कुलोमचा नियम धारा विद्युत

कुलोमचा नियम धारा विद्युत

कुलोमचा नियम धारा विद्युत

दोन प्रभारित पदार्थाच्या दरम्यान निर्माण होणारे विद्युत बल,F हे त्या दोन प्रभाराच्या q १ व q २ गुणाकाराच्या स्मानुपती असून. त्यांच्यातील अंतराच्या r वर्गाची व्यस्तानुपती असते. K यास चलनाचा स्थिरांक म्हणतात. स्थिर प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक परिणामाला स्थितीक विद्युत असे म्हणतात. गतिमान प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक परिणामाला धारा विद्युत असे म्हणतात. ज्या पदार्थापासून प्रभार एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहज जाऊ शकतात. त्यांना वाहक असे म्हणतात. धातूमध्ये मुक्त इलेक्ट्रोनची संख्या जास्त असल्याने ते सुवाहक आहे. उदा – तांबे, सोने, चांदी, विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत पातळीमधील फरक म्हणजेच त्या घटाचे विभवांतर होय.

धारा विद्युत मापन

कुलोम – कुलोम हे विद्युत प्रभाराचे SI एकक आहे. हे एकक ‘C’ या चिन्हाने दर्शविले जाते. समान मुल्य असलेले दोन सजातीय बिन्दुप्रभार निर्वासात परस्परापासून एक मीटर अंतरावर ठेवले असता या प्रभाररहित मुल्य एक कुलोम आहे असे मानले जाते.

व्होल्ट volt – व्होल्ट हे विभ्वान्ताराचे SI एकक V या अक्षराने एक कुलोम विद्युत प्रभाराचे एका बिंदुपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत विस्थापन होण्यासाठी जर एक ज्युलएवढे कार्य घडून येत असेल तर तर त्या दोन बिन्दुमधील विभवांतर एक व्होल्ट आहे असे म्हणतात. १व्होल्ट = १ज्युल१कुलोम  

अम्पिअर : हे विद्युतधारा मोजण्याचे SI एकक आहे. व A या चिन्हाने ते दर्शवितात. वाहकाच्या कोणत्याही काटछेदातून एका सेकंदास एक कुलोम विद्युत प्रभार प्रवाहित होत आहेत. तर वाहकातून जाणारी विद्युतधारा एक अम्पिअर आहे. विद्युतधारा = विद्युतप्रभार काळ 

ओहमचा नियम

ओहमचा नियम – वाहकाची भौतिक स्थिती कायम राहत असताना वाहकामधून जाणारी विद्युत धारा हि त्या वाहकाच्या दोन टोकामधील विभवंतराच्या V समानुपाती असते.

R = VI स्थिरांकास रोध R असे म्हणतात. वाहकाच्या दोन टोकामध्ये एक व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून एक अम्पिअर विद्युत धारा जात असेल. तर त्याला वाहकाचा एक असे म्हणतात.

तांबे चांदी यासारख्या सहायाने ओहामच्या नियमाची पडताळणी करता येते. म्हणून या पदार्थाच्या ओहमनीय वाहक असे म्हणतात. थर्मिस्टर हे ओहामच्या नियमाचे साधन आहे.

एकसर जोडणी – प्रत्येक रोधामधून समान विद्युत धारा जाईल. अशा पद्धतीने जर अनेक रोध जोडले तर त्या जोडणीस रोधांची एकसर जोडणी असे म्हणतात.

समांतर जोडणी  प्रत्येक रोधाच्या दोन टोकामध्ये समान विभवांतर प्रयुक्त व्हावे. यासाठी अनेक रोध सामाईक बिंदूमध्ये जोडण्याचा व्यवस्थेस रोधांची समांतर जोडणी असे म्हणतात.

विभवांतराचे SI एकक व्होल्ट आहे.

विद्युत धारा मोजण्यासाठी अमिटर वापरतात.

ज्या पदार्थात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विद्युत प्रभार सहजासहजी जाऊ शकत नाही. त्या पदार्थांना विसंवाहक म्हणतात.

विसंवाहक म्हणून प्लास्टीक  पदार्थ वापरतात.

विद्युत धारेचे SI एकक अम्पिअर आहे.

अतिवाहकाचा उपयोग संगणकात केला जातो. 

भौतिकशास्त्र विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

    Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

    नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    Coulombs law derivation, coulombs law formula, coulombs law examples. coulombs law definition

    About Prithviraj Gaikwad

    Check Also

    संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name

    संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram …

    Physics Science India Notes PDF Download

    Physics Science India Notes PDF Download

    स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ

    स्टीफन हॉकिंग भौतिकशास्त्रज्ञ फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा …

    Contact Us / Leave a Reply