2 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

2 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 2 जुलै 2021 चालू घडामोडी पीडीएफ डाऊनलोड करा.

2 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

2 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

दिनविशेष

  • आज २ जुलै – जागतिक युएफओ (UFO) दिन
  • १६९८: थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिन चे पेटंट मिळवले.
  • १८५०: बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
  • १८६५: साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
  • १९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
  • १९६२: रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.
  • १९७२: पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • १९८३: कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.
  • १९९४: चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.
  • २००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.
  • २००२: स्टीव फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.

२ जूलै – जन्म

  • १८६२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग यांचा जन्म. १८७७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेस यांचा जन्म.
  • १८८०: श्रेष्ठ गायक, नट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा शेवगाव, अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)
  • १९०४: फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ता यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९९६)
  • १९०६: नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.
  • १९२२: फ्रेन्च फॅशन डिझायनर पिअर कार्डिन यांचा जन्म.
  • १९२३: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म.
  • १९२५: काँगोचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमूंबा यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)
  • १९२६: विनोदी लेखक वि. आ. तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म.
  • १९३०: अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्म.

२ जुलै – मृत्यू

  • ⚜ १५६६: जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नाॅस्टाॅडॅमस यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५०३)
  • ⚜ १७७८: फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन. (जन्म: २८ जून १७१२)
  • ⚜ १८४३: होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान याचं निधन. (जन्म: १० एप्रिल १७५५)
  • ⚜ १९५०: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)
  • ⚜ १९६१: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखकअर्नेस्ट हेमिंग्वे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८९९)
  • ⚜ १९९९: अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर१९२०)
  • ⚜ २००७: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
  • ⚜ २०११: कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२५)
  • ⚜ २०१३: कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२५)

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply