Hindi Biology Practice Questions Set 8 वनस्पती ऊती व प्रकार व त्यांचे वर्गीकरण दिले आहेत ते पुढील प्रमणे.
Hindi Biology Practice Questions Set 8
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
वनस्पती ऊती व प्रकार
शरीरांच्या भागांना अवयव म्हणतात. अवयव हे ऊती पासून बनलेले असतात. ऊती या पेशिसमुहापासून बनलील्या असतात. सजीवांच्या विविध अवयवांची कार्य भिन्न असल्यामुळे यांच्या रचनेतही फरक दिसून येतो.
वनस्पतींची वाढ हि त्यांच्या मुळ व खोडांच्या अग्रभागी दिसून येते. याचे कारण म्हणजे अग्रभागासी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ऊती असतात. पेशींच्या विभाजन क्षमतेनुसार वनस्पती उतीचे विभाजी ऊती व स्थायी ऊती असे वर्गीकरण केले जाते.
हि एकाच वनस्पती ऊती अशाप्रकारची ऊती आहे, ज्यात पेशिविभाजानाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते.
यातील पेशींच्या भित्तिका पटल असतात. यामध्ये ठळक केंद्रक असते. त्याचे झपाट्याने विभाजन होते.
विभाजी ऊती हा सुद्धा एक प्रकार आहे.(Entercalary Meristem).
प्ररोह विभाजी ऊती हि खोडाच्या व मुलाचा अग्रक़्भगि असते.
किंवा मुळचा घेर व्रुंडी पार्श्व विभाजी उतीमुळे होते.
अंतर विभाजी ऊती हि पानांच्या तळासी व फांदीच्या तळासी असते. त्या अतिक्रियाशील असतात.
विशिष्ट भूमिका बजावल्यानंतर विभाजी उतीच्या पेशी विबाह्जानामुळे तयार झालेल्या पेशींची विभाजनाची प्रक्रिया थांबते.
वनस्पती ऊती व प्रकार पुढे
स्थायी ऊती :
यामुळे स्थायी ऊती तयार होतात . स्थायी आकार , आकृती व कार्य घडवण्याच्या या प्रक्रियेस ‘विभेदन’ (differentiation) असे म्हणतात.
स्थायी ऊती या सरळ स्थायु किंवा जातील स्थायू ऊती असतात.
सरल स्थायी ऊती :
या ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असून या उतींचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते.
मुल ऊती:
यातील पेशी जिवंत असतात. यात केंद्रक असून याची भित्तिका पातळ असते.
या पेशींमध्ये मोकळी जागा असते. या पेशी बटाटा व बिट यासारख्या वनस्पतीत अन्न साठवण्याचे कार्य करतात .
हरित ऊती:
वनस्पतींच्या पानामधील ऊतींना हरित ऊती म्हणतात.
वायू ऊती:
जलीय वनस्पतीमध्ये अंतरपेशिय पोकळ्यामुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. पाण्यावर तरंगण्याची क्षमता देतात . त्यांना वायू ऊती असे म्हणतात
स्थूलकोन ऊती :
या ऊती प्रामुख्याने पानाच्या डेठात आढळतात . त्या पाने,खोड व फांद्या यांना लवचिकता देतात .
दृढ ऊती :
दृढ ऊती मधील पेशी मृत असतात . त्यांच्या भिंती जाड असतात . या ऊती खोड संवाहणी पूल . शिरा व बियांच्या कठीण कवचामध्ये आढळतात .
विशिष्ट रचणे मुळे वनस्पती टणक व ताठ बनतात.
मलमलचे कापड अंबाडीच्या दृढ ऊतीपासून बनवले जाते .
🌿पृष्ठभागीय ऊती :🌿
🌷वनस्पतींचा संपुर्ण पृष्ठभाग हा पृष्ठभागीय उतींच्या थराने बनतो .
🌷या आपित्वाचीय पेशी सपाट असतात.
🌷हि ऊती वनस्पतीच्या सर्व भागांचे संरक्षण करते.
🌷निवडूंगासारख्या वनस्पतींचे बाह्य आवरण हे जाडसर असते.
🌷बाह्य आवरणातील पेशी नेहमी मेणासारखा पदार्थ स्त्रवत असतात. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.
🌷वातावरणा बरोबर वायूंचे देवाणघेवाण करण्यासाठी पानांच्या बाह्य आवरणाला सूक्ष्मछिद्रे असतात . त्यांना पर्णरंध्रे असे म्हणतात.
🌷पर्णरंध्रा भोवती घेवड्याच्या आकाराच्या दोन रक्षक पेशी असतात. त्या पर्णरंध्राची उगढझाप नियंत्रित करतात.
🌷पर्णरंध्रा मधून बाष्पउत्सर्जन होते.
🌿जटील स्थायी ऊती 🌿:
🍃जटील स्थायी ऊती मधील पेशींमध्ये एकमेकांत समन्वय असतो.
🍃संवहणी ऊती हि जटील ऊती आहे . मुले, खोड , पाने यामध्ये हि असते . ती पाणी व अन्न यांचे वहन करते.
🍃मूळ,खोड व पानातील संवाहणी ऊती एकमेकांशी जोडलेल्या असतात. संवाहणी ऊती हे उच्च स्तरीय वनस्पतींचे महत्त्वाचे कार्य आहे.
🍃जलवाहिनी व रसवहिनि हि संवाहिनी ऊती ची उदाहरणे आहेत.
जलवाहिनी :
🍁पेशीभित्तिका जाड असून बहुतेक पेशी मृत असतात.
🍁त्यांचे मुखेत्वे खालील प्रकार पडतात.
🍁वाहिनिका: या पेशी मृत झाल्यावर त्यांच्यातील पेशिद्रव्याचे विघटन होते. त्यानंतर तयार झालेल्या पोकळ जाळ्यातून पाण्याचे वहन होऊ शकते.
🍁वाहिन्या : वाहिनिका पेक्षा रुंद असतात. पाणी व क्षार यांचे वहन होते.
🍁जलवाहिनी : ऊती अन्न साठवते.
🍁जलवाहिनी तंतू : मजबुती देतात.
🍁रसवहिनी : या चार प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या आहेत.
🍁चलन नलिका : सच्छिद्र पटल असते.
🍁रसवहिनी : या चार प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या आहेत.
🍁चलन नलिका : सच्छिद्र पटल असते.
🍁सहपेशी : या चाळण नलिके भोवती असतात .तिच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात.
🍁रसवाहिनी तंतू :मुखेत्वे खोडात असून वनस्पतींना मजबुती देतात.
🍁रसवाहिनी मुलऊती : इतर सर्व प्रकारच्या पेशींना एकत्र ठेवण्यचे काम या पेशी करतात.रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात.पानाकडून शर्करा व अमिनोम्लाचे वनस्पतींच्य खोड व मुळाकडे वहन करतात.
प्राणी ऊती :
🍀 ऊती :🍀
प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे अवयव समन्वयाने काम करीत असतात.
स्नायूपेशी या तंतूरुपात असतात.त्या त्यांची लांबी बदलू शकतात.स्नायू हे उतीचे उदाहरण आहे.
ऑक्सिजन आणि पोषद्राव्याचे सर्व पेशींकडे वाहन करणारे रक्त सुद्धा उतीचे उदाहरण आहे.
प्राणी उतीची अभिस्तर ऊती , संयोजी ऊती , स्नायू ऊती ,चेता ऊती, या प्रमाणे वर्गीकरण केले आहे.
प्राणी शरीरातील बाह्य आणि संरक्षक आवरण अभिस्तर ऊती पासून बनलेले असतात.
शरीरातील इंद्रियसंस्था वेगवेगळी ठेवण्याचे कार्य अभिस्तर ऊती करते.
रक्तवाहिन्या मधील स्तर , फुफुसातील वायुकोश , अन्ननलिका व तोंडातील आतील स्र्तारात सरल पट्टकि अभिस्तर ऊती आढळतात.
आतड्यातील आतील स्तरात स्तंभीय अभिस्तर ऊती असतात .त्यांच्यामार्फत पाचक रस स्त्रवले जातात.
श्वसन मार्गामध्ये रोमक स्तंभीय अभिस्तर असते.
वृक्कनालीकांचाआतील सतार, लाळग्रंथींच्या नलिका यामध्ये घनाभरूप अभिस्तर ऊती असतात.
त्वाचे मधून घाम , तैलद्रव्य , श्लेष्मल पदार्थ इ.स्त्रावण्याचे कार्य ग्रंथील अभिस्तर ऊती मार्फत केले जाते.
संयोजी ऊती :
🌿संयोजी ऊतीमध्ये अधारक असते आणि त्या आधारकामध्ये पेशी रुतलेल्या असतात . अधारक हे जेली सारखे द्रवरूप दाट किंवा दृढ असते.
संयोजी उतींचे प्रकार पुढीलप्रमाणे :
🍃अस्थी: स्नायूंना घट्ट धरून ठेवतात.मुख्य अवयवांना आधार देतात.
🍃रक्त: हे द्रवरूप संयोजी ऊती आहे. यामध्ये लोहित रक्त कणिका , श्वेतरक्तकणिका आणि रक्तपट्टीका,असतात.रक्तद्रवात प्रथिने , क्षार , संप्रेरके असून शरीराच्या विविध भागाकडे वायू , पोषकद्रव्य व संप्रेरके यांचे वहन केले जाते.
🍃अस्थीबंध: यामुळे दोन हाडे जोडली जातात. लवचिक आणि मजबूत असतो.
🍃स्नायुरज्जू: यांच्याद्वारे स्नायू हाडांशी जोडले जातात. तंतुमय ,मजबूत परंतु कमी लवचिक असतात. नेत्रागोलास त्याच्या भोवतालच्या हाडासी जोडतात.
🍃कास्थी: कास्थीमुळे हाडाच्या संध्याच्या ठिकाणी नरमपणा येतो. या पेशी नाक , कान, श्वास नलिका , स्वरयंत्रातील पोकळी यामध्ये आढळतात.
🍃विरळ ऊती: त्वचा व स्नायू यांच्या दरम्यान, रक्तवाहिनिच्या भोवताली , चेतातंतू व अस्थिमज्जेत आढळतात.
स्नायू ऊती :
🌷स्नायू ऊती या स्नायूतंतुच्या लांब पेशी पासून बनलेल्या असतात.
🌷स्नायूंमध्ये असणारे ‘संकोची प्रथिन’ द्वारे स्नायूंची हालचाल होते.
🌷ज्या स्नायुद्वारे आपल्या शरीराच्या हालचालीवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्यास ऐच्छिक स्नायू असे म्हणतात.
🌷या पेशी मधील पेशी लांब,दंडगोलाकार,अशाखीय ,बहुकेंद्रकीय असतात.
🌷ऐच्छिक स्नायुंना कंकाल स्नायू किंवा पट्टकि स्नायू असे देखील म्हणतात.
🌿चेताऊती :🌿
मेंदू,चेतारज्जू,चेतातंतू हे सर्व चेता उतींनी बनलेले असतात.
या उतीतील पेशींना चेतापेशी असे म्हणतात. चेतापेशीमध्ये केंद्रक व पेशीद्र्व्य असते.पेशीद्रव्यातून लांब , केसासारखे बारीक तंतू निघतात त्यास अक्षतंतू म्हणतात.
एखाद्या चेतापेशीची लांबी एक मीटर इतकीही असू शकते.
अनेक चेता तंतू संयोजी उतीद्वारे एकत्र येऊन चेता तयार करतात.
या ऊती चेतना ग्रहण करतात आणि या चेतना अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वहन करतात.
जीवशास्त्र विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा
इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
वनस्पति उतीचे प्रकार Vanspati Uti Prakar Mahithi In Marathi, Tree Tissue Types