पुणे चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची सरळसेवा भरती-2022-Pdf Download

पुणे चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची सरळसेवा भरती-2022-Pdf Download-Pune saralseva bharti 2022-पुणे सरळसेवा भरती-2022

समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ पुणे यांचे आस्थापनेवर वर्ग-४ (गट- ड) ची रिक्त पदे भरणेकरीता सरळसेवा भरती आयोजित करण्यात येत असून भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून खालील अटींच्या अधीन राहून ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पुणे चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची सरळसेवा भरती-2022-Pdf Download

आवेदन अर्ज सादर करण्याची पद्धत:– भोजन सेवक व सफाईगार या पदाकरीता ऑनलाईन आवेदन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याने उमेदवार यांनी ऑफलाईन आवेदन अर्ज दिनांक ०३/०१/२०२२ ते दिनांक २०/०१/२०२२ पर्यंत दररोज सकाळी १०:०० ते सायंकाळी १७:०० वाजेपर्यंत समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ पुणे येथील पोलीस कल्याण कार्यालय येथे राहतील. तसेच https://maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील.

अर्जाकरिता कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. उमेदवारांनी आवेदन अर्ज बिनचुक परिपुर्ण भरुन समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ पुणे या कार्यालयातील आवक/ जावक शाखेत दिनांक २०/०१/२०२२ चे १८:०० वाजेपर्यंत पोहचतील अशा बेताने आणून द्यावेत. वर नमुद केल्याप्रमाणे प्रवर्गानुसार परिक्षा शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (राष्ट्रीयकृत बँकेचा असावा) अथवा पोस्टल ऑर्डर ( समादेशक सहायक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ पुणे/ ASSISTANT COMMANDANT SRPF GR 1 PUNE) यांचे नावे काढुन अर्जासोबत जमा करावा. आवेदन अर्ज बिनचुक परिपुर्ण भरून विहीत मुदतीत प्राप्त न झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच मुळ आवेदन अर्जासोबत संपुर्ण मुळ कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती व तीन पासपोर्ट साईज फोटो जोडणे अनिवार्य राहील. (मुळ कागदपत्रांची सुची मुदा क्र.१० मध्ये दर्शविण्यात आली आहे.)

टीप :- आदेवन अर्ज प्राप्त करून घेणेकरीता चेक किंवा रोख रक्कम स्विकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

चतुर्थ श्रेणी पदासाठी सेवा, अटी व शर्ती :

  • अर्ज सादर करण्याची अट:- उमेदवारास फक्त एका पदासाठीच व एकाच गटात अर्ज सादर करता येईल. महाराष्ट्र शासन, सा.प्र.वि.अधिसुचना क्रमांक एसआरव्हि-२०००/प्र.क्र.१७/२०००/१२, दि.१.०७.२००५ नमुना “अ” नियम ४ प्रमाणे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जात आपले उच्चतम शैक्षणीक पात्रता नमुद करावी त्याबाबतचे प्रमाणपत्र आवेदन अर्जासोबत जोडण्यात ज्यावे.
  • महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक अंनियो-१००५/१२६/सेवा-४, दिनांक ३१.१०.२००५ प्रमाणे पारिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील.
  • निवड होणा-या उमेदवारांना महाराष्ट्र नागरी सेवा अटी व शर्ती, मुंबई राज्य राखीव पोलीस बल अधिनियम १९५१ व मुंबई राज्य राखीव पोलीस बल नियम १९५९, मुंबई पोलीस नियमावली-१९९९ लागू राहिल व तसेच वर्ग ४ संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेले शासन निर्णय/परिपत्रक / आदेश लागु राहतील.
  • कामाचे क्षेत्र मर्यादा/ठिकाण:- निवड होणारे महिला/पुरुष उमेदवार यांना वारंवार कोणत्याही वेळी गट मुख्यालयाव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यात कोठेही (उदा:- गडचिरोली, गोंदीया, चंद्रपुर या नक्षलग्रस्त प्रभागासह) तसेच महाराष्ट्र राज्याबाहेर आंतर सुरक्षा बंदोबस्तासाठी कंपनीसोबत जावे लागेल.

पुणे चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची सरळसेवा भरती-2022-Pdf Download

About Sayli Bhokre

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply