सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स

सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स General Science Class 7th Notes

सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स

नैसर्गिक साधनस्त्रोत : 

अनविकरणीय – हवा, माती, खनिजे, पाणी (निर्माण करणे आवाक्याबाहेरचे असते.)

हवा प्रदूषणाचे हवेतील कार्बनडायऑकसाईडचे प्रमाण वाढत असल्याने जागतिक तपमानवाढीचे उदभवले आहे.

 इस्त्राईल मधील जॉर्डन नदीवर कालवे काढून जलसिंचनाची सोय केल्याने वाळवंटी भागात उत्तम शेती करता येते.

 समुद्राच्या पाण्यात मॅग्नेशिअम क्लोराईड, सोडीयम क्लोराईड हे क्षार असतात.

 उतारावरील जमिनीवर ठराविक अंतरावर आडवे चर खणून पावसाचे पाणी चरात अडवून धरले जाते यालाच नालाबंर्डिंग असे म्हणतात.

 २० ऑगस्ट हा दिवस अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून पाळला जातो.

 वनस्पती व प्राण्यातील विशिष्ट जणूके दुसर्‍या वनस्पतीत व प्राण्यात थेट सोडून हव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती प्रयोग शाळेत निर्माण करता येऊ शकते त्याला जैविक तंत्रज्ञान असे म्हणतात.

 डोडो व भारतीय चित्ता यांची जणूके आपण कायमची हरवून बसलो आहोत.

 संयुक्त राष्ट्रसंघाने दरडोई ५० ली.

 पाण्याची गरज रोजची असल्याचे सुचवले आहे.

 पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व्यापलेला आहे.

 २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 जलाशयाच्या पृष्ठभागावर सेटील अल्कोहोलचा शिडकावा केल्यास बाष्पीभवन कमी होते.

 वनस्पतीच्या पानातील हरितद्रव हे प्रकाश उर्जेचे रूपांतर रसायनिक उर्जेत करते.

 अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक तर विजेचे दुर्वाहक आहे.

सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स

 विशिष्ठ वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान १ C ने वाढविण्यास लागणार्‍या उष्णतेला त्या पदार्थाची उष्माधारकता म्हणतात.

 १ कि.ग्रॅ. पदार्थाचे तापमान १ C ने वाढविण्यास लागणार्‍या उष्णतेचा विशिष्ठ उष्मा असे म्हणतात.

कि.ग्रॅ. 1 Kg पाण्याचे तापमान १ C ने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता १ कि.कॅलरी होय.

 १ ग्रॅम वस्तुमानाच्या पाण्याचे तापमान १ C ने वाढण्यास लागणारी उष्णता १ कॅलरी होय.

 वायूंचे प्रसारण हे स्थायू आणि द्रवाच्या प्रसारणापेक्षा अधिक असते. भट्टीचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणार्‍या तापमापीला पायरोमीटर म्हणतात.

 आयोडीन व नॅप्थालिन हे संप्लवनशील पदार्थ आहेत.

 अमीबा,पॅरमॅशिअम, क्लोरेल्ला हे एकपेशीय सजीव आहेत.

 सजीवांची रचना आणि कार्य पेशीच्या पातळीवर होत आहेत.

 समान कार्य करणार्‍या पेशीच्या समूहाला उती असे म्हणतात.

 उती पातळीवर संघटन असणारे सजीव – मॉस, शैवाल, जलव्याल.

 ठराविक काम एकत्रितपणे करणार्‍या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था म्हणतात.

 प्राण्यांच्या किंवा वनस्पतींचा समूह ज्या विशिष्ट जागेत राहून विकसित होतो त्या जागेस अधिवास म्हणतात.

 एकपेशीय जीवामध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होते. उदा. जिवाणू, क्लोरेल्ला.

 कालिका पासून होणार्‍या प्रजननास कलिकयन म्हणतात. उदा. किन्व (यीस्ट)

 पुमंग हा नर घटक तर जयांग हा स्त्री घटक असतो.

सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स

 पुमंगातील परागकण जायांगाच्या कुक्षीवर पडल्यास ते रुजतात. याला परागण असे म्हणतात.

 अंड्यात वाढणार्‍या जीवांना अंडज म्हणतात. तर गर्भाशयातून जन्मणारे जरायूज.

 सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे चार कप्पे असतात.

 हृदयाकडून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणार्‍या    रक्तवाहिन्यांना धमण्या म्हणतात.

 शरीराच्या भागाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्यांना शिरा म्हणतात.

 धमन्यांना फाटे फुटून त्या केसासारख्या बनतात. त्यांना केशिका म्हणतात.

 अॅनेमिया, थालेसेमिया, कॅन्सर ग्रस्त रुग्णांना बाहेरून रक्तपुरवठा केला जातो.

 अन्न घटकातील अमिनोआम्लाचा शरीरबांधणीसाठी उपयोग होतो.

 अळूच्या पानात कॅल्शिअम ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात.

 मूलद्रव्याच्या अतीसूक्ष्म कणाला अणू म्हणतात.

सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स

 पुढील मूलद्रव्यात दोन अणू असतात-ऑक्सीजन, हायड्रोजन, क्लोरिन, नायट्रोजन.

 रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी अॅल्युमिनियम, मॅग्नेशिअम हे धातू आणि नायलोन व फायबर ग्लास हे पदार्थ वापरतात.

 २०Hz ते २०००० Hz दरम्यानच्या वारंवारितेचा ध्वनी माणसाला ऐकता येतो. त्याला श्राव्य ध्वनी म्हणतात.

 अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वाटवाघळला समोरच्या वस्तूची जाणीव होते.

 २० C या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे ३४० m/s असतो.

 प्रकाशाचा वेग सुमारे ३ × १० ^८ m/s एवढा आहे.

 अँबरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात.

 काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घांसल्यास धन विद्युतप्रभार निर्माण होतो.

 एबोनाईटची दांडी उनी कपड्यावर घासली की तिच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो.

 आकाशातील विजेचा धोका टळण्यासाठी उंच इमारतीवर तडीतवाहक बसवतात.

 छ्दमपादाच्या सहाय्याने अमीबा पुढे सरकतो.

सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स

 स्वादूपिंडामधून इन्शुलिन स्त्रवते तर यकृतामधून पित्तरस स्त्रवतो.

 शर्करांचे प्रकार – फ्रूक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज, लॅक्टोज, इ.

 प्रथिने ही मूलत: नट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत.

 प्रथिने शरीर बांधणीच्या कामात महत्वाची भूमिका बजावतात.

 आनुवांशिक गुणधर्माचे नियोजन करणारे डी – ऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल

   (DNA), रायबो न्यूक्लिक असिड (RNA) हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत.

 ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावी रातआंधळेपणा होतो.

 कॅल्शिअमच्या अभावी हाडे ठिसूळ बनतात. दातांची झीज होते.

 फॉस्फरसच्या त्रुटिमुळे वजनात घट होते व वाढ खुंटते.

 लोहाच्या अभावामुळे पंडूरोग, रक्तक्षय (अॅनेमिया) हा विकार होतो.

 आयोडीनच्या अभावामुळे गलगंड (गॉयटर) हा रोग होतो.

सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स

 आपल्या मानेत असणार्‍या अवटू ग्रंथीमधून थायरोस्झिन संप्रेरक स्त्रवते.

 प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणार्‍या रासायनिक पदार्थांना संप्रेरके म्हणतात.

 जणूके पेशीच्या केंद्रकामध्ये समवलेली असतात. उंची वाढण्यास करणीभूत असलेले वृद्धी संप्रेरके मेंदू मधील पियुषिकेत तयार होते.

 किटकभक्षी वनस्पती – दवबिंदू (ड्रोसेरा), घटपर्णी या आहेत.

 आम्ल –    चवीला आंबट असतात. H हा मुख्य घटक असतो. 

आम्लाच्या द्रावणात नीळा लिटमस लाल होतो.

आम्लारी -चवीला तुरट असतात. OH हा मुख्य घटक असतो.

आम्लारीच्या द्रावणात लाल लिटमस निळा होतो.

दर्शके -एखादा पदार्थ आम्ल किंवा आम्लारी हे ओळखण्यासाठीवापरण्यात येणारे पदार्थ. उदा. लिटमस, हळद, मिथिलऑरेंज, फिनोल्फ्थॅलिन.   

निसर्गात आढळणारे दर्शक – लिटमस, हळद 

लिटमस हा दर्शक लायकेन वनस्पतीपासून मिळवतात.

पाण्यात विरघळणारर्‍या आम्लरींना अल्कली म्हणतात.

 लिंबू, संत्री, मोसंबी, या फळात सायट्रिक अॅसिड असते.

 जेव्हा जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत चुनकळी टाकतात. जर जमीन आम्लारीधर्मी असेल तर जमिनीत सेंद्रिय द्रव्ये मिसळतात.

 ४ C ला पाण्याची घनता महत्तम असते.

 जहाजावर किती माल भरावा याचा निर्देश करण्यासाठी जहाजाच्या खालच्या भागावर रेषा आखलेल्या असतात. त्यांना प्लीम सोल रेषा म्हणतात.

 लोलकातून गेल्यावर सूर्यचा प्रकाश सात रंगात विभागतो. त्यामध्ये तांबडा रंग वर असतो तर जांभळा रंग सर्वात खाली असतो. 

सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स

रंगाचा क्रम – तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा

उष्णतेचे स्थलांतर तीन प्रकारे होते – वहन, अभिसरण, प्रारण.

 थर्मासफ्लास्क मध्ये गरम किंवा थंड वस्तू तापमानामध्ये फरक न होता   दीर्घकाळ त्याच तापमानावर गरम किंवा थंडच राहते.

 गरम पदार्थ गरम ठेवण्यासाठी जी भांडी वापरतात त्यांना थर्मोवेयर म्हणतात.

 उष्णतेचे सुवाहक – तांबे, लोह, अल्युमिनिअम, इ.  

उष्णतेचे दुर्वाहक – माती, लाकूड, काच, इ.

 रक्त देण्याची प्रक्रिया म्हणजे रक्तदान तर रक्त घेण्याची प्रक्रिया रक्त पराधन होय.

 रक्तामध्ये युरिया साचून राहिल्यास चक्कर येते. 

वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला डायलेसिस (व्याष्लेषण) म्हणतात.

 बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.

 आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.

 कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.

 परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.

 जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.

सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स

 विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.

 हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.

 आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.

 पिष्टमय पदार्थ – पिष्ट, विविध शर्केरा, तंतुमय पदार्थ यांचा समावेश येतो.    

 – तांदूळ, गहू, मका, बाजारी, ज्वारी या तृणधान्यांमद्धे पिष्ट भरपूर असते.

 – पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. 

– जरुरीपेक्षा जास्त झालेल्या ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होऊन यकृतात साठवले जाते.                         

– पिष्टमय पदार्थापासून उर्जा मिळते.

 प्रथिने – तूर, हरभरा, मटकी, सोयाबीन या डाळी तसेच दूध अंडी, मासे, मांस यांपासून प्रथिने मिळतात.    

 – विविध जैवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणारी विकरे सुद्धा मुळात प्रथिनेच आहेत.

 स्निग्ध पदार्थ –   तेल, तूप, लोणी, मेद, मेदाम्ले ही उदाहरणे.        

 –  स्निग्धपदार्थांच्या विघटनामुळे उर्जा प्राप्त होते.

 पालेभाज्या तसेच फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो.

 रेफ्रीजरेटरमध्ये 5℃ च्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते.

 मानवाच्या चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने मेंदू, चेतरज्जू, चेतातंतू असतात.

 चेतासंस्थेचे मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेसंस्था असे दोन गट पडतात

सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स.

 मेंदू आणि चेतारज्जुंचा मध्यवर्ती चेतासंस्थेत समावेश होतो.

 चेतातंतूचा समावेश परिघीय चेतासंस्थेत होतो.

 चेतातंतू निरनिराळ्या अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेची संपर्क घडवून आणतात.

 शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम अपवाही चेतातंतू करतात.

 चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात.

 काही क्रिया घडताना संदेश मेंदुपर्यंत न पोहचता फक्त चेतातंतूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.

 अंत:स्त्रावी ग्रंथी वाहिनीहीन असतात. उदा. पियुषिका, अवटू, अधिवृक्क, पाईनी, हृदोधिष्ठ.

 सामन्यात: धातूंची ऑक्साइड्स आम्लारीधर्मी असतात.

 पाण्यात विरघळणार्‍या आम्लारिंना अल्कली म्हणतात.

 सर्व अल्कली आम्लारी असतात, परंतु सगळे आम्लारी अल्कली नसतात.

 उदासीनिकरणात क्षार आणि पाणी तयार होतात.

 जेव्हा दाहक आम्ल आणि दाहक आम्लारी यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा मिळणारे क्षार उदासिन असतात. उदा. मीठ, सोडीयम नायट्रेट (NaNO३) आणि सोडीयम सल्फेट (Na२SO४) ही उदासिन क्षारांची उदाहरण आहेत.

 दाहक आम्ल आणि सौम्य आम्लारीच्या रासायनिक अभिक्रियेतून मिळणारे क्षार आम्लधर्मी असतात. अॅल्युमिनिअम क्लोराईड, अमोनिअम सल्फेट क्षार आम्लधर्मी असतात. 

______________________________________

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      About Prithviraj Gaikwad

      Check Also

      Science Notes PDF Download

      Science Notes PDF Download

      Sci notes mar

      Sci notes mar फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा …

      सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 1

      सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 1 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे इतिहास,भूगोल मधील प्रश्न यात घेतले आहेत …

      Contact Us / Leave a Reply