3 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

3 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 3 जुलै 2021 चालू घडामोडी पीडीएफ डाऊनलोड करा.

3 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

3 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

दिनविशेष

  • १६०८: सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्‍वेबेक शहराची स्थापना केली. १८५०: ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
  • १८५२: महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
  • १८५५: भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
  • १८८४: डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.
  • १८८६: जर्मनीच्या कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
  • १८९०: ओहायो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.
  • १९२८: लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.
  • १९३८: मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी २०२ किमी वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.
  • १९९८: कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • २०००: विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.
  • २००१: सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
  • २००६: एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.

३ जूलै – जन्म

  • १६८३: इंग्लिश कवी एडवर्ड यंग यांचे जन्म.
  • १८३८: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)
  • १८८६: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक रामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९५७)
  • १९०९: कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००४)
  • १९१२: मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७७)
  • १९१४: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)
  • १९१८:भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. रंगारा राव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९७४)
  • १९२४: तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे ६वे राष्ट्राध्यक्ष सेल्लप्पन रामनाथन यांचा जन्म.
  • १९२४: भारतीय क्रिकेटपटू अर्जुन नायडू यांचा जन्म.
  • १९२६: लेखिका स्वातंत्र्य सैनिक सुनीता देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)
  • १९५१: न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू सर रिचर्ड हॅडली यांचा जन्म.
  • १९५२: भारतीय गायक अमित कुमार यांचा जन्म.
  • १९५२: भारतीय कॅनेडियन लेखक रोहिनटन मिस्त्री यांचा जन्म.
  • १९७१: विकीलीक्स चे संस्थापक ज्युलियन असांज यांचा जन्म.
  • १९८०: भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा जन्म.

३ जुलै – मृत्यू

  • १३५०: संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ ऑक्टोबर १२७०)
  • १९३३: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचे निधन. (जम: १२ जुलै १८५२)
  • १९३५: सिट्रोएन कंपनीचे संस्थापक आंद्रे सीट्रोएन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८७८)
  • १९६९: द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक ब्रायन जोन्स यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)
  • १९९६: हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२६)

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply