1 June 2021 चालू घडामोडी वाचा ( Chalu Ghadamodi )

1 June 2021 चालू घडामोडी, 1 June 2021 current affairs

1 June 2021 चालू घडामोडी
1 June 2021 चालू घडामोडी

1 June 2021 चालू घडामोडी वाचा (Chalu Ghadamodi)

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

  • कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या अनाथ मुलांना आधार देण्याच्या उद्देशाने 29 मे 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या.
  • कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक किंवा पालनपोषण करणारे किंवा कायदेशीर पालक / दत्तक पालक मृत्युमुखी पडल्यास त्यांच्या मुलांना  ‘पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन’ योजनेच्या अंतर्गत पाठिंबा दिला जाईल.
  • मुलगा किंवा मुलगी 18 वर्षांची झाल्यावर त्या प्रत्येकासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी उभारण्यासाठी विशेष रचना केलेल्या योजनेत ‘पीएम केअर्स’ योगदान देईल.
  • हा निधी उच्च शिक्षणाच्या कालावधीत त्याची किंवा तिची वैयक्तिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 18 वर्षापासून पुढील पाच वर्षांसाठी मासिक आर्थिक भत्ता / छात्रवृत्ती देण्यासाठी वापरला जाईल आणि 23 व्या वर्षात पदार्पण केल्यावर त्याला किंवा तिला वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी एक रकमी निधीची रक्कम मिळेल.
  • २०१२ ला दिन साजरा करण्याची घोषणा
  • थीम २०२१ व २०२० : Appreciate All Parents Throughout The World
  • थीम २०१९ : Honor Your Parents
  • १९९४ हे वर्ष ” जागतिक कुटुंब वर्ष “
  • आर्थिक दुर्बलांसाठीचे आरक्षण मराठा समाजास लागू.
  • पात्रतेसाठी वार्षिक 8 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाची अट.
  • जागतिक दूध दिवस – 1 जून.

1 June 2021 current affairs

  • जागतिक पालक दिवस – 1 जून.
  • सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) वृद्धीदर – (-) 7.3 टक्के.
  • 30-31 मे 2021 रोजी _ येथे हवामान बदलाच्या संदर्भात ‘आंतरराष्ट्रीय पी4 शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली – सोल, दक्षिण कोरिया.
  • जागतिक सीमा शुल्क संघटनेच्या (WCO) सहकार्याने दुबई कस्टम या संस्थेने 25 ते 27 मे 2021 या कालावधीत आयोजित केलेली ‘5 वी WCO  जागतिक ऑथराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर (AEO) परिषद’ याची संकल्पना – “Customs-bolstering-Recovery,-Renewal-“and-Resilience-for-a-sustainable-supply-chain”.
  • भारतीय इंटरनेट व मोबाइल संघ (IAMAI) संस्थेने डिजिटल पब्लिशर्स कंटेंट ग्रीव्हॅन्स काऊंसिल (DPCGC) याची स्थापना करण्याची घोषणा केली.
  • इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन (IBF) याच्या ‘डिजिटल मीडिया कंटेंट रेग्युलेटरी काऊंसिल’ (DMCRC) या नव्याने तयार झालेल्या स्वयं-नियामक मंडळाचे अध्यक्ष – न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) विक्रमजित सेन.
  • ‘WHO डायरेक्टर-जनरल स्पेशल अवॉर्ड 2021’ याचे प्राप्तकर्ता – डॉ. हर्ष वर्धन (केंद्रीय आरोग्य मंत्री).
  • केंद्रीय सरकारकडून नेमलेले बँक ऑफ इंडिया (BOI) याचे संचालक – वंदिता कौल (अतिरिक्त सचिव, केंद्रीय अर्थ मंत्रालय).
  • 2021-22 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग संघ (CII) याचे नवीन अध्यक्ष – टी. व्ही. नरेंद्रेंन (CEO, टाटा स्टील लिमिटेड).
  • भारतीय पर्वतारोही ज्याने दुर्मिळ ‘कार्बन न्यूट्रल’ चढाईत एव्हरेस्ट शिखर यशस्वीरित्या गाठले – हर्षवर्धन जोशी (वय 24 वर्ष).
  • दुबईत ‘आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2021’ स्पर्धेत 75 किलोग्राम वजनी महिला गटात सुवर्णपदकाची विजेती – पूजा राणी.
  • केरळ विधानसभेने लक्षद्वीप प्रशासकाला परत बोलावण्याच्या मागणीसाठी सर्वानुमते एक ठराव संमत केला, ज्यातून प्रफुल्ल के. पटेल यांना परत बोलावण्याची मागणी करण्यात आली.

1 June 2021 current affairs

  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीचे (ममता बॅनर्जी) मुख्य सल्लागार – अलापन बंद्योपाध्याय.
  • पंजाब सरकारने सार्वजनिक सेवा लोकांच्या दारात पोहचविण्यासाठी “खिदमत आपकी देहलीज पर” कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
  • इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) या संस्थेने शेतकऱ्यांसाठी जगातील पहिले ‘नॅनो यूरिया’ सादर केले, ज्यामुळे नॅनो यूरियाची 500 मिलीलीटरची बाटली परंपरागत युरियाच्या एका थैलीची जागा घेणार.
  • भारतीय तंत्रज्ञान संस्था, रोपार, पंजाब या संस्थेने नाशिवंत उत्पादने, लस, रक्त आणि अवयव यांची ने-आण करताना प्रत्यक्ष तिथल्या तापमानाची नोंद करणारे अशा प्रकारचे ‘अंबीटॅग’ (AmbiTag) नामक पहिले माहिती तंत्रज्ञान उपकरण विकसित केले.
  • जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च, बेंगळुरू या संस्थेच्या वैज्ञानिकांनी नवीन आर्टिफिश्यल सिनॅप्टिक नेटवर्क (ASN) यंत्र विकसित केले जे मानवी मेंदूची नक्कल करू शकेल.
  • IIT, हैदराबाद येथील संशोधकांनी ब्लॅक फंगस (म्यूकोर्मायकोसिस) आणि इतर बुरशीचा उपचार करण्यासाठी तोंडावाटे घेतली जाणारी औषधी विकसित केली
  • आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (ICC किंवा ICCt) – स्थापना: 1 जुलै 2002; ठिकाण: हेग, नेदरलँड.
  • आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना (ICPO-इंटरपोल) – स्थापना: वर्ष 1923; मुख्यालय: ल्योन, फ्रान्स.
  • कायमस्वरुपी तंटा निवारण न्यायालय (PCA) – स्थापना: वर्ष 1899; ठिकाण: हेग, नेदरलँड.
  • रेल्वे सहकार्य संघटना (OSJD किंवा OSShD) – स्थापना: 28 जून 1956; ठिकाण: वॉर्सा, पोलंड.
  • आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संघटना (ICAO) – स्थापना: 4 एप्रिल 1947; मुख्यालय: मॉन्ट्रियल, कॅनडा.

1 June 2021 current affairs

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply