4 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download

4 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 4 October 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

4 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी
4 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी

4 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी

स्मृती मंधाना

4 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 ऑक्टोबर 2021)

‘झायकोव्ह-डी’ लशीची किंमत झाली प्रस्तावित :

  • ‘झायकोव्ह-डी’ या करोना प्रतिबंधक लशीच्या किमतीबाबत केंद्र सरकार व झायडस कॅडिला कंपनी यांची चर्चा सुरू असतानाच, तीन मात्रांच्या या लशीसाठी 1900 रुपये अशी किंमत या कंपनीने सुचवली असल्याचे कळते.
  • तथापि, ही किंमत कमी करण्याबाबत सरकार वाटाघाटी करत असून, याबाबत अंतिम निर्णय या आठवडय़ात घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
  • झायडस कॅडिलाच्या पहिल्या डीएनएवर आधारित सुईविरहित करोना प्रतिबंधक लशीचा लवकरच देशव्यापी लसीकरण मोहिमेत समावेश केला जाईल, असे सरकारने गुरुवारी सांगितले होते.
  • झायकोव्ह-डी ची किंमत कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या लशींपेक्षा वेगळी असणे साहजिक आहे. कारण 3 मात्रांची लस असण्याशिवाय, ही लस देण्यासाठी सुईविरहित जेट इंजेक्टरची गरज असून त्याची किंमत 30 हजार रुपये आहे, असे दुसऱ्या सूत्राने सांगितले.
  • एक जेट इंजेक्टर सुमारे 20 हजार मात्रा देण्यासाठी वापरले जाऊ शकते. ही लस शून्य, 28 व 56 व्या दिवशी दिली जायची असते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2021)

केंद्राकडून दिल्लीला मिळणार 18 कोटींचा निधी :

  • राजधानी दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची पातळी दरवर्षी उच्चांक गाठते. याच पार्श्वभूमीवर, या वर्षी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय प्रदूषण व्यवस्थापनातील मोठी दरी भरून काढण्यासाठी नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम अर्थात NCAPअंतर्गत दिल्लीला कोटींचा निधी मिळणार आहे.
  • तर दिल्लीला एनसीएपी अंतर्गत निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • २०२४ पर्यंत PM2.5 आणि PM10 कॉन्सन्ट्रेशनमध्ये 20 ते 30 टक्के कपात करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील धोरण आहे.
  • वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी दिल्ली सरकारने ‘हिवाळी कृती योजना’ देखील तयार केली आहे.
  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लवकरच याची घोषणा करतील असं म्हटलं जात आहे.ही योजना प्रमुख 10 मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे.

4 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी

कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धात मनूचा दुहेरी सुवर्णवेध:

  • ऑलिम्पिकपटू मनू भाकरच्या दुहेरी सुवर्णकमाईमुळे भारताने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.
  • तर या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताने चार सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांवर नाव कोरले.
  • भारताला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या मिश्र, महिला आणि पुरुष सांघिक अशा तिन्ही गटांत सुवर्णपदक जिंकण्यात यश आले.
  • भारताची 19 वर्षीय नेमबाज मनूने या स्पर्धेत अचूक वेध साधताना तीन सुवर्णपदके आपल्या नावे केली आहेत.
  • सरबजोत सिंगसोबत मिश्र सांघिक गटात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर मनूने 10 मीटर एअर पिस्तूलच्या महिला सांघिक गटात रिदम सांगवान आणि शिखा नरवालसह खेळतानाही सुवर्णपदक जिंकले. त्यांनी अंतिम फेरीत बेलारूसला 16-12 असे पराभूत केले.

स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्कार :

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्याचा निकाल समोर आला आहे.
  • ऑस्ट्रेलियाला शेवटच्या दिवशी 32 षटकात 272 धावांचे आव्हान होते.
  • मात्र 15 षटकात त्यांच्या 2 बाद 32 धावा झाल्या असताना दोन्ही कप्तांनांनी हात मिळवत कसोटी अनिर्णीत राखण्याचा निर्णय घेतला.
  • भारताची शतकवीर फलंदाज स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

दिनविशेष:

  • 4 ऑक्टोबर हा दिवस राष्टीय एकता दिन तसेच जागतिक प्राणी दिन आहे.
  • सन 1824 मध्ये मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.
  • भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1884 मध्ये झाला.
  • 4 ऑक्टोबर 1904 हा दिवस ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चे रचनाकर ‘फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड‘ यांचा स्मृतीदिन आहे.

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply