Chalu Ghadamodi 15 April 2020 Pdf Download
Chalu Ghadamodi 15 April 2020 Pdf Download
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
महामारीच्या काळात सुरक्षित कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी TRIFED आणि UNICEF यांच्यात भागीदारी
भारतातल्या आदिवासी जमातीचे लोक सुरक्षितपणे आपले काम चालू ठेवण्यासाठी भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) या संस्थेनी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या आंतरराष्ट्रीय संघटनेबरोबर भागीदारी केली आहे.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्याविषयीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बचत गटांसाठी (SHG) डिजिटल मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक डिजिटल संपर्क धोरण’ विकसित करणे, हे या भागीदारीचे लक्ष्य आहे.
भागीदारीनुसार, UNICEF बचत गटांना डिजिटल मल्टीमीडिया सामग्रीच्या रूपात माहिती प्रसारित करण्यासाठी आवश्यक ती मदत देणार. तसेच महामारीला प्रतिसादासाठी आभासी प्रशिक्षण देण्यासाठी आभासी कार्यशाळा, मुख्य प्रतिबंधक वर्तन; सामाजिक अंतर राखण्याविषयी सोशल मीडिया मोहीमा; आणि वन्य रेडिओ याविषयी आवश्यक ती मदत दिली जाणार.
चंद्रावरील NASA संस्थेचा ‘आर्टेमिस’ अंतराळ कार्यक्रम
2024 सालापर्यंत पृथ्वीच्या चंद्रावर मानवाला जीवन जगण्यासाठी पाठविण्याची महत्वाकांक्षी योजना अमेरिका देशाच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेनी आखली आहे. योजनेनुसार चंद्राच्या भूमीवर मानवाला राहण्यायोग्य एक तळ उभारले जाणार आहे, ज्याला “आर्टेमिस बेस कॅम्प” म्हटले जाणार.
मोहिमेविषयी ठळक बाबी
चंद्राचा शोध घेण्यासाठी मानवाने दीर्घ काळासाठी एखादी मोहीम राबविण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात असलेल्या ‘शॅक्लेटॉन क्रेटर’च्या मध्यात हे तळ उभारले जाणार आहे, जिथे चार लोकांची व्यवस्था असणार आहे. हे तळ त्रासदायक चंद्र धूळ आणि लांब, थंड चंद्र रात्री, पाण्यासारख्या स्थानिक सामग्रीला संसाधनात बदलण्यासाठी आणि नवीन ऊर्जा आणि बांधकाम तंत्रज्ञानाच्या विकासासाठी नवीन तंत्रांची चाचणी घेण्यासाठी एक केंद्र म्हणून देखील ठरू शकतो. तळावर सुविधेसाठी वीज, मलनिस्सारण व दळणवळणाची सोय तसेच किरणोत्सर्गी-रोधक छत्र व लँडिंग पॅड अश्या पायाभूत सुविधा उभारल्या जाणार. आर्टेमिस तळावर दळणवळणाची दोन साधने असणार: 1) पृष्ठभागावर अंतराळवीरांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी एक ‘चंद्र भूपृष्ठ वाहन’ आणि 2) 45 दिवसांपर्यंत तळापासून दूर अंतरावर प्रवास करण्यासाठी ‘हॅबिटेबल मोबिलिटी प्लॅटफॉर्म’.
Chalu Ghadamodi 15 April 2020 Pdf Download, चालू घडामोडी एप्रिल 2020 डाउनलोड करा, Chalu Ghadamodi April 2020 in Marathi.
इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now