17 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 17 September 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.
17 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांची नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा :
- सामायिक हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि संरक्षणविषयक क्षमतांचे अधिक आदानप्रदान करण्याची मुभा देण्यासाठी भारत- प्रशांत क्षेत्रासाठी एका नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया यांनी केली आहे.
- तर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा या क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढत असतानाच, ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्या मिळवण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.
- तिन्ही देशांच्या आद्याक्षरांचा समावेश असलेली आणि ‘महत्त्वाची’ असे वर्णन करण्यात आलेल्या ‘एयूकेयूएस’ या नव्या आघाडीचे उद्घाटन दूरचित्रवाणीवरील संयुक्त भाषणासह आभासी पद्धतीने बुधवारी करण्यात आले.
- तसेच या आघाडीअंतर्गत, संयुक्त क्षमतांचा विकास व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, तसेच सुरक्षा आणि संरक्षणसंबंधित विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक तळ आणि पुरवठा साखळ्या यांचे अधिक सखोल एकीकरण करण्याचे तिन्ही देशांनी मान्य केले आहे.
- ‘ऑकस’चा पहिला मोठा उपक्रम म्हणून, ऑस्ट्रेलिया अमेरिका व ब्रिटनच्या मदतीने अणुइंधनावर चालणाऱ्या पाणबुड्यांचा एक ताफा बांधणार आहे.
- तर भारत- पॅसिफिक क्षेत्रात स्थैर्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही क्षमतावाढ करण्यात येत आहे.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (16 सप्टेंबर 2021)
विश्वचषकानंतर विराट टी-20 कर्णधारपद सोडणार :
- संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहलीने गुरुवारी ट्विटरवरून जाहीर केले.
- परंतु कसोटी आणि एकदिवसीय संघांचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
- 2017 मध्ये कोहलीने भारताच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांची कर्णधारपदाची सूत्रे महेंद्रसिंह धोनीकडून स्वीकारली.
- तसेच यानंतरच्या 67 सामन्यांपैकी 45 सामन्यांतच विराटला खेळवले गेले.
- माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय टी-20 संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली.
17 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी
उत्तर कोरियाने ट्रेनमधून केली क्षेपणास्त्र चाचणी :
- उत्तर कोरियाने प्रथमच रेल्वेवर बांधलेल्या क्षेपणास्त्र प्रणालीसह बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने यावर चिंता व्यक्त केली आहे.
- तर दुसरीकडे चाचणी यशस्वी झाल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे.
- तसेच या क्षेपणास्त्राची 800 किलोमीटरपर्यंत रेंज आहे. उत्तर कोरियाने एका समुद्री भागाला लक्ष्य केलं होतं.
- क्षेपणास्त्राचा उद्देश रेल्वे आधारित क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी घेण्याचा होता, असं उत्तर कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितलं आहे. यातून कोणत्याही प्रकारचा इशारा देण्याचा हेतू नाही, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
- दक्षिण कोरियाने बुधवारी सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. अण्वस्त्रांशिवाय ही प्रणाली विकसित करणारा पहिला देश आहे.
- तर त्यामुळे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियात शस्त्रास्त्र स्पर्धा वेगाने वाढत आहे. दोन्ही देश नवीन शस्त्रास्त्रांची तसेच उच्च क्षमतेच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेत आहेत.
- उत्तर कोरियाने रविवारीही लांब पल्ल्याच्या नवीन क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्त्र 1500 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.
चीन सरकारनं घेतला मोठा निर्णय :
- चीन बदलत्या लोकसंख्याशास्त्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर प्रयत्न करत आहे. चीनची एक मोठी चिंता म्हणजे देशात तरुणांची घटती संख्या आहे.
- तर यासाठी त्यांनी मे महिन्यात आपल्या धोरणात मोठा बदल केला. या बदललेल्या धोरणाअंतर्गत चीनमधील जोडप्यांवर आता तीन मुलांना जन्म देण्यासाठी विविध प्रकारे दबाव आणला जात आहे.
- तसेच या धोरणांतर्गत, चीनच्या स्थानिक सरकारने तिसरे अपत्य असलेल्या जोडप्यांना रोख रक्कम तसेच इतर सुविधा देणे सुरू केले आहे.
- चीनच्या गांसु प्रांतातील लिंजे काउंटीने तीन मुलं असलेल्या जोडप्यांसाठी राज्याचा खजिना उघडला आहे.
- ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, येथे जोडप्याचे तिसरे अपत्य जन्माला येताच त्यांना एकहाती 5,000 युआन दिले जात आहे.
17 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी
धोनी ‘राष्ट्रीय छात्र सेना’साठी सूचना करणार :
- ‘राष्ट्रीय छात्र सेना’ म्हणजे ‘एनसीसी’मध्ये दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी, या युवा शक्तीचा राष्ट्र उभारणीसाठी उपयोग व्हावा यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी संरक्षण विभागाने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.
- तसेच 14 सदस्यांची समिती असून या समितीचे अध्यक्ष माजी खासदार बैजयंत पांडा यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
- विशेष म्हणजे क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.
- तर महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुध्दे, दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे अशा प्रमुख सदस्यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.
- देशांत ज्युनियर ( शालेय स्तर ) आणि सिनियर ( महाविद्यालय ) अशा दोन स्तरावर राष्ट्रीय छात्र सेनेचे 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
- सामाजिक आणि नागरी कर्तव्ये याची जाणीव राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थांना विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून करुन दिली जाते.
- याचबरोबर विद्यार्थ्यांना भविष्यात सैन्य दलांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध पातळीवर सैनिकी प्रशिक्षण देत सैन्य दलाची तोंड ओळख करुन दिली जाते.
स्टेट बँकेच्या ग्राहकांना उत्सवांच्या निमित्ताने एक खास ऑफर :
- स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या गृहकर्ज ग्राहकांसाठी एक खास भेट दिली आहे.
- तर सणांच्या काळात गृहकर्ज अधिक किफायतशीर करणं हा या ऑफर मागचा मुख्य उद्देश आहे. या ऑफरनुसार, स्टेट बँक आपल्या ग्राहकांना फक्त 6.70 टक्के व्याजदराने गृहकर्ज देणार आहे.
- तसेच सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात कर्जाच्या रकमेवर कोणतीही मर्यादा असणार नाही. स्टेट बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, एसबीआय सध्या 7.15 टक्के व्याज दराने 75 लाखांहून अधिक गृहकर्ज देतं.
- पण उत्सवांच्या ऑफर्स सुरू झाल्यानंतर 75 लाख रुपयांपेक्षा जास्त गृहकर्ज घेणाऱ्या कर्जदारांना किमान 6.7% दराने गृहकर्ज मिळेल.
- भारतीय स्टेट बँकेने प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केलं आहे. कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित सवलतीच्या दराने आकर्षक व्याज देईल.
17 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी
दिनविशेष :
- 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिदिन म्हणून पाळला जातो.
- स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 मध्ये झाला.
- महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म 17 सप्टेंबर 1882 मध्ये झाला.
- सन 1948 मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन.
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download