मराठी साहित्य संमेलने-२०१९
मराठी साहित्य संमेलने-२०१९
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन –
ठिकाण – यवतमाळ -दुसऱ्यांदा (आधी – १९७३, अध्यक्ष – ग. दि. माडगुळकर)
कालावधी – ११ – १३ जानेवारी २०१९
अध्यक्ष – डॉ. अरुणाताई ढेरे – निवडणूक न होता निवड झालेल्या पहिल्या अध्यक्षा
9३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन –
ठिकाण – उस्मानाबाद
कालावधी – १० -१२ जानेवारी २०२०
अध्यक्ष – फादर फ्रान्सिस दिब्रिटो
- मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘सुवार्ता’ या मासिकाचे संपादक म्हणून अनेक वर्षे काम केले
- ‘हरित वसई संरक्षण समिती’ च्या माध्यमातून पर्यावरण जतन, संरक्षण व संवर्धनाची मोठी चळवळ उभारली.
- १९९२ – पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
- ‘पथीकाची नामयात्रा’ या अनुवादित पुस्तकापासून लेखनाला सुरुवात झाली.
- पुस्तके – तेजाची पाऊले, संघर्ष यात्रा ख्रीस्तभूमीची, आनंदाचे अंतरंग – मदर तेरेसा, सृजनाचा मोहोर, ओअसिसच्या शोधात
- २०१३- ‘सुबोध बायबल- नवा करार’ या अनुवादित पुस्तकाला साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार जाहीर.
उद्घाटक – ना. धों. महानोर
बोध चिन्ह – संत गोरा कुंभार यांच्या हाती चिपळ्या घेऊन भक्तिरसात तल्लीन झालेली प्रतिमा. “म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणे, जग हे करणे शहाणे बापा” या संत गोरा कुंभार यांच्या अभंगांच्या ओळी बोधचिन्हावर आहेत . हे चिन्ह विजयकुमार यादव यांनी साकारलेले आहे.
यावर्षी पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान – सुमती लांडे (शब्दालय प्रकाशन)
संमेलनाबद्दल –
- पहिले संमेलन – १८७८, पुणे (अध्यक्ष – म. गो. रानडे)
- आयोजक – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
- महिला अध्यक्ष – कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे.
अखिल भारतीय नाट्य संमेलन
9९ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन –
ठिकाण – नागपूर
कालावधी – फेब्रुवारी २०१९
अध्यक्ष – प्रेमानंद गजवी
उद्घाटक – महेश एलकुंचवार
१०० वे अखिल भारतीय नाट्य संमेलन –
अध्यक्ष – जब्बार पटेल
- प्रसिद्ध सिने निर्माते, दिग्दर्शक
- नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष
- २०१४ – अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीतर्फे विष्णुदास भावे पदकाने गौरव
- पुणे विद्यापीठाच्या जीवन साधना पुरस्कारासह दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानेही गौरव
- अभिनय केलेली नाटके – तुझे आहे तुजपाशी, माणूस नावाचे बेट, वेड्याचे घर उन्हात
- दिग्दर्शित सिनेमे – उंबरठा, एक होता विदुषक, जैत रे जैत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पथिक, मुक्ता, मुसाफिर, सामना, सिंहासन
संमेलनाबद्दल –
- पहिले संमेलन – १९०५, पुणे (अध्यक्ष – ग. श्री. खापर्डे)
- महिला अध्यक्ष – गिरिजाबाई केळकर, दुर्गा खोटे, ज्योत्स्ना भोळे, विजया मेहता, भक्ती बर्वे, लालन सारंग, कीर्ती शिलेदार
९ वे विश्व मराठी साहित्य संमेलन –
ठिकाण – अंग्कोरवाट (कंबोडिया)
कालावधी – ऑगस्ट २०१९
अध्यक्ष – डॉ. गो. बं. देगलुरकर
उद्घाटक – श्रीपाल सबनीस
संमेलनाचा विषय – पुरातन स्थापत्यशास्त्र
आयोजक – विश्व मराठी परिषद (अध्यक्ष – निलेश गायकवाड) आणि शिवसंघ प्रतिष्ठान
आतापर्यंतची संमेलने –
- १ ले (2009) – सन फ्रान्सिस्को , अध्यक्ष – गंगाधर पानतावणे
- २ रे (२०१०) – दुबई , अध्यक्ष – मंगेश पाडगावकर
- ३ रे (२०११) – सिंगापूर , अध्यक्ष – महेश एलकुंचवार
- ४ थे (२०१२) – टोरांटो
- ५ वे (२०१5) – पोर्टब्लेयर , अध्यक्ष – शेषराव मोरे
- ६ वे (2016) – थीम्पू , अध्यक्ष – संजय आवटे
- ७ वे (2017) – बाली , अध्यक्ष – तात्याराव लहाने
- ८ वे (2018) – अबुधाबी , अध्यक्ष – भूषण गोखले
७ वे व्यसन मुक्ती साहित्य संमेलन –
ठिकाण – चंद्रपूर
कालावधी – २ ते ३ फेब्रूवारी , २०१९
अध्यक्ष – डॉ. अभय बंग
उद्घाटक – सुधीर मुनगंटीवार
पहिले संमेलन – २०१२, पुणे (अध्यक्ष – डॉ. अनिल अवचट)
८ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन –
ठिकाण – गांधी मैदान, कोल्हापूर
कालावधी – २८ ते ३० डिसेंबर , २०१९
अध्यक्ष – ह. भ. प. अमृतमहाराज जोशी
स्वागताध्यक्ष – डॉ. डी. वाय. पाटील
उद्घाटक – मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आयोजक – वारकरी साहित्य परिषद , पुणे
पहिले संमेलन – २०१२, नाशिक
सातवे संमेलन – अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया
एप्रिल चालू घडामोडी Pdf Download
- एप्रिल 2020 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
- भारताचा मानव विकास निर्देशांक 2019 HDI 2019
- स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी
- COVID -19 Apps India
- 65 Film Fair Awards 2020
सर्व चालू घडामोडी Pdf Download
- एप्रिल 2020 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
- भारताचा मानव विकास निर्देशांक 2019 HDI 2019
- स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी
- COVID -19 Apps India
- 65 Film Fair Awards 2020
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now