१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध संपूर्ण माहिती ( 1857 स्वातंत्र्य समर )

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध संपूर्ण माहिती ( 1857 स्वातंत्र्य समर )

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध संपूर्ण माहिती ( 1857 स्वातंत्र्य समर )

हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. १० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरु झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. 

अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला. १ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले  

इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

    Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

    नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    About Prithviraj Gaikwad

    Check Also

    संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रश्नपत्रिका

    Sanyukat Maharashtra Chalval: संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रश्नपत्रिका फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब …

    मध्ययुगीन भारताचा इतिहास सराव प्रश्नसंच Videos

    मध्ययुगीन भारताचा इतिहास सराव प्रश्नसंच Videos: मध्ययुगीन भारताचा इतिहास सराव प्रश्नसंच मालिका सुरू करत आहो …

    आधुनिक भारताचा इतिहास विडिओ

    आधुनिक भारताचा इतिहास विडिओ भारताच्या इतिहासाची मालिका सुरू करत आहो Adhunik Bhartacha Itihas Video आधुनिक …

    Contact Us / Leave a Reply