10 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download

10 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 10 October 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

चालू घडामोडी PDF Download
चालू घडामोडी PDF Download

10 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download

मुकेश अंबानी

10 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 ऑक्टोबर 2021)

जगातील शंभर अब्ज डॉलर संपत्तीधारकांत मुकेश अंबानी :

  • आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांचा 100 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक असलेल्या गटात समावेश झाला आहे.
  • तर त्यामुळे ते आता जेफ बेझॉस, इलन मस्क यांच्या यादीत जाऊन बसले आहेत.
  • मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष असून ते आता मोजक्या 11 उद्योगपतींच्या गटात आले आहेत ज्यांची संपत्ती शंभर अब्ज डॉलर आहे.
  • तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल उद्योगात त्यांच्या वडिलांचा वारसा त्यांना मिळाला. त्यातून नंतर ते किरकोळ विक्री क्षेत्र, तंत्रज्ञान, इ व्यापार यातही उतरले.
  • तसेच त्यांनी 2016 मध्ये दूरसंदेशवहन सेवा सुरू केली असून आता भारतात ती जोमाने सुरू आहे. त्यांनी गेल्या वर्षी किरकोळ विक्री क्षेत्र व तंत्रज्ञान या क्षेत्रात 27 अब्ज डॉलरची उलाढाल केली होती.
  • फेसबुक, गुगल, केकेआर व सिल्वर लेक कंपन्यांना त्यांनी काही समभाग विकले होते.
  • जूनमध्ये त्यांनी ऊर्जा क्षेत्रात 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक तीन वर्षात करण्याचे जाहीर केले आहे. स्वस्तात हरित हायड्रोजनची निर्मिती करण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2021)

भारत-चीनमध्ये आज लष्करी चर्चा :

  • भारत आणि चीन यांच्यात आज पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर लष्करी पातळीवर चर्चेची तेरावी फेरी होणार आहे.
  • तर सकाळी साडेदहा वाजता पूर्व लडाखमध्ये चीनच्या बाजूला असलेल्या मोल्दो येथे ही चर्चा होईल.
    सैन्यमाघारीची प्रक्रिया वेगाने व्हावी, अशी भारताची अपेक्षा असून देपसांग आणि डेमचोक येथून चीनने सैन्य माघारी घ्यावे यासाठी आग्रह धरण्यात येत आहे.
  • तसेच 31 जुलै रोजी चर्चेच्या बाराव्या फेरीत गोगरा येथून सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर यश आले होते.

भारताच्या वेगवान गोलंदाज उमरान मलिकची टी 20 वर्ल्डकप संघात निवड :

  • आयपीएल 2021 स्पर्धेत आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजाची भारतीय संघात निवड झाली आहे.
  • तर टी 20 वर्ल्डकप संघात उमरान मलिकची निवड करण्यात आली आहे.
  • उमरान मलिक सनराइजर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे. ही निवड नेट गोलंदाज म्हणून करण्यात आली आहे.
  • उमरानने त्याचं पहिलं वैयक्तिक षटक टाकताना पहिला चेंडू 145 किमीच्या वेगाने टाकला. दुसरा चेंडू 142, तर तिसरा चेंडू 150च्या वेगाने टाकला. चौथा चेंडू 147, पाचवा चेंडू 143 आणि सहावा चेंडू 142 च्या वेगाने टाकला.

10 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी

कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धात भारताचे वर्चस्व :

  • अनिश भानवाला, आदर्श सिंग आणि विजयवीर सिद्धू या त्रिकुटाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम दाखवला.
  • त्यामुळे कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताला सर्वाधिक 30 पदकांसह वर्चस्व प्राप्त करता आले.
  • महिलांच्या डबल टॅ्रप प्रकारात भारतानेच तिन्ही पदकांवर नाव कोरले.
  • मानवी सोनीने सुवर्ण, येशाया कॉन्ट्रॅक्टरने रौप्य आणि हितासाने कांस्यपदकाची कमाई केली.
  • पुरुषांच्या डबल टॅ्रप प्रकारात विनय प्रताप सिंग चंद्रावतने 120 गुणांसह सुवर्णपदक प्राप्त केले, तर सेहजप्रीत सिंग आणि मयांक शोकीन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले़.
  • 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स मिश्र प्रकारात आयुषी पॉडर व ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांनी रौप्यपदक मिळवले.

दिनविशेष:

  • 10 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन‘ तसेच ‘जागतिक लापशी दिन‘ आहे.
  • सन 1846 मध्ये इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.
  • भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1899 मध्ये झाला.
  • श्यामची आई चित्रपटाला 1954 या साली राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.
  • सन 1998 मध्ये ‘आदर्श सेन आनंद‘ भारताचे 29वे सरन्यायाधीश बनले होते.

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply