13 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download

13 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 13 September 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

13 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी
13 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी

13 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल :

  • भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांचे नाव रविवारी जाहीर केले. त्यांचा शपथविधी आज दुपारी होईल.
  • विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पटेल यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.
  • मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
  • भूपेंद्र पटेल हे 2017च्या विधानसभा निवडणुकीत घाटलोडिया मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार शशिकांत पटेल यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव करून निवडून आले होते.

नव्या शिक्षण धोरणानुसार बदल :

  • नवीन शिक्षण धोरण 2020 अंतर्गत मध्य प्रदेशमधील महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे.
  • नवीन अभ्यासक्रमाअंतर्गत बीएच्या पहिल्याव वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाभारत, रामचरितमानस, योग आणि ध्यान यासंदर्भात शिकवलं जाणार आहे.
  • तर नवीन अभ्यासक्रमानुसरा ‘श्री रामचरितमानस अप्लाइड फिलॉसफी’हा पर्यायी विषय म्हणून ठेवण्यात आलाय.
  • इंग्रजीच्या फाउंडेशन कोर्समध्ये पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सी. राजगोपालचारी यांनी लिहिलेली महाभारताची प्रस्तावना शिकवली जाणार आहे.
  • तसेच राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजी आणि हिंदीबरोबरच योग आणि ध्यान या दोन विषयांना तिसऱ्या फाउंडेशन कोर्सच्या रुपामध्ये शिकवलं जाणार आहे.
  • यामध्ये ‘अमो ध्यान’ आणि मंत्रांसंदर्भातील अभ्यासाचा समावेश आहे.
  • श्री रामचरितमानसअंतर्गत असणाऱ्या धड्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे मूळ या क्षेत्राशी संबंधित विषयांमध्ये अध्यात्मिकता आणि धर्म यासारख्या विषयांचा समावेश असणार आहे.
  • ‘वेद, उपनिषदं आणि पुराणांचे चार युग’, ‘रामायण आणि श्री रामचरितमानसमधील फरक’ आणि ‘दिव्य अस्तित्वाचा अवतार’ हे विषयही शिकवले जाणार आहेत.
  • नवीन अभ्यासक्रमानुसार हे विषय व्यक्तिमत्व विचार आणि चारित्र्य अधिक सक्षम बनवण्यासाठी शिवकण्यात येणार आहेत.

13 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी

डॅनिल मेदवेदेवने पटकावले पहिले ग्रँडस्लॅम :

  • सर्बियाचा अग्रमानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचचे सर्वाधिक 21वे ग्रँडस्लॅम जेतेपद आणि ‘कॅलेंडर स्लॅम’ हे दोन विक्रम पूर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण होता होता राहिले.
  • रशियाच्या दुसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवने जोकोविचचा पराभव करत आपले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.
  • जोकोविचने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते.
  • जर जोकोविचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धा जिंकली असते तर त्याने आपल्या कारकिर्दीतील विक्रमी 21 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले असते.

ब्रिटिश महिला खेळाडूला मिळाले जेतेपद :

  • ब्रिटनच्या एमा राडुकानूने कॅनडाच्या लेला फर्नांडीसचा पराभव करत यूएस ओपनमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकावले.
  • तर एमा राडुकानूने लेला फर्नांडिसचा 6-4, 6-3 असा पराभव केला.
  • महिला एकेरीच्या ऐतिहासिक अंतिम फेरीत, यावेळी यापूर्वी कधीही ग्रँड स्लॅम फायनल खेळले नव्हते असे दोन तरुण खेळाडू समोरासमोर आले होते.
  • राडुकानूने प्रथमच ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि हे तिच्या कारकिर्दीतील पहिले विजेतेपद देखील आहे.

दिनविशेष:

  • मोनाको ग्रांप्री चे संस्थापक अँटोनी नोगेस यांचा जन्म 13 सप्टेंबर 1890 मध्ये झाला.
  • सन 1948 मध्ये ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.
  • *सन 1996 मध्ये श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिख यांना दिला.
  • सन 2003 मध्ये ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी आणि मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला.

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply