंगाल बिहार प्रांत

उत्तर : 3) मध्य प्रांत

स्पष्टीकरण :

या पद्धतीला जागीरदारी,मालगुजारी,बिस्वेदारी म्हणून ओळखले जाते. हि पद्धत लागू करण्यासाठी लॉर्ड कोर्नवालीसने जॉन शोअर याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. जॉन शोअरच्या अहवालानुसार ‘जमीनदार हेच जमिनीचे मालक असल्याचे आणि त्यांना परंपरागत अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले. कोर्नवालीसने हि पद्धत 1793 मध्ये बंगाल,बिहार,ओरिसा कालंतराने मद्रास व वाराणसी येथे सुरु केली. या पद्धतीत सारा वसुलीचा अधिकार जमिनदारांना देण्यात आला व ते जमिनीचे मालक बनले म्हणून हिला जमीनदारी पद्धती असे नाव पडले. इ स 1793 मध्ये कोर्नवालीसने हि व्यवस्था कायमस्वरूपी लागू केली म्हणून या पद्धतीला कायमधारा पद्धत असे नाव पडले. या पद्धतीत शासन-जमीनदार-शेतकरी या 3 वर्गांचा समावेश होता मात्र शासन व प्रजेचा सबंध येत नवता. या पद्धतीमुळे कंपनीला मिळणारा शेतसारा निश्चित झाला. जॉन शोअरने हि पद्धत प्रथम 10 वर्षासाठी सुचवली होती परंतु कोर्नवालीसने ती कायमस्वरूपी केली. या पद्धतीत गेल्या काही वर्षातील शेतजमिनीच्या उत्पन्नाची सरासरी काढून दरवर्षी त्या जमिनिमागे किती सारा निश्चित करता येईल याचा विचार करून वर्षाकाठी सार्याची निश्चित रक्कम ठरवली गेली व 10 वर्षाच्या कराराने जमिनदारांना जमीन मह्सूल वसुलीसाठी देण्यात आली.

  1. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही ते निवडा.

अ) श्रीथरलू नायडू यांनी वेद समाजाची स्थापना केली होती.

ब) विश्वनाथ अग्निहोत्री यांनी देव समाजाची स्थापना केली होती.

पर्यायी उत्तरे :

1) विधान (अ) फक्त 2) विधान (ब) फक्त

3) विधान (अ) व विधान (ब) 4) विधान (अ) व विधान (ब) दोन्ही नाही.

उत्तर : 1) विधान (अ) फक्त

स्पष्टीकरण :

केशव चंद्र सेन जेव्हा मद्रास मध्ये होते तेव्हा श्रीथरलू नायडू यांनी वेद समाजाची स्थापना केली होती. 1861 मध्ये दक्षिण भारतात ब्राम्हो समाज नावाने अस्तित्वात आली.

  1. विधान : मुंबई येथील सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात ……….. व ………… हे राष्ट्रीय सभेचे हात व पाय अशा घोषणा दिल्या जात असत.

वरील विधानात गाळलेल्या जागी अचूक पर्याय निवडा.

1) जहाल व मवाळ 2) क्रांतीकारक व जहाल

3) महिला व पुरुष 4) कामगार व शेतकरी

उत्तर : 4) कामगार व शेतकरी

  1. अ) 1900 च्या कॉंग्रेसच्या 16 व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद प्रथमच एका मराठी व्यक्तीने भूषविले होते.

ब) 1926 च्या गुवाहाटी येथील कॉंग्रेसच्या ज्या अधिवेशनात सदस्यांसाठी खादी वापरण्याचे बंधन करणारा ठराव पास करण्यात आला, त्याचे अध्यक्ष एस. श्रीनिवास अय्यंगर होते.

वरीलपैकी कोणते विधान असत्य नाही ते ओळखा.

पर्यायी उत्तरे :

1) विधान (अ) फक्त 2) विधान (ब) फक्त

3) विधान (अ) व (ब) दोन्ही 4) विधान (अ) व (ब) दोन्ही नाही.

उत्तर : 3) विधान (अ) व (ब) दोन्ही

स्पष्टीकरण :

1900 च्या कॉंग्रेसच्या 16 व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद प्रथमच एन. जी. चंदावरकर या एका मराठी व्यक्तीने भूषविले होते. 1926 च्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद एस. श्रीनिवास अय्यंगर यांनी भूषविले होते.

  1. 1889 मध्ये लंडनला स्थापन झालेल्या ब्रिटिश कमिटीने खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले ?

1) ब्रिटिश इंडिया 2) मॉडर्न इंडिया

3) इंडियन कल्चर 4) यापैकी नाही

उत्तर : 4) यापैकी नाही

स्पष्टीकरण : ब्रिटिश कमिटीने 1889 मध्ये लंडनला इंडिया वृत्तपत्र सुरू केले.

  1. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापनेत ज्यांचा पुढाकार होता, अश्या (brother in law) ब्रदर – इन – लॉ मध्ये खालील व्यक्तींचा समावेश होतो.

अ) फिरोशाह मेहता ब) बाळशास्त्री जांभेकर

क) बद्रुद्दीन तय्यबजी ड) के.टी. तेलंग

पर्यायी उत्तरे :

1) (अ) व (ब) फक्त 2) (अ), (क) व (ड)

3) (अ), (ब) व (क) फक्त 4) (अ) व (ड) फक्त

उत्तर : 2) (अ), (क) व (ड)

स्पष्टीकरण :

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (जन्म : पोंभुर्ले, महाराष्ट्र, 6 जानेवारी 1812; मृत्यू : मुंबई, 18 मे 1846) हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले.

  1. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही.

अ) 2013 – 2014 पर्यंत संरक्षण क्षेत्रात शासकिय मार्गाने 26% FDI ला परवानगी होती.

ब) 2014 – 2015 मध्ये संरक्षण क्षेत्रात शासकिय मार्गाने 74% FDI ला परवानगी दिली आहे.

पर्यायी उत्तरे :

1) (अ) फक्त 2) (ब) फक्त

3) (अ) व (ब) दोन्ही 4) ना (अ) ना (ब)

उत्तर :1) (अ) फक्त

स्पष्टीकरण :

2014 – 2015 मध्ये संरक्षण क्षेत्रात शासकिय मार्गाने 48% FDI ला परवानगी दिली आहे.

  1. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात FDI गुंतवणूक मर्यादा (शासकिय व स्वयंचलित) 100% पर्यंत आहे.

अ) FM Redio (एफ.एम. रेडिओ) ब) ग्रीनफील्ड विमानतळे

क) ऊर्जा (पॉवर एक्सचेंज) ड) सिंगल ब्रॅंड रिटेल व्यापार सेवा.

पर्यायी उत्तरे :

1) (अ) फक्त 2) (ब) व (क) फक्त

3) (अ) व (ड) फक्त 4) (ब) व (ड) फक्त

उत्तर : 4) (ब) व (ड) फक्त

स्पष्टीकरण :

FDI थेट परकीय गुंतवणूकीत “विलीनीकरण आणि अधिग्रहण, नवीन सुविधा निर्माण करणे, परदेशातील कामकाजाद्वारे मिळविलेला नफा पुन्हा गुंतवणे आणि इंट्रा कंपनी कर्ज” यांचा समावेश आहे. अरुंद अर्थाने, थेट परकीय गुंतवणूक म्हणजे गुंतवणूकदारांच्या व्यतिरिक्त इतर अर्थव्यवस्थेत कार्यरत असलेल्या एंटरप्राइझमध्ये केवळ नवीन सुविधा तयार करणे आणि स्थायी व्यवस्थापनाचे व्याज (10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मतदान). एफडीआय म्हणजे समभाग भांडवलाची रक्कम , दीर्घ मुदतीच्या भांडवलाची आणि अल्प-मुदतीच्या भांडवलाची भरपाईच्या शिल्लक रकमेत दर्शविली जाते . एफडीआयमध्ये सहसा व्यवस्थापन, संयुक्त उद्यम , तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि कौशल्य यांचा समावेश असतो. एफडीआयचा साठा निव्वळ आहे(म्हणजेच, बाह्य एफडीआय वजा आवक एफडीआय) कोणत्याही कालावधीसाठी एकत्रित एफडीआय. थेट गुंतवणूक समभागांच्या खरेदीतून गुंतवणूकीस वगळते (जर त्या खरेदीचा परिणाम एखाद्या गुंतवणूकीने कंपनीच्या 10% पेक्षा कमी शेअर्सवर नियंत्रण ठेवला असेल).

एफडीआय, आंतरराष्ट्रीय घटकांच्या हालचालींचे एक सबसेट आहे , एका देशातील व्यवसाय एंटरप्राइझची मालकी दुसर्‍या देशात स्थित असलेल्या एका संस्थेद्वारे नियंत्रित करते. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक अशा सार्वजनिक परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक, दुसर्या देशात सिक्युरिटीज एक निष्क्रीय गुंतवणूक पासून ओळखले जाते साठा आणि बंध “नियंत्रण” घटक. फायनान्शियल टाईम्सच्या मते , “नियंत्रणावरील मानक व्याख्येनुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर मतदानाच्या शेअर्सचा दहा टक्के उंबरठा वापरला जातो, परंतु हे एक राखाडी क्षेत्र आहे कारण बहुतेक वेळा शेअर्सचा एक छोटासा भाग व्यापकपणे धारण केलेल्या कंपन्यांमध्ये नियंत्रण मिळवून देईल. शिवाय, यावर नियंत्रण तंत्रज्ञान, व्यवस्थापन, अगदी महत्त्वपूर्ण इनपुट देखील वास्तविक नियंत्रण ठेवू शकतात.

  1. अ) भारताचा 2013 – 2014 चा GDP (स्थिर घटकमुल्य किंमतीला) 57.4 लाख कोटी रु. होता.

ब) अप्रत्यक्ष कर कमी केले व सबसिडी वाढवली तर वाढू शकतो.

क) आर्थिक वर्षासंबंधी शंकर आचार्य समिती 16 जुलै 2016 रोजी स्थापन केली आहे.

वरील कोणते विधान योग्य आहे ?

पर्यायी उत्तरे :

1) (अ) फक्त 2) (ब) व (क) फक्त

3) (क) फक्त 4) यापैकी नाही.

उत्तर : 1) (अ) फक्त

स्पष्टीकरण :

सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) म्हणजे देशाच्या सीमेत उत्पादित प्रत्येक गोष्टीचे एकूण मूल्य. जेव्हा अर्थशास्त्रज्ञ अर्थव्यवस्थेच्या “आकार” बद्दल बोलतात तेव्हा ते जीडीपीचा संदर्भ घेतात. दुहेरी मोजणी टाळण्यासाठी, जीडीपीमध्ये उत्पादनाचे अंतिम मूल्य समाविष्ट होते, परंतु त्यामध्ये जाणारे भाग नाहीत. उदाहरणार्थ, अमेरिकन पादत्राणे उत्पादक यूएसमध्ये शूलेसेस आणि इतर साहित्य वापरतात, परंतु केवळ जोडाचे मूल्य मिळते. मोजले बूट नाही. अमेरिकेत, ब्युरो ऑफ इकॉनॉमिक अ‍ॅनालिसिस (बीईए) जीडीपीचा तिमाही उपाय करते आणि अद्यतनित डेटा प्राप्त झाल्यामुळे दरमहा तिमाहीच्या अंदाजानुसार ते सुधारित होते.

  1. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी / मापनासाठी कोणती पद्धत वापरली जाते ?

अ) उत्पन्न पद्धत ब) खर्च पद्धत

क) उत्पादन पद्धत ड) वरील सर्व

पर्यायी उत्तरे :

1) (अ) व (ब) 2) (ड) फक्त

3) (ब) फक्त 4) (अ) व (क) फक्त

उत्तर : 4) (अ) व (क) फक्त

स्पष्टीकरण :

मानवी गरजा भागविण्यासाठी वस्तू व सेवाकर्मे यांचे उत्पादन करणे हे देशातील अर्थव्यवस्थेचे प्रमुख कार्य आहे. उत्पादनाची क्रिया होत असताना त्याचबरोबर उत्पादक घटकांना उत्पन्न आणि उत्पादनाचा उपभोग, भांडवली वस्तूंचे संचयन अशा प्रकारे उपयोग किंवा व्यय होत असतो. उत्पादन, उत्पन्न आणि उत्पादन व्यय असे हे तीन प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहाची तीन स्वरूपे आहेत. यांपैकी कोणत्याही स्वरूपातील वर्ष किंवा इतर हव्या असलेल्या कालखंडातील एकूण प्रवाह म्हणजे त्या वर्षातील किंवा कालखंडातील ‘राष्ट्रीय उत्पन्न’ होय.

  1. खालील विधानांचा विचार करा.

अ) भारतात 1991 मध्ये विक्रीकर या प्रत्यक्ष करासाठी VAT पध्दत आकारण्याची शिफारस राजा चेलय्या समितीने केली होती.

ब) हरियाणा सर्वप्रथम 2004 मध्ये VAT ची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य ठरले.

क) महाराष्ट्र राज्याचे एकूण कर महसुलापैकी चे प्रमाण सर्वाधिक म्हणजे जवळपास 57.1% आहे.

ड) Bombay विक्रीकर कायदा 1946 साली संमत झालेला आहे ज्यानुसार राज्यात एक सामान्य विक्रीकर लागू करण्यात आलेला होता.

वरील विधानापैकी कोणते विधान असत्य नाही.

पर्यायी उत्तरे :

1) (क) व (ड) फक्त 2) (अ) व (ब) फक्त

3) (ब), (क) व (ड) फक्त 4) (अ), (क) व (ड) फक्त.

उत्तर : 1) (क) व (ड) फक्त

स्पष्टीकरण :

मूल्य-वर्धित कर (व्हॅट) उत्पादनावर विक्रीच्या बिंदूपर्यंत जेव्हा पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर मूल्य जोडले जाते तेव्हा उत्पादनावर ठेवलेला वापर कर असतो. वापरकर्त्याने दिलेली व्हॅट रक्कम उत्पादनाच्या खर्चावर अवलंबून असते, उत्पादनावर वापरलेल्या साहित्याचा कोणत्याही किंमतीवर आधीपासून कर आकारला गेला आहे. जगातील 160 हून अधिक देश मूल्य-वर्धित कर आकारणीचा वापर करतात आणि ते बहुधा युरोपियन युनियनमध्ये आढळतात. तथापि, हे विवाद न करता नाही. वकिलांचे म्हणणे आहे की आयकर प्रमाणे यश किंवा संपत्तीची दंड न देता सरकारचा महसूल वाढविते आणि पारंपारिक विक्री करापेक्षा कमी सोप्या मुद्द्यांसह हे सोपे आणि प्रमाणित आहे. टीकाचा आरोप आहे की एक व्हॅट हा मूलत: एक प्रतिरोधक कर आहे जो कमी उत्पन्न असलेल्या करदात्यावर वाढीव आर्थिक ताण ठेवतो आणि व्यवसायांसाठी नोकरशाहीचे ओझे देखील जोडतो. मूल्यवर्धित कर आकारणी करदात्यांच्या उत्पन्नाऐवजी त्यांच्या वापरावर आधारित आहे. प्रगतिशील आयकर, जे उच्च-स्तरावरील कमाई करणार्‍यांवर जास्त कर लावते याच्या उलट, व्हॅट प्रत्येक खरेदीला तितकाच लागू होतो.

Combine Test No. 01Download
Combine Test No. 02Download
Combine Test No. 03Download
Combine Test No. 04Download
Combine Test No. 05Download
Combine Test No. 06Download
Combine Test No. 07Download
Combine Test No. 08Download
Combine Test No. 09Download
Combine Test No. 10Download
Combine Test No. 11Download
Combine Test No. 12Download
Combine Test No. 13Download
Combine Test No. 14Download
Combine Test No. 15Download
Combine Test No. 16Download
Combine Test No. 17Download
Combine Test No. 18Download
Combine Test No. 19Download
Combine Test No. 20Download
Combine Test No. 21Download
Combine Test No. 22Download
Combine Test No. 23Download
Combine Test No. 24Download
Combine Test No. 25Download
Combine Test No. 26Download
Combine Test No. 27Download
Combine Test No. 28Download
Combine Test No. 29Download
Combine Test No. 30Download
Combine Test No. 31Download
Combine Test No. 32Download
Combine Test No. 33Download
Combine Test No. 34Download
Combine Test No. 35Download
Combine Test No. 36Download
Combine Test No. 37Download
Combine Test No. 38Download
Combine Test No. 39Download
Combine Test No. 40Download

About Suraj Patil

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply