12 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download

12 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 12 August 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

12 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

12 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी

भारत आणि अमेरिका यांच्यात करार :

  • भारत आणि अमेरिका यांच्यात मोसमी पाऊस माहितीचे विश्लेषण, हवामान अंदाज याबाबत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून त्यामुळे हवामान अंदाजाच्या प्रक्रियेत बदल होणार आहेत.
  • भारताच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेचे संचालक जी. ए. रामदास व अमेरिकेचे सहायक संशोधन प्रशासक तसेच नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एनओएए) या संस्थेचे हंगामी मुख्य वैज्ञानिक क्रेग मॅकलीन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
  • तर या दोन संस्थांतील करारामुळे रिसर्च मुर्ड अ‍ॅरे फॉर आफ्रिकन-आशियन-ऑस्ट्रेलियन मान्सून अ‍ॅनॅलिसीस अँड प्रेडिक्शन (रामा) तसेच ओशन मूर्ड बॉय नेटवर्क या दोन संस्थांत तांत्रिक सहकार्य वाढणार आहे.
  • पृथ्वी विज्ञान मंत्रालय व एनओएए यांच्यात गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या तंत्रज्ञान सहकार्य समझोत्यानुसार एक करार करण्यात आला होता. आताचा करार हा त्या कराराचा पुढचा भाग आहे.
  • तसेच समोझाता करारावर भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू, अमेरिकेचे सहायक व्यापारमंत्री व एनओएएचे हंगामी प्रशासक डॉ. नील ए जेकब यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पंतप्रधान मोदींची आज नारीशक्तीशी ‘मन की बात’:

  • पंतप्रधान मोदी आज देशातील आत्मनिर्भर महिलांशी संवाद साधणार आहेत.
  • तर दीनदयाल अंत्योदय योजना तसेच राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (DAY-NRLM) अंतर्गत बढती मिळालेल्या महिला बचत गट आणि त्यातील सदस्यांशी ते दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील.
  • तसेच कार्यक्रमादरम्यान, देशभरातील महिला बचत गट सदस्यांच्या यशोगाथांचा संग्रह, शेतीच्या उपजीविकेचे सार्वत्रिकीकरण करण्यावरील हँडबुकचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकाशन केले जाईल.
  • यावेळी पंतप्रधान मोदी 4 लाख बचत गटांना 1625 कोटी रुपयांच्या कॅपिटलायझेशन सपोर्ट फंडचे वाटप करतील.
  • याशिवाय, ते महिला बचत गटातील साडेसात हजार सदस्यांना सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना (PMFME) अंतर्गत 25 कोटी रुपये हस्तांतरीत करतील.

12 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या संमिश्र लसीसंबंधी मोठी बातमी :

  • कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा संमिश्र वापर अधिक परिणामकारक ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्यानंतर भारतीय औषध नियामक मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला असून अभ्यासासाठी परवानगी दिली आहे. तसेच वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये यासंबंधीचा अभ्यास आणि वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.
  • 29 जुलैला केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संस्थेच्या (CDSCO) तज्ज्ञ समितीने अभ्यास करण्यासाठी शिफारस केली होती.
  • उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर येथे 18 व्यक्तींना चुकून दोन वेगवेगळ्या लशींच्या मात्रा देण्यात आल्या होत्या. त्यांचा तुलनात्मक अभ्यास एकाच लशीच्या दोन मात्रा दिलेल्या व्यक्तींशी करण्यात आला.
  • संमिश्र लस घेतलेल्यांमध्ये अल्फा, बिटा आणि डेल्टा विषाणूंविरोधात अधिक परिणामकारकता आढळली. शिवाय आयजीजी प्रतिपिंडेही मोठय़ा प्रमाणात दिसून आली. होते, असेही या अभ्यासातील निष्कर्ष आहेत.

2028च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसाठी दावेदारी :

  • लॉस एंजेलिस येथे 2028ला होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी दावेदारी करण्यात येणार असल्याचे मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) निश्चित केले.
  • ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी ‘आयसीसी’ने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे.
  • तर स्वायत्त संघटनेचा दर्जा गमावून भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिपत्याखाली जाण्याच्या भीतीने आतापर्यंत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) ऑलिम्पिकला विरोध केला होता. पण ‘बीसीसीआय’ने या अभियानाला पाठिंबा दर्शवल्याचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे.

दिनविशेष :

  • 12 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय हत्ती दिन
  • *12 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय युवा दिन
  • 12 ऑगस्ट 1851 मध्ये आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
  • पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी 12 ऑगस्ट 1953 मध्ये करण्यात आली.
  • नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको – 12 ऑगस्ट 1960 मध्ये ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.

12 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply