अन्नपदार्थांचे वर्गीकरण

अन्नपदार्थांचे वर्गीकरण

अन्नपदार्थांचे वर्गीकरण Food classification

🌺अन्नातील पोषक तत्वे/घटक :

स्थूल पोषक तत्वे – शरीरासाठी सर्वांत जास्त आवश्यकता. उदा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (मेदपदार्थ)

सूक्ष्म पोषक तत्वे – अत्यंत कमी प्रमाणात (अल्प) आवश्यकता. उदा. जीवनसत्वे, क्षार.

 🌺अन्नपदार्थांचे वर्गीकरण :🌺

प्राणीज (प्राण्यांपासून मिळणारे – अंडी, मांस, दुध)

वनस्पती (वनस्पतीपासून मिळणारे धान्य, फळे, भाज्या)

🌷रासायनिक रचनेवरून –

प्रथिने

मेद पदार्थ

कर्बोदके

क्षार

जीवनसत्वे

🌷प्रमुख कार्यावरून –

उर्जा / शक्तीचा पुरवठा करणारे अन्न

शारीरिक वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक अन्न

संरक्षण.

🌷अन्नपोषक मुल्यांवरून –🌷

एकदल धान्य

व्दिदल धान्य

हिरव्या पालेभाज्या

फळे

तेल/मेद

साखर गूळ

मसाले व तिखट

तेलबिया

इतर

🌿🌿प्रथिने (प्रोटीन्स) :🌿🌿

प्रथिने हि अमिनो आम्लांपासून बनलेली असतात.

शरीराला ’24’ अमिनो आम्लांची गरज असते.

त्यापैकी ‘9’ अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाहीत. ती आहारातून पुरवावी लागतात. म्हणून अशा अमिनो आम्लांना ‘आवश्यक अमिनो आम्ले’ असे म्हणतात.

(लायसीन, ल्युसीन, आयासोल्युसीन, व्हॅलिन, हिस्टीजीन, थ्रिओनिन, टिप्ट्रोफॅन, मिथिओनिन, फिनाईल, अॅलॅनिन)

अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधी-कधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.

🌿🌿प्रथिनांची कार्ये :🌿🌿

शरीराची वाढ आणि विकास करणे.

ऊतींच्या डागडुजीसाठी / दुरुस्तीसाठी.

प्रतिपिंडे (अॅंटीबॉडीज), विकरे (एन्झाइम्स), संप्रेरके (हामोन्स) यांच्या निर्मितीमध्ये.

रक्तनिर्मितीमध्ये.

कधी-कधी प्रथिनांपासून उर्जादेखील मिळते.

🌿🌿प्रथिनांची साधने :🌿🌿

🌷प्राणीज साधने – दूध, अंडी, मांस, मासे.

🌷वनस्पतीज साधने –

डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन  

धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.

तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.

डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 20-25% असते.

सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 43.2% (सर्वाधिक)

दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%

अंडी प्रथिनांचे प्रमाण – 13%

मासे प्रथिनांचे प्रमाण – 15-23%

मांस प्रथिनांचे प्रमाण – 18-26%

प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा ‘उच्च दर्जाचे’असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.

Annapadarthache Vargikaran

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      About Prithviraj Gaikwad

      Check Also

      Nutrition Science India Notes PDF Download

      Nutrition Science India Notes PDF Download

      जिवनसत्वे उपयोग व प्रकार माहिती

      जिवनसत्वे उपयोग व प्रकार माहिती Information on the uses and types of vitamins जिवनसत्वे उपयोग …

      सूक्ष्मपोषक घटकद्रव्ये

      सूक्ष्मपोषक घटकद्रव्ये Macronutrients सूक्ष्मपोषक घटकद्रव्ये Macronutrients रासायनिक घटक मानव सर्वात मोठी प्रमाणात नाश करत आहेत …

      Contact Us / Leave a Reply