गट-ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१
महाराष्ट्र शासन,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
गट-ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१
शासन मान्यता पत्र क्रमांक: पदभरती-२०२१/प्र.क्र.२८८/सेवा-५, दि. २१-५-२०२१. आयुक्त, आरोग्य आयुक्तालय, मुंबई यांचे अधिपत्याखालील विविध कार्यालयातील संवर्ग निहाय पदे भरण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत गट ड संवर्गातील सोबत तक्यात दर्शविण्यात आलेली रिक्त
पदे भरती करण्यासाठीची कार्यवाही करण्यात येत आहे. कार्यालयाचे नाव, सवर्गनिहाय पदांचा, सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय तक्ता स्वतंत्रपणे जोडला आहे.
प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● अर्ज भरण्याची मुदत १५ दिवस ● दिनांक ०९/८/२०२१ ते दिनांक २२/८/२०२१ वेळ रात्री १२.०० वाजेपर्यंत राहील.
१. सर्वसाधरण सूचना
१.१ उपरोक्त नमूद पदसंख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.
१.२. उक्त संवर्गातील रिक्त पदांमध्ये आंतर मंडळ बदली पदांचा आढावा आंतर मंडळ समायोजन इ.
कारणांमुळे पदसंख्येत व आरक्षण/समांतर आरक्षण यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
१.३. स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अशंत: बदल करणे, पदांच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार शासन राखून ठेवत आहे.
१.४
वरील परिच्छेदामध्ये नमूद संवर्गातील पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शासन गट-ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात 2021
२. शैक्षणिक अर्हता :
२.१. पदाकरिता शासनाने घोषित केलेली कोणतीही तत्सम अर्हता. २.२ पदाकरिता असलेली शैक्षणिक अर्हता परिक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत परीक्षेस तात्पुरते पात्र असतील.
परंतु परीक्षेच्या निकालाच्या पूर्वी संबंधित परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
परिक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणा-या उमेदवारांना त्यांचे पदासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे
केंद्र/राज्य शासनाचे राजपत्रित अधिकारी/पोस्टमास्टर/मुख्याध्यापक व याबाबत प्राधिकृत व सक्षम
अधिकारी यांचेकडून साक्षाकित करून किंवा स्वसाक्षाकित प्रती व मूळ कागदपत्रे तपासणी/ पडताळणी
वेळी सादर करणे आवश्यक राहील.
• शैक्षणिक/व्यावसायिक/तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
• पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र,
• जातीचा दाखला.
• वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र,
• उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र.
• महाराष्ट्राचे (डोमेसाईल्ड) रहिवासी प्रमाणपत्र. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक.
• प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / अतिउच्च क्रिडा प्राविण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र / माजी सैनिक
• उमेदवारांचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.
• दिव्यांग उमेदवारांचे बाबत जिल्हा शल्य चिकित्सक/वैदयकिय मंडळाचे किमान ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
• शासकीय/निमशासकीय कर्मचा-याने त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे पत्र.
आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र,
• ईडब्ल्यूएस दाखला
इतर आवश्यक ती कागदपत्रे,
अर्ज भरताना वरील सर्व (मुळ प्रमाणपत्रांच्या/कागदपत्रांच्या प्रती उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
३. पदसंख्या व आरक्षणा संदर्भात सर्वसाधारण तरतुदी : ३.१ उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा (अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे) उपरोक्त बाबत
शासनाने वेळोवेळी विहित केलेले सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र पडताळणीचे वेळी सादर करणे
आवश्यक राहील.
३.२ महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निराधीसूचित जमाती (विमुक्ती जाती) भटक्या
जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम २००१ (सन २००० वर
महाराष्ट्र अधिनियम ८) हा अधिनियम महाराष्ट्र शासनाने दिनांक २९ जानेवारी २००४ पासून अंमलात
आणला आहे. त्यानुसार उन्नत व प्रगत गटाचे (क्रिमिलेअर) तत्व वि.जा.(अ), भ.ज.(ब), भ.ज.(क),
भ.ज.(ड), विशेष मागास प्रवर्ग/आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व इतर मागास प्रवर्ग यांना लागू
आहे. या प्रवर्गातील सर्व उमेदवारांनी त्यांची जात उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे अर्ज भरतेवेळी
वैध असलेले (नॉन क्रिमिलेअर) प्रमाणपत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक आहे.
३.४
सामान्य प्रशासन विभाग, क्रं. बीसीसी-२०२१/प्र.क्रं. २०६४/२०११/१६ब, दिनांक १२-१२-२०११ नुसार निवड झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांना नियुक्तीच्या दिनांका पासून ६ महिन्याच्या आत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र संबंधित जात पडताळणी समितीकडून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल.
३.५. प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त उमेदवारांच्या प्रमाणपत्राची संबंधित जिल्हयातील जिल्हाधिकारी/जिल्हा पुर्नवसन अधिकारी / सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रत्यक्ष पडताळणी झालेशिवाय त्यांना नियुक्ती
देण्यात येणार नाही. ३.६ गुणवत्ता यादीमध्ये येणा-या माजी सैनिक उमेदवारांनी जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केली असल्यास प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे
आवश्यक आहे. निवड झालेल्या माजी सैनिक उमेदवारांच्या कागदपत्राची सक्षम अधिका-यांकडून पडताळणी झालेशिवाय त्यांना नियुक्ती देण्यात येणार नाही.
३.७ महिला, खेळाडू, माजी सैनिक तसेच अनाथांकरीता असलेले समांतर आरक्षण कप्पीकृत (Horizontal) आहे.
३.८ महिला खेळाडू, गाजी सैनिक तसेच अनाथासाठीचे समांतर आरक्षण शासनाने यासंदर्भात वेळोवेळी केलेल्या आदेशानुसार राहील.
३.९ समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक एसआरव्ही १०१२/प्र.क्र. १६/१२/१६-अ. दिनांक १३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-१११८/प्र.क्र.३९/१६-अ, दिनांक १९ डिसेंबर, २०१८ आणि तद् नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
३.१० महिला आरक्षण हे शासन निर्णय व महिला व बाल कल्याण विभाग क्र.८२/२००१/मेसेआ २०००/प्र.क्रं.४१५/का-२, दिनांक २५ मे २००१ मधील तरतुदीनुसार राहील. खुल्या प्रवर्गातील महिलांना उन्नत व प्रगत व्यक्ती व गट यामध्ये मोडत नसल्याबाबतचे सक्षम अधिकारी याचे अर्ज करतेवेळी वैध असलेले (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक आहे.
३.११ महिलांसाठी आरक्षित पदांकरीता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षाणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच नॉन क्रिमीलेअर मध्ये मोडत असल्याबाबत (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.
३.१२ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या (ईडब्लूएस) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: राआधो-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ. दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र, जाहिरात अर्ज भरतेवेळी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
३.१३ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रं. राक्रीधो-१-२००२/प्र.क्र.६८/ क्रीयुसे-२, दिनांक १ जुलै,
२०१६, शासन शुध्दीपत्रक क्र. राक्रीधो-१-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १०.१०.२०१७, तसेच
शासन शुध्दीपत्रक क्रमांक:राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दि. ११ मार्च, २०१९, आणि तद्नंतर
शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तीचे आरक्षण
तसेच वयोमर्यादेतील सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
३.१४ प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दादा करण्याच्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा
विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे. ३.१५ खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीच्या पडताळणीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले
असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी आरक्षणाकरीता मात्र समजण्यात येणार
नाही.
३.१६ कागदपत्रे पडताळणीच्यावेळी खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकान्याने प्रमाणित केलेले प्राविण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीचा सक्षम प्राधिकान्यांने प्रदान केलेले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणी बाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारशी/नियुक्तीकरीता विचार करण्यात येईल.
३.१७ एकापेक्षा जास्त खेळाची प्राविण्य प्रमाणपत्रे असणान्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्र प्रमाणित करण्याकरीता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे..
३.१८ शासन निर्णय दिनांक १७ जून २०२१ अन्वये सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा संचनालयाच्या अधिपत्याखालील, दद्यकिय शिक्षण व संशोधन विभागाचे शासन निर्णय दिनांक १७ जून २०२१, केंद्र शासन अधिसूचना दिनांक ४ जानेवारी २०२१ गट ड संवर्गामधील पदे या निर्णयातील विवरणपत्र अ मध्ये दर्शविल्या प्रमाणे दिव्यांगासाठी ३३ पदे सुनिश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दिव्यांगातील प्रकारानुसार उमेदवार संबंधित पदासाठी या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्र होऊ शकतील.
३.१९ उर्वरित ७ पदांसाठी समुपदेशनाच्या वेळी शासनाकडून दिव्यांग पदनिश्चित झालेनंतर त्यानुसार संबंधित पदनिहाय दिव्यांग प्रकार नियुक्तीच्या वेळेस विचारात घेण्यात येईल.
३.२० दिव्यांग उमेदवारांची पात्रता शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.
३.२१ दिव्यांग व्यक्तीसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील,
१३.२२ दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदांवर निवड शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे, याचा विचार न करता दिव्यांग गुणवता क्रमांकानुसार त्यांची निवड शिफारस करण्यात येईल.
३.२३ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग व्यक्तीकरीता सुधारीत आरक्षण लागू आहे.
३.२४ दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रकि-२०१८/प्र.क्र.४६/आरोग्य-६, दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाचे www.swavlambancard.gov.in या संगणकीय प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.
३.२७ अपंग व्यक्ती (समान संधी) संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण अधिनियम, १९९५ अन्वये दिलेली Manually
स्वरुपातील दिव्यांगत्व प्रमाणपत्रे व SADM या संगणकीय प्रणालीव्दारा देण्यात आलेली दिव्यांगत्व प्रमाणपत्रे यापुढे सदर प्रमाणपत्रात नमूद केलेल्या कालावधीपर्यंत वैध राहतील.
३.२८ अनाथ व्यक्तीचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्रमांक अमुजा-२०११/प्र.क्र. २१२/का-३, दिनांक २ एप्रिल २०१८ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील. अनाथाचे प्रमाणपत्र आयुक्त, महिला व बालविकास पुणे यांनी निर्गमित केलेले असावे.
४.दिव्यांग उमेदवार :- लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत
शासन परिपत्रक क्रन्यायाप्र-२०१४/प्र.क्र.१/अ.क.२ दिनांक १८ मार्च २०१४ नुसार फक्त दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित तसेच किमान ४० टक्के कायमस्वरुपी दिव्यांगत्व असलेल्या पात्र उमेदवारांना ते लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास, परीक्षा प्रयोजनार्थ उपरोक्त शासन निणर्यातील तरतुदीनुसार अर्ज भरतेवेळी लेखनिकाच्या मदती संदर्भात अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. अशाच उमेदवारांना लेखनिकाची मदत घेता येईल व अनुग्रह कालावधी (Compensatory Time ) अनुज्ञेय राहील. प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या पात्र दिव्यांग उमेदवारांना, लेखनिकाची मदत आणि/अथवा अनुग्रह कालावधीची
आवश्यकता असल्यास संबंधित उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने अर्ज करित असतानाच त्यामधील
लेखनिक मागणी विषयक पर्यायामध्ये ही माहिती नमूद करणे आवश्यक आहे. तसेच वर नमूद केलेल्या
कायमस्वरुपी दिव्यांगत्व बाबतचे प्रमाणपत्र परिक्षेच्या दिवशी सक्षम अधिका-याकडे सादर करणे बंधनकारक आहे.
४.२. अर्जामध्ये मागणी केली नसल्यास ऐनवेळी मदत घेता येणार नाही अथवा अनुग्रह कालावधी अनुज्ञेय
असणार नाही.
४.३.परीक्षेकरीता लेखनिकाची मदत आणि / अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या पात्र उमेदवारांची यादी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
४.४ .दिव्यांग व्यक्तींना लेखनिक पुरविण्याबाबत व अनुग्रह कालावधी अनुज्ञेय ठरविण्याबाबत मार्गदर्शक सूचना, विविध अर्जाचे नमुने विशेष सूचना, संबंधित शासन आदेश इत्यादी बाबी विभागाच्या http://arogya. maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील विकलांग (दिव्यांग व्यक्ती या सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्यांचे उमेदवारांनी काळजीपूर्वक अवलोकन करावे. ४.४
५. पात्रता आणि कमाल व किमान वयोमर्यादा :
५.१. भारतीय नागरिकत्व (महाराष्ट्राचे डोमीसाईल्ड)
५.२. वयोमर्यादा जाहीरातीमध्ये नमूद सर्व पदांकरीता खालीलप्रमाणे वयोमर्यादा असेल.
५.४ पदाकरीता काही वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, अशा पदाकरीता सेवा प्रवेश नियमातील कमाल वयोमर्यादा अधिक अनुभवाचा कालावधी इतपत किंवा पदाच्या विशेषज्ञतेनुसार व आवश्यकतेनुसार वयाच्या ४५/५० वर्षापर्यंत अशी वयोमर्यादा शासन सेवेतील कर्मचारी यांच्या करीता विहीत करण्यात आली आहे.
५.५
दिव्यांग प्रवर्गातील, प्रकल्पग्रस्त, मूकंपग्रस्त, सन १९९१ चे जनगणना व १९९४ चे निवडणूक कर्मचारी यांचेकरीता कमाल वयोगर्यादा ४५ वर्षे असेल.
५.६ खेळाडू प्रवर्गाकरीता वयोमर्यादा ४३वर्षे राहील.
५.७ सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रं. राधाओ-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ दि.१२.२.२०१९ अन्वये खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरीता नियुक्तीसाठी सरळसेवेच्या पदांमध्ये १० टक्के
उमेदवाराप्रमाणे लागू असेल,
अनाथ व्यक्तीचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग क्रमांक: अमुजा-२०११/प्र.क्र. ●२१२/का-३, दिनांक २ एप्रिल, २०१८ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.
५.१० अमागारा गाजी सैनिकासाठी वयोमर्यादा उमेदवाराचे सध्याचे वय बजा सैनिक दलातील सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष कमाल मर्यादा ३८ वर्ष मागास माजी सैनिकासाठी वयोमर्यादा उमेदवाराचे सध्याचे वय वजा सैनिक दलातील सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष कमाल मर्यादा ४३ वर्ष दिव्यांग माजी सैनिकासाठी वयोमर्यादा उमेदवाराचे सध्याचे वय बजा सैनिक दलातील सेवेचा कालावधी अधिक • तीन वर्ष कमाल मर्यादा ४५ वर्ष
५.१० विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथील केली जाणार नाही.
६. मराठी भाषेचे ज्ञान :
६.१ उमेदवाराला मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील.
६२ उमेदवाराला नियमानुसार मराठी व हिंदी भाषेच्या परीक्षा, त्याने अगोदरच उत्तीर्ण केलेल्या नसतील तर निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राही
7.परीक्षा आयोजनासाठी सत्रानुसार पदांचे संभाव्य गट
७.१ गट ड संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदासाठीची परीक्षा एकाच सत्रामध्ये घेतली जाईल. तेव्हा एकापेक्षा अनेक पदांसाठी व एकाच पदासाठी अनेक ठिकाणी अर्ज केला असल्यास उमेदवाराने ज्या ठिकाणी व ज्या पदासाठी परीक्षा दिली असेल तेथीलच पदासाठी व संबंधित ठिकाणी गुणवत्तेच्या
७.२ निकषावर निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाईल. उमेदवारांनी ज्या पदांसाठी व ज्या कार्यालयांसाठी उमेदवारी अर्ज केले असतील त्यानुसार त्यांना कोणत्या परीक्षा केंद्रावर लेखी परिक्षेसाठी उपस्थित रहावे लागेल याबाबतची माहिती परीक्षा प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल.
८. परिक्षेचे स्वरुप
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानि १२१६/प्र.क्रं. (६५/१६)/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे राहील.
७.१ सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेत एकूण ५० प्रश्न असतील,
प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त ०२ गुण ठेवण्यात येतील. एकूण १०० गुणांची परिक्षा असेल.
७.२ गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
७.३ विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमधील त्या त्या संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील.
९)निवड पध्दत
● उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.
• उमेदवाराने परिक्षेच्या एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. अशाच
उमेदवारांना निवडसूची बनवताना पात्र ठरविण्यात येईल.
● परिक्षेचा निकाल तयार करताना ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिर्म१२१६/(प्र.क्र.६५/१६)/१३-अ. दिनांक १३/०६/२०१८ मधील निकावर लावला जाईल.
• भरतीच्या अनुषंगाने शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय लागू राहतील. शासन अधिसचना सामान्य प्रशासन विभाग के. एसआरव्ही-२०००/प्र.कंप २०००)/१२. दिनांक २८
• उमेदवाराने परिक्षेच्या एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. अशाच उमेदवारांना निवडसूची बनवताना पात्र ठरविण्यात येईल.
● परिक्षेचा निकाल तयार करताना ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिर्म१२१६/प्र.क्र.६५/१६)/१३-अ. दिनांक १३/०६/२०१८ मधील निकषावर लावला जाईल.
● भरतीच्या अनुषंगाने शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय लागू राहतील.
शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरव्ही-२०००/प्र.क्र १७(२०००)/१२, दिनांक २८ मार्च २००५ व शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्ही-२०००/प्र.क्र.१७/२०००/१२, दिनांक १ जुलै २००५ नुसार लहान कुंटूब असल्याचे सोबतच्या नमुन्यातील प्रतिज्ञापत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक आहे. (अविवाहीत उमेदवारांनी लागू नाही असे नमूद करून स्वत:ची स्वाक्षरी करावी) अंतिमरित्या निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्रं अनियो-१००५/१२६/सेवा-४, दिनांक ३१-१०-२००५ नुसार नवीन पारिभाषिक अंशदान निवृत्ती योजना लागू होईल; सर्वसाधारण भविष्य
निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही. • गट ड संवर्गाची पदे भरताना कार्यालय निहाय माहिती उमेदवारास उलब्ध करुन देण्यात येत आहे. एका जिल्हयातील विविध कार्यालयासाठी उमेदवारास एकच अर्ज करता येईल. हा अर्ज जिल्हा कार्यालयातील सर्व पदांच्या गुणवत्तेस ग्राहय धरणेत येईल. अंतिम निवडीकरीता जिल्हानिहाय एकच गुणवत्ता यादी तयार करून समुपदेशनाव्दारे व गुणवत्तेनुसार पद निवडी करीता पर्याय उमेदवारास उपलब्ध करून देण्यात येईल.
१०. प्रमाणपत्र पडताळणी :
१०.१ शिफारस पात्र उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याकडून बोलविण्यात येईल.
१०.२ उमेदवाराने प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची पात्रता जाहिरात/ शासन परिपत्रकातील अर्हता / अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्राच्या आधारे सक्षम प्राधिकान्याकडून तपासली जाईल. १०.३. अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी केली जाईल.. १०.४. विहित कागदपत्रे सादर करु न शकणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाणार नाही. तसेच त्याकरिता
कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
१०.५ वरीलप्रमाणे लेखी परीक्षेच्या निकालाआधारे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निश्चित केलेल्या ठिकाणी व विहित वेळेत घेण्यात येईल. त्याकरिता उमेदवारास स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
१०.६ अर्जातील दाव्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्याकडून करण्यात आलेल्या प्रमाणपत्र पडताळणीच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच नियुक्ती देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.
११. परिक्षा शुल्क :
सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे शुल्क आकारले जाणार असून सदर परिक्षा शुल्क हे ना-परतावा राहिल. उमेदवाराने भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये अनेकदा अर्ज करणे, अर्ज चुकणे, काही कारणास्तव परीक्षेस बसू न शकणे, परीक्षा रद्द होणे इत्यादी अशा कारणांसाठी) परत केले जाणार नाही. उमेदवाराने एकापेक्षा अनेक पदांकरिता अर्ज केले असल्यास प्रत्येक पदाकरीता वेगळे • परिक्षा शुल्क आकारले जाईल.
१- अमागास ६००/-
२:- मागासवर्गीय व ईडब्ल्यूएस- ४००/
१२. सेवा प्रवेशोत्तर शर्ती :
नियुक्त झालेल्या व्यक्तीस खालील परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील :
अ) जेथे प्रचलित नियमानुसार विभागीय/व्यावसायिक परीक्षा विहित केली असेल अथवा आवश्यक असेल तेथे त्यासंबंधी केलेल्या नियमानुसार विभागीय / व्यावसायिक परीक्षा.
ब) हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार जर ती व्यक्ती अगोदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर ती परीक्षा.
१३. अर्ज करण्याची पध्दत :
१३.१ प्रस्तुत परिक्षेसाठी सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर जाहिरात आरोग्य विभागाच्या http://arogya.maharashtra.gov.in, http://nrhm.maharashtra.gov.in संकतेस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी www.arogyabharti2021.in या संकेतस्थळावर अचूक माहिती काळजीपूर्वक पध्दतीने ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
१३.२ परीक्षेसाठी विहित नमुन्यामध्ये उपरोक्त नमूद संकेतस्थळावरीलच ऑनलाईन पध्दतीने सादर केलेलेच अर्ज व परिक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील.
१३.३ इतर कोणत्याही माध्यमाच्दारे अर्ज अथवा शुल्क स्वीकारले जाणार नाही. यापूर्वी आरोग्य विभागाकडे नोकरीकरीता केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जाची प्रत कोणत्याही कार्यालयास समक्ष ईमेलव्दारे, पोस्टाने पाठवून नये..
१३.४ तसेच सदर संकेत स्थळावर प्रस्तुत जाहिरात संदर्भातील भरती प्रक्रिये दरम्यान विभागामार्फत प्रसिध्द केल्या जाणा-या संकेतस्थळाला उमेदवाराने वेळोवेळी मेट देणे व भरतीप्रक्रियेसंदर्भात अदयावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची असेल.
१३.५ उमेदवारांनी वेबआधारित ऑनलाईन अर्ज www.arogyabharti2021.in या संकेतस्थळाद्वारे दिनांक ०७/८/२०२१ पासून दिनांक २०/८/२०१वधीतच सादर करणे आवश्यक राहील.
१३.६ ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आरोग्य विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
१३.८
ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग केंद्र महाराष्ट्र शासन, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालये, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अथवा अन्य शासकीय कार्यालयात नाव नोंदणी केली असेल त्यांनी देखील ते इच्छुक व पात्र असल्यास विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
१३.९
उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमाचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तीची व्यवस्था आढळल्यास किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांने चुकीची माहिती दिल्याचे तसेच प्रमाणपत्र / कागदपत्रे कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची/ तिची निवड रद्द बातल करण्यात येईल. तसेच नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त
करण्यात येईल. १३.१० उमेदवारांना परिक्षेसाठी नियोजित स्थळी व वेळी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
१३.११ शासकीय निमशासकीय कर्मचा-यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिका-यांची परवानगी घेऊन तसा अर्ज करावा. निवड झालेल्या उमेदवारांना सदर पत्राची प्रत उमेदवारांची निवड झाल्यास प्रमाणपत्र तपासणीवेळी सादर करावी लागेल.
१३.१२ ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना शैक्षणिक अथवा अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण अचूक माहिती भरणे आवश्यक राहील. सदर अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अथवा चुकीची असल्यास अर्जामध्ये राहिलेल्या त्रुटीसंदर्भात कोणतेही निवेदन स्वीकारले जाणार नाही. याकरीता उमेदवाराने अर्ज परिपूर्ण व योग्य रित्या भरण्याची संपूर्ण जबाबदारी ही उमेदवाराची राहील. निवडीच्या कोणत्याही टप्यावर अर्जातील माहिती चुकीची आढळल्यास परिक्षेला बसू न देणे, उमेदवाराची निवड रदद करणे याचे संपूर्ण अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागास राहील. १३.१३ अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परिक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
१३.१४ परिक्षेची तारीख व रूपरेषा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या http://arogya.maharashtra.gov.in व
http://nrhm.maharashtra.gov.in व http://arogya.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. १३.१५ परिक्षेतील गुणानुक्रम व आरक्षण विचारात घेऊन निवड झालेल्या उमेदवारांची नावे सार्वजनिक
आरोग्य
विभागाच्या http://arogya.maharashtra.gov.in व http://nthm.maharashtra.gov.in
या
संकेतस्थळावर उपलब्ध होईल. १३.१६ जाहिरातीतील कोणतेही मुद्दे शासन निर्णयाच्या विसंगत असल्यास, शासन निर्णय अंतिम राहिल.
१३.१७ नैसर्गिक आपत्तीमुळे व अन्य कारणामुळे विहित दिनांकास परीक्षा घेणे शक्य नसेल तर शासन ठरवून देईल, त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल. याबाबत सर्व उमेदवारांना वर्तमानपत्रातील जाहिरातीव्दारे अथवा आरोग्य विभागाचे http://arogya.maharashtra.gov.in, व
http://nrhm.maharashtra.gov.in संकेतस्थळावर व www.arogyabharti2021.in संकेतस्थळावरून कळविण्यात येईल. १४. केंद्र निवड:
१४.१. केंद्र निवडीचा पर्याय नसून ज्या विभागाच्या पदांकरीता अर्ज केला आहे त्याच विभागतील जिल्हयात परिक्षा आयोजित केली जाईल. परिक्षा केंद्राबाबतची माहिती प्रवेश पत्रावर देण्यात येईल. १४.२. जिल्हा केंद्र अथवा उपकेंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य करण्यात येणार नाही.
४.२. जिल्हा केंद्र अथवा उपकेंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य करण्यात येणार नाही.
11
१५. प्रवेश प्रमाणपत्र :
१५.१. प्रस्तुत परीक्षेपुर्वी सर्वसाधारणपणे ७ दिवस अगोदर प्रवेशप्रमाणपत्र उमेदवाराच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यांची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करुन घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
१५.२. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेशप्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय, परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
१५.३ ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट व स्मार्ट कार्ड प्रकारचे वाहन चालविण्याचा परवाना यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तरीच गूळ ●ओळखपत्राची उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्यांच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राहय धरला जाणार नाही व उमेदवारास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.
१५.४ आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधार पर उमेदवारांचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhaar Generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट प्रतीमध्ये आधार डाऊनलोड केले असल्यास ई-आधार वैध मानण्यात येईल.
१५.५. नावांमध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत), नावांत बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावांत बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे.
१६. परिक्षेस प्रवेश
१६.१. फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशप्रमाणपत्र, गोळखीचा मुळ पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचनेनुसार विभागाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल.
१६.२. स्मार्ट बाँच, डिजीटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचार साधने म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तू, इलेक्ट्रनिक उपकरणे, वहया, नोटस, परवानगी नसलेली पुस्तके, बॅग्ज, परिगणक (calculator) इत्यादी प्रकारची साचने/ साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास स्वतःजवळ बाळगण्यास त्याचा वापर करण्यास अथवा त्यांच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणल्यास ते परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्याची व त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.
१६.३. विभागाने परवानगी नाकारलेले की प्रकार अनधिकृत साधन/साहित्य परीक्षच्यावेळी संबंधित उपकेंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साचन / साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस विभाग, जिल्हा प्रशासन
प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पध्दत आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादी बाबतच्या सविस्तर तपशिलासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या http://arogya. maharashtra.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती व अधिसूचना अधिकृत समजण्यात येईल.
सविस्तर जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या http://arogya. maharashtra.gov.in व http://nrhm.maharashtra.gov.in रकितस्थळावर तसेच www.arogyabharti2021.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना सोबत जोडल्या आहेत.
ठिकाण:
दिनांक ०७/०८/२०२५
(डॉ. अर्चना पाटील) संचालक, आरोग्य सेवा, पुणे