आरोग्य विभाग भरती मुदतवाढ- अपडेट:- महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागातर्फे (MPH)जाहीर करण्यात आलेल्या भरती नोटिफिकेशननुसार (Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2021) अर्ज प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्यासाठी २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. अर्ज करण्याआधी सर्वात आधी अधिकृत वेबसाइटील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. या भरतीची (MPH Recruitment 2021) अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरुन अर्जाची लिंक काढली जाणार आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
या भरती अंतर्गत ३ जाहिराती प्रकाशित झाल्या आहे. ग्रुप ड जाहिरात ३४६६ पदांसाठी, ग्रुप क जाहिरात २७२५ पदांसाठी आणि ग्रुप अ जाहिरात ११५२ पदांसाठी. एकूण 7343 पदांची हि मेगाभरती सध्या सुरु आहे. या सर्व तिन्ही जाहिरातींच्या बद्दल पूर्ण माहिती, PDF जाहिराती आणि अर्जाच्या लिंक आम्ही खाली दिलेल्या आहे.
आरोग्य विभाग भरती मुदतवाढ- अपडेट
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना गट C साठी नोंदणीची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आणि गट D साठी 23 ऑगस्ट 2021 आहे, रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. यानंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. तसेच ऑफलाइन माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आरोग्य विभाग भरती मुदतवाढ- अपडेट