सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स
सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.
एकक वस्तुमानात एकक त्वरण निर्माण करणार्या बलास एकक बल असे म्हणतात.
MKS पद्धतीने 1kg वस्तूमान 1 m/s2 त्वरण निर्माण करणार्या बलास एक न्यूटन बल असे म्हणतात.
एखाद्या वस्तुमानावरील कार्यरत बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानास व तिच्यावरील परिणामी त्वरण सामानुपाती असते.
प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदा. रॉकेट किंवा अग्निबाण.
दोन वस्तूंची टक्कर झाली तर या वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो.
निसर्गात आढळणार्यां आणि परस्परांपासून भिन्न असणार्याए सर्व बलांचे चार मुख्य प्रकार आहेत. १) गुरुत्वबल, २) विधूत चुंबकीय बल, ३) केंद्राकीय बल, ४) क्षीण बल, सर्वांसाठी न्यूटन (N) हे एकक वापरले जाते.
न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.
प्रयुक्त आकर्षणबलास ‘गुरुत्वबल’ म्हणतात.
पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते.
विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कोठेही असल्या तरी त्यांच्यात परस्परांना आकर्षणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानूपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या वस्तानुपाती असते.
G चे मूल्य सर्व वस्तूंसाठी सारखेच आहे. म्हणून G ला ‘विश्वगुरुत्व स्थिरांक’ म्हणतात.
G चे मूल्य 6.67×10-11 Nm2/kg2 आहे.
पृथ्वीचे वस्तुमान M=6×1024kg आहे. सरासरी त्रिज्या R=6400 km आहे.
एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.
वस्तूचे वजन हे तिच्यावर कार्यरत पृथ्वीचे गुरुत्वबल होय.
सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी MPSC General Science Notes
दुसर्या प्रकारात हायड्रोकार्बनमधील किमान दोन कार्बन अणू एकमेकांशी बहुबंधाने जोडलेले असतात.
बहुबंधामधील कार्बन अणू हे त्या रेणुमधील इतर कार्बन अणूंपेक्षा वेगळे असतात.
मिथेन हा सर्वात साधी संरचना असलेला हायड्रोकार्बन असून त्याच्या रेणूत केवळ एकच कार्बन अणू असतो.
इंधन खाणी, कोळसा खाणी, गोबर गॅस व बायोगॅस मध्ये दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन असतो.
ज्वलनशीलतेमुळे मिथेनचा इंधन म्हणून वापर केला जातो.
हायड्रोजन व अॅसिटिलीन वायूंचे औधोगिक उत्पादन मिथेनपासून मिळते.
इथेन हा संतृप्त हायड्रोकार्बन आहे.
इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटाच्या किन्वण प्रक्रियेने मिळविले जाते.
इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटांच्या किन्वन प्रक्रियेने मिळविले जाते.
पॉलिथिन हे इथिलीन पासून बनविले जाते.
अॅसीटिलीन हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे.
ऑक्सिअॅसिटिलीन च्या ज्योतीचे तापमान नैसर्गिक वायू किंवा हायड्रोजन वायूंच्या जोतीपेक्षा जास्त असते.
PVC या बहुवारिकाच्या उत्पादनासाठी लागणार्याग कार्बन संयुगाच्या आधौगिक उत्पादनासाठी अॅसिटीलीन वापरला जातो.
सजीवांमधील रुपिकीय आणि कार्यरूपी विचरणास ‘जीवनसृष्टीची विविधता’ असे म्हणतात.
वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समुहांना वर्गेकक (Taxa) असे म्हणतात.
वर्गीकरणामधील पदानुक्रमात वर्गेककांचा स्तर पुढील प्रमाणे असतो. जाती, प्रजाती, कुल, गण, वर्ग, विभाग, संघ.
वनस्पतीमधील सर्वात उच्च स्तरीय वर्गेककास ‘विभाग’ म्हणतात. तर प्राण्यातील सर्वोच्च स्तरास संघ (phylum) म्हणतात.
Mpsc Exam Syllabus Pdf Download
All Exam Syllabus Pdf Download
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now