सरळसेवा नवीन भरती प्रक्रिया GR प्रसिद्ध पहा संपूर्ण माहिती, Salarseva Pariksha Bharati Navin GR 2022, गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने महापरीक्षा पोर्टल मार्फत भरण्याबाबतची एकत्रित कार्यपद्धती , सरळसेवा नवीन भरती प्रक्रिया GR प्रसिद्ध पहा संपूर्ण माहिती.
सरळसेवा नवीन भरती प्रक्रिया GR
प्रस्तावना:
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने महापरीक्षा पोर्टल मार्फत भरण्याबाबतची एकत्रित कार्यपद्धती सदर्भाकित क्रमांक १ येथील दिनांक १३ जून, २०१८ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली आहे. तद्नंतर, महापरीक्षा पोर्टल पेंद्धतीत बदल करून सुधारित परीक्षा पद्धती पॅनेलवर नियुक्त केलेल्या पाच कंपन्यांकडून (OMR Vendor) राबविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या संदर्भाकित क्रमांक ५ व ६ च्या आदेशान्वये देण्यात आल्या. त्यानुषंगाने, सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाकित क्रमांक ७ येथील दिनांक २२ एप्रिल, २०२१ च्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या संदर्भाकित क्रमांक ९ येथील दिनांक १८ जानेवारी, २०२२ च्या शासन निर्णयान्वये, त्या विभागाचे दिनांक २१ जानेवारी, २०२१ व दिनांक ४ मार्च, २०२१ चे शासन निर्णय स्थगित करण्यात आले असून, यानंतर पदभरतीच्या परीक्षा Empanelment केलेल्या OMR Vendor कडून घेण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) सरळसेवा पदभरतीसंदर्भात सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती
पोलीस भरती परीक्षा संपूर्ण माहिती
आरोग्य भरती परीक्षा संपूर्ण माहिती
तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती
शासन निर्णयः
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट ड संवर्गातील सरळसेवेने भरण्यात येणाऱ्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबतचे सदर्भाकित क्रमांक १ येथील दिनांक १३ जून, २०१८, सदर्भाकित क्रमांक ४ येथील १७ ऑगस्ट, २०२०, सदर्भाकित क्रमांक ७ येथील २२ एप्रिल, २०२१ व सदर्भाकित क्रमांक ८ येथील दिनांक १९ मे, २०२१ हे शासन आदेश अधिक्रमित करण्यात येऊन, एकत्रित मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहेत.
१. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) जिल्हास्तरीय/प्रादेशिकस्तरीय/राज्यस्तरीय पदे सरळसेवेने भरण्यासाठी निवड समित्यांची स्थापना करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना :
जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीची स्थापना तसेच प्रादेशिकस्तरीय व राज्यस्तरीय पदे भरण्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समित्यांची स्थापना करण्यात यावी. या समित्याची रचना पुढीलप्रमाणे राहील.
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download