3 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download

3 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 3 October 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

3 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी
3 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी

3 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

‘टू डीजी’ औषध उत्पादन तंत्रज्ञान कंपन्यांना हस्तांतरित :

  • कोविड 19 प्रतिबंधासाठीच्या 2 डीजी औषध निर्मितीचे तंत्रज्ञान उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात आले असून त्यात सात ते आठ कंपन्यांचा समावेश आहे.
  • भारताच्या महा औषध नियंत्रकांनी या औषधाच्या उत्पादनास आधीच हिराव कंदील दिला आहे.
  • संरक्षण संशोधन व विकास संस्था, टाटा अ‍ॅडव्हान्सड सिस्टीम्स तसेच भारत फोर्ज यांनी आधुनिक तोफांचे तंत्रज्ञान विकसित केले असून त्यात 155 हॉवित्झर तोफांचा समावेश केला आहे.
  • तर या तोफा जास्त पल्ल्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. त्यांच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून येत्या काही दिवसात त्या लष्कराला सुपूर्द करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 ऑक्टोबर 2021)

लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचं अनावरण :

  • 2 ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचं अनावरण करण्यात आलं आहे.
  • महात्मा गांधीजींच्या 152व्या जयंतीनिमित्ताने हा तिरंगा तिथे लावण्यात आला असून त्याचं उद्घाटन लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.
  • भारतीय लष्कराच्या 57 इंजिनिअर रेजिमेंटने हा सर्वात मोठा खादीचा ध्वज तयार केला असून तो लेहमध्ये समुद्रसपाटीपासून 2000 फूट उंचीवर ठेवण्यात आला आहे.
  • लेहमध्ये 2000 फूट उंचावर ठेवण्यात आलेल्या या ध्वजाची लांबी तब्बल 225 फूट आहे. तर ध्वजाची रुंदी 150 फूट इतकी आहे.
  • तसेच हा ध्वज पूर्णपणे खादीचा असून त्याचं वजन तब्बल 1 हजार किलो इतकं आहे.
  • तर 57 इंजिनिअर रेजिमेंटच्या 150 जवानांनी मिळून हा ध्वज 2000 फूट उंचीच्या टेकडीवर नेला.

3 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी

कंगना रनौत उत्तर प्रदेशच्या ODOP मोहिमेची झाली ब्रँड अम्बेसेडर :

  • अभिनेत्री कंगना रनौत आता उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर झाली आहे.
  • कंगनानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडूनच ही घोषणा करण्यात आली आहे.
  • ODOP अर्थात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या मोहिमेसाठी कंगनाची निवड करण्यात आली आहे.
  • तर या मोहिमेमध्ये उत्तर प्रदेशमधील स्थानिक कारागिरीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
  • तसेच प्रत्येक जिल्ह्याची विशेष हस्तकला किंवा कारागिरी त्या जिल्ह्याची विशेषता म्हणून लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
  • उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांमध्ये तयार होणाऱ्या चिकनकारी, झारी झरदोझी, काला नमक राईस अशा अनेक गोष्टी इतर कुठेही होत नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

आता WhatsApp वर दिसणार भारतीय रुपयाचं चिन्ह :

  • लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) अनेक नवीन अपडेट्स जारी केली आहेत.
  • तर या अपडेट्समार्फत, व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझर्सना अनेक नवीन फीचर्स दिली आहेत. ही फीचर्स लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहेत.
  • त्यापैकी एक नवं जबरदस्त फिचर म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स (WhatsApp Payments) आहे. या फीचरद्वारे, आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अगदी सहज पैसे पाठवू शकतो.
  • व्हॉट्सअ‍ॅपची कंपनी असलेल्या फेसबुकने आपल्या भारतीय युझर्ससाठी एक खास अपडेट जारी केलं आहे. हा बदल व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स फीचरशी संबंधित आहे.
  • कंपनीने ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल (GFF) 2021 मध्ये जाहीर केलं आहे की, आतापासून सर्व व्हॉट्सअ‍ॅप युझर्सच्या चॅट बॉक्समध्ये ‘₹’ हे भारतीय रुपयाचं चिन्ह समाविष्ट केलं जाईल. ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट फीचर वापरणं सोपे होईल.

दिनविशेष:

  • हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 मध्ये झाला.
  • इराकला सन 1932 मध्ये युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने सन 1935 या वर्षी इथिओपिया पादाक्रांत केले.
  • सन 1952 मध्ये युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply