Hindi Physics Practice Question Set 5 द्रव्याच्या अवस्था विश्व द्रव्याचे
Hindi Physics Practice Question Set 5
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
द्रव्याच्या अवस्था विश्व द्रव्याचे
वस्तुमान (m) –
प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत.
एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.
वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.
आकारमान (v)
भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.
🌷घनता –🌷
घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.
घनता=वस्तुमान (m)/आकारमान (v)
गुणधर्म –
द्रव्य जागा व्यापते.
द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.
द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.
द्रव्याच्या अवस्था –
🌺स्थायुरूप
🌺द्रवरूप
🌺वायुरूप
1. स्थायू आवस्था :
स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.
जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.
स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो. स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.
स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.
उदा. रबर, लाकूड, हिरा इ.
2. द्रव अवस्था :
द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.
द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.
द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.
द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.
उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.
3. वायु अवस्था :
वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.
वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.
उदा. हवा, गॅस इ.
अवस्थांतर :
स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.
द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.
वायुला उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.
सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा
इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now