12 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download

12 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 12 September 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

12 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी
12 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी

12 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

‘Medicine From The Sky’ योजनेची तेलंगणात सुरुवात :

  • तेलंगणात ‘मेडिसिन फ्रॉम द स्काय’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
  • तर यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि तेलंगणाचे मंत्री के टी रामाराव यांची उपस्थिती होती.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून ड्रोन वापरून दुर्गम भागात लस आणि आवश्यक वस्तू पोहोचवता येणार आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ड्रोन धोरण तयार करण्यात आले आहे. तीन महिन्यांनंतर याचं विश्लेषण केले जाईल.
  • त्यानंतर विमान मंत्रालय, आयटी मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, राज्य सरकार आणि केंद्र मिळून संपूर्ण देशासाठी एक मॉडेल तयार करतील.असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं.

खाजगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिले जाणार अतिरिक्त असलेले रेल्वेचे डबे :

  • खासगी कंपन्या आता भारतीय रेल्वेचे अतिरिक्त असलेले डबे खरेदी करू शकणार आहेत.
  • भारतीय रेल्वेने तयार केलेल्या धोरणानुसार खासगी कंपन्या लवकरच सांस्कृतिक, धार्मिक आणि इतर पर्यटनावर आधारीत ट्रेन चालवण्यासाठी रेल्वेचे डबे भाड्याने आणि खरेदी करू शकणार आहेत.
  • रेल्वेने जारी केलेल्या निवेदनानुसार, अतिरिक्त असलेले रेल्वेचे डबे आणि बेअर शेल भाड्याने देण्याची योजना आखण्यात आली आहे.
  • बेअर शेल हे असे डबे असतात काही कारणास्तव वापरात येत नाही. रेल्वे असे डबे भंगारात विकते. पण डबे हे योग्य स्थितीत असून अतिरिक्त असल्याने वापराता नाहीत. आता असे डबे हे खासगी कंपन्यांना देण्यात येणार आहेत.
  • तसेच रेल्वेने शनिवारी प्रसिद्धीपत्रकात प्रकल्पाचे धोरण आणि नियम व अटी तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कार्यकारी संचालक-स्तरीय समिती स्थापन केली आहे असे म्हटले आहे.

12 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी

मथुरेत दारू, मांस विक्रीवर बंदी :

  • उत्तर प्रदेश सरकारने मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराजवळील 10 चौरस किमी क्षेत्र तीर्थस्थळ म्हणून घोषित केलं आहे.
  • तर या भागात दारू आणि मांस विक्रीवर करण्यास मनाई असणार आहे.
  • तसेच या भागात येणाऱ्या भाविकांची आस्थेचा विचार करता योगी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
  • श्रीकृष्ण जन्माष्टमीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मथुरेला आले होते. यावेळी साधूसंतांनी केलेल्या मागणीनुसार मथुरेत मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती.

‘व्हायकॉम18’कडे ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे प्रक्षेपण अधिकार :

  • 2022मध्ये कतारला होणाऱ्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या प्रक्षेपणाचे अधिकार रिलायन्सचे पाठबळ असलेल्या ‘व्हायकॉम18’ नेटवर्कने 450 कोटी रुपयांना मिळवले आहेत.
  • सोनी, स्टार स्टार स्पोर्ट्स या बडय़ा वाहिन्यांना धक्का देत ‘व्हायकॉम18’ने देशातील क्रीडा प्रक्षेपण उद्योगात प्रथमच आव्हान निर्माण केले आहे.
  • 2010 पर्यंत विश्वचषक फुटबॉल स्पर्धा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रक्षेपित होत होती. 2012 मध्ये सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने 2014 (रिओ) आणि 2018 (रशिया) या दोन विश्वचषक स्पर्धाचे प्रक्षेपण अधिकार मिळवले.
  • तसेच स्पेनमधील ला लिगा, इटलीमधील सेरी ए, फ्रान्समधील लीग-वन, अबू धाबी टेन-10 लीग, रस्ते सुरक्षा जागतिक क्रिकेट मालिका, कॅरेबाओ चषक या स्पर्धा ‘व्हायकॉम18’वर प्रक्षेपित होतात.

दिनविशेष:

  • गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म 12 सप्टेंबर 1818 मध्ये झाला.
  • सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचा पारनेर अहमदनगर येथे 12 सप्टेंबर 1880 मध्ये जन्म झाला.
  • इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1912 मध्ये झाला.
  • सन 1998 मध्ये डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान झाला.
  • सन 2002 मध्ये मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply