सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स General Science Class 10th Notes

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स

कुलोमचा नियम: होण प्रभारीत पदार्थांच्या दरम्यान निर्माण होणारे विधुतबल (F) हे त्या दोन प्रभारांच्या (Q1 Q2 ) गुणाकाराच्या सामानुपाती असून त्यांच्यातील अंतराच्या ® वर्गाशी व्यस्तानूपूर्ती असते.

स्थिर प्रभारामुळे घडणार्याच भौतिक परिणामाला स्थितीक विधुत असे म्हणतात, तर गतिमान प्रभारामुळे घडणार्याि भौतिक परिणामाला धारा विधुत असे म्हणतात.

धातूंमध्ये मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असल्याने ते सुवाहक आहेत.

काही पदार्थाच्या बाबतीत मूळ केंद्रकाशी इलेक्ट्रॉन भक्कम बलाने बद्ध असल्याने त्यांच्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. त्यांना विसंवाहक म्हणतात.

काही पदार्थ सर्वसाधारण परिस्थितीत विसंवाहक असतात. परंतु विशिष्ठ परिस्थितीत ते सुवाहक बनतात. अशा पदार्थांना आर्धवाहक म्हणतात. जर्मेंनिअम, गॅलीअम, इ.

इलेक्ट्रॉनची धातुमधील गती एखाधा रेणुच्या गतीप्रमाणे यादृच्छिक असते.

जेव्हा प्रभार कमी विभवावरून त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरीत होतो तेव्हा विधुत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावे लागते. या दोन्ही पातळीवरील विभवातील फरकास विभवांतर असे म्हणतात.

कूलोम हे विधूतप्रभाराचे SI एकक आहे. हे ‘C’ या चिन्हाने दर्शवितात.

व्होल्ट हे विभवांतराचे SI एकक आहे. V ने दर्शवितात.

‘अॅम्पियर’ हे विधुतधारा मोजण्याचे SI एकक आहे. ‘A’ ने दर्शवितात.

वाहकाची लांबी जितकी जास्त तितका त्याचा रोध जास्त असतो.

तांबे हा धातू सुवाहक असतो तसेच नायक्रोम व कान्स्टन्टन धातूच्या संमिश्रांचा रोध जास्त असल्याने विधुत इस्त्रीमध्ये तांब्याऐवजी नायक्रोमचे कुंडल वापरतात.

डायोड व थर्मिस्टर ओहोमच्या नियमाचे पालन करीत आहे.

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स

पारा या धातूचा रोध 4.2k तापमानास शुन्यापर्यंत कमी होतो.

अशा पदार्थांना अतिवाहक असे म्हणतात. अतिवाहकाच्या बाबतीत जसजसे तापमान कमी कमी होत जाते तस तसा रोधही कमी होत जातो. एका विशिष्ट तापमानास हा रोध शून्य होतो. या तापमानास क्रांतिक तापमान असे म्हणतात. (TC)

परिपथामधील रोध जर एकसर पद्धतीने जोडले असतील तर परिपथातील प्रत्येक भागातून सारखी विधूतधारा जाईल.

तारेमधून निर्माण होणारी उष्णता – 1) तारेमधुन वाहणारी विधूतधारा, 2) तारेचा रोध. 3) तारेतून विधुतधारा वाहाण्याचा कालावधी या बाबींवर अवलंबून असते.

४.१८ ज्युल = १ कॅलरी.

विधूत ऊर्जा निर्मितीच्या दारांस विधुत शक्ति असे म्हणतात.

शक्ति हे ज्युल/सेकंद या एककात मोजतात यालाच वॅट (w) म्हणतात.    

विधूतधारेच्या औष्मिक परिणामाचे अनेक व्यावहारिक प्रयोग आहेत. उदा. विधुत दिवा, विजेची शेगडी, इस्त्री, गिझर, इ.

वितळतार ही शिशासारख्या कमी द्रवनांक असलेल्या संमिश्राची बनविलेली असते.

‘लोडस्टोन’ नैसर्गिक चुंबक या नावाने ओळखले जाते.

जी विधुतधारा आपले परिमाण व दिश ठराविक समान कालावधीनंतर बदलते. त्यास प्रत्यापूर्वी धारा (AC) असे म्हणतात. ती दोलयमान (oscillating) आहे.

विधुत घटापासून तयार होणार्या  अदोलयमान धारेस दिष्ट धारा किंवा D.C. म्हणतात.

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स

दिष्ट धारा एकाच दिशेने वाहते तर प्रत्यावर्ती धारा आवर्ती पद्धतीने एकाच चक्रात उलट दिशेने वाहते.

भारतात AC ची प्रत्येक 1/100 सेकंदामद्धे दिशा बदलते. म्हणजेच त्यांची वारंवारिता ५० चक्रे प्रति सेकंद असते.

प्रत्यावर्ती धारेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विधुत शक्तीचे लांब अंतरापर्यंत फार घट न होता पारेषण करता येते.

भारतामध्ये धनाग्र तार व ऋणग्र तार यामधील विधुत विभवांवर २२० व्होल्ट असते.

विधुत ऊर्जा व चुंबकत्व यांमधील परस्पर संबंध एच.सी. ओरस्टेड या शास्त्रज्ञाने प्रथम दर्शविला.

अनेक गोलाकार वेढयांचे कुंडल गुंडाळून तयार होणार्याव चितीस नालकुंतल असे म्हणतात.

जे उर्जास्त्रोत एकदा वापर केल्यानंतर नष्ट होतात व पुनर्वापारसाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यांना ‘नवीकरण अयोग्य’ उर्जा स्त्रोत म्हणतात. उदा. लाकूड, गोवर्याअ, लकडी कोळसा, दगडी कोळसा, केरोसीन, गॅस, डिझेल, पेट्रोल, नैसर्गिक वायु इंधने या प्रकारात मोडतात.

ज्या ऊर्जास्त्रोताचे त्यांच्या अंगभूत क्षमतेने नवीकरण होते आणि चक्रीय क्रमाने थोडया कलावधीत ज्यांचे पुनरुत्पादन होऊ शकते अशा ऊर्जा स्त्रोतांना नवीकरण योग्य ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात. उदा. पवन ऊर्जा, लाटांपासून मिळणारी ऊर्जा, भूगर्भ औष्मिक ऊर्जा, वाहत्या पाण्यापासून मिळणारी ऊर्जा, सौर ऊर्जा, जैविक वस्तूसंचय ऊर्जा हे नवीकरणक्षम ऊर्जा स्त्रोत आहे.

पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील गुरुत्वाकर्षनामुळे लाटांची निर्मिती होते.

काही विशिष्ट परिस्थितीत भूगर्भाच्या अंतर्गत भागातील उष्णता ऊर्जेचा स्त्रोत होऊ शकते या उर्जेस भूगर्भ-औष्मिक उर्जा असे म्हणतात.  

वितळणार्या् खडकांना मॅग्मा असे म्हणतात.

दार्जिलिंग मध्ये १८९७ साली उभारलेले व १३० केव्ही वीज देणारे विधुत संयंत्र हे भारतातील पहिले जलविधुत केंद्र आहे.

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स

1 Joule = 107 अर्ग

फटक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते.

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ठही करता येत नाही. केवळ तिचे एका प्रकारातून दुसर्यार प्रकारात रूपांतर करता येते.

कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. तसेच एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय.

SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.

१ वॅट = १ ज्युल/से = 1 N – m/s तसेच 1 HP = 746 वॅट

माध्यमातून प्रक्षोभाचा जो आकृतीबंध प्रवास घडतो त्या आकृतिबंधास ‘तरंग’ असे म्हणतात.

यांत्रिक तरंग दोन प्रकारचे असतात. १) अनुतरंग (longitudinal wave), २) अवतरंग (transverse wave)

ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग 00से तापमानाला 332 मी/से. आहे.

ज्या ध्वनी तरंगाची वारंवारता २० Hz पेक्षा कमी किंवा २०,००० Hz पेक्षा जास्त असते असे ध्वनी माणसाला ऐकू येत नाहीत. त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.

प्रकाशाचा वेग 3 x 108 m/s आणि ध्वनीचा वेग ३४० m/s आहे.

ध्वनीलहरींचे परावर्तन होऊन 1/10 सेकंदानंतर त्या आपल्या कानावर पडल्यास मूळ आवाज पुन्हा ऐकू येतो. हाच प्रतिध्वनी होय.

प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान १७ मी. अंतर असणे आवश्यक आहे.

वटवाघूळ उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात.

प्रतिध्वनीचे तत्व SONAR पद्धतीत वापरतात.

SONAR- Sound Navigation And Ranging System

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स

पाण्यामध्ये ध्वनीचा वेग १४१० m/s आहे तर समुद्राच्या पाण्यात हाच वेग १५५० m/s आहे. लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सुमारे ५१०० m/s आहे.

ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल (decibel) हे आहे. लघुरूपात डेसिबल हे dB असे लिहितात.

नकोसा वाटणारा ध्वनी म्हणजे कुरव होय.

पाण्याचे तापमान ४°से. पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्टपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते.

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी:

सर्वसामान्य मानवी डोळा त्यावर ताण न देता वस्तु स्पष्ट पाहण्याचे किमान अंतर म्हणजे २५ सेंमी होय.

निकटदृष्टीता फक्त जवळच्या वस्तु स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन या दृष्टीदोषाचे निराकरण करता येते.

दूरदृष्टीता – नेत्रगोल उभट होण्याने निर्माण होतो. लांबच्या वस्तु नीटपणे दिसू शकतात. बहिर्वक भिंगाचा चष्मा वापरुन हा दोष दूर करता येतो.

अबिंदुकता – एकाच प्रतलातील क्षितीज समांतर रेषा व क्षितीज लंब रेषा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात. या दोषाला अबिंदुकता असे म्हणतात. दंडगोल भिंगाचा चष्मा वापरुन दूर करतात.

वृद्ध दृष्टीता – निकट बिंदूचे डोळ्यापासूनचे अंतर वयाबरोबर वाढते. निकटबिंदूच्या डोळ्यापासून मागे सरण्याला वृद्धदृष्टीता असे म्हणतात.

बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन वृद्धदृष्टीता दूर करता येते.

जेव्हा अबिंदुकता आणि निकटदृष्टीता किंवा दूरदृष्टीता असे दोन दोष असतील तेव्हा त्यांना घालविण्यासाठी तीन अंक दिलेले असतात.

साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हणतात. रत्नाची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी जव्हेरी याचा उपयोग करतात.

संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग अशा दोन बहिवक्र भिंगाचा बनलेला असतो.

अपवर्तन होताना पांढर्या  प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात अपस्करण होऊन पांढर्या. वस्तूंच्या रंगीत प्रतिमा तयार होतात. त्याला वर्णीय विपयन असे म्हणतात.

वस्तु दूर केल्यानंतरही १/१६ सेकंदापर्यंत प्रतिमेची दृष्टीपटलावरील ठसा तसाच राहतो. दृष्टिपटलावरील संवेदना टिकणे या परिणामाला दृष्टीसातत्य असे म्हणतात.

दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदुस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवितात.

Join our telegram channel @MPSCScience

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      About Prithviraj Gaikwad

      Check Also

      Science Notes PDF Download

      Science Notes PDF Download

      Sci notes mar

      Sci notes mar फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा …

      सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 1

      सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 1 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे इतिहास,भूगोल मधील प्रश्न यात घेतले आहेत …

      Contact Us / Leave a Reply