8 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 8 August 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.
8 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
भारतात जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या वापराला मंजुरी :
- केंद्र सरकारने Johnson and Johnson च्या लसीला आपातकालीन वापराची परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात सध्या परवानगी असलेल्या लसींमध्ये अजून एका लसीची भर पडली आहे.
- त्यामुळे आता भारताकडे करोनाविरोधात एकूण 5 लसी असणार आहेत.
- तर याआधी कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या लसींना भारतात वापराची परवानगी देण्यात आली आहे.
- दरम्यान, भारतात परवानगी मिळालेली जॉनसन अँड जॉनसन ही पहिलीच सिंगल डोस लस असून दोनच दिवसांपूर्वी कंपनीनं केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता.
- करोनावर जॉनसन अँड जॉनसनची लस 85 टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
- तसेच साउथ आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी :
- भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे.
- तर नीरजने 87.58 मीटर लांब भाला फेकत ही कामगिरी केली आहे.
- तसेच बीजिंग ऑलिम्पिक 2008 नंतर हे भारताचं पहिलं गोल्ड मेडल आहे.
- नीरज चोप्राच्या आधी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक जिंकलं होतं.
- ऑलिम्पिकमधील भारताचं वैयक्तिक दुसरं सुवर्ण पदक आहे. यापूर्वी भारताने हॉकीत 8 सुवर्ण पदकं पटकावली आहेत.
- टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला पदक मिळवून देणाऱ्यांमध्ये रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन), कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ), रौप्य (रविकुमार दहिया), कांस्य (पुनिया) आणि सुवर्ण (नीरज चोप्रा) यांचा समावेश आहे.
- टोक्यो ऑलिम्पिकच्या 18 स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी 126 स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे.
बजरंग पुनियाला कांस्यपदक :
- टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने फ्रीस्टाईल कुस्तीच्या 65 किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे.
- तर त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी 8-0 असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले.
- बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून 5-12ने पराभूत झाला.
- तसेच हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला, त्यामुळे बजरंगला रेपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली.
भारताची गोल्फपटू आदिती अशोकला पदकानं हुलकावणी :
- टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आदिती अशोकच्या रुपानं गोल्फ प्रकारात भारताला पदक जिंकण्याची आशा निर्माण झाली होती.
- तर तिसऱ्या राऊंडपर्यंत आदिती तमान भारतीयांच्या अपेक्षेला अगदी तंतोतंत उतरली. मात्र, मध्येच खराब हवामानामुळे थांबवण्यात आलेला खेळ पुन्हा सुरू झाला आणि आदिती तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली.
- तसेच 72 होल्सच्या खेळानंतर आदितीला अशोकला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
- मात्र, अस जरी असलं, तरी पहिल्या तीन राऊंड्समध्ये आदिती दुसऱ्या स्थानावर कायम होती. आजपर्यंत कोणत्याही भारतीय गोल्फपटूला ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही.
- आदितीच्या या कामगिरीवर यामध्ये वर्ल्ड रँकिंगमध्ये अग्रस्थानावर असणाऱ्या नेल्ली कोरडा आणि मोने इनामी यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकावर नाव कोरलं, तर न्यूझीलंडच्या लिडिओ कोनं ब्राँझ मेडल जिंकलं.
दिनविशेष :
- 8 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय मांजर दिन‘आहे.
- सन 1942 मध्ये 8 ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.
- भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी 8 ऑगस्ट 1958 मध्ये कार्यान्वित झाली.
- पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सन 1994 मध्ये 8 ऑगस्ट रोजी सुरू केले.
- सन 1998 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.