Hindi Physics Practice Question Set 9 प्लावक बल आर्किमिडीजचे तत्व तरंगण्याचा नियम
Hindi Physics Practice Question Set 9
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
प्लावक बल आर्किमिडीजचे तत्व तरंगण्याचा नियम
Buoyant Force प्लावक बल :
बोटांनी दाबून पाण्याच्या तळाशी नेलेला लाकडी ठोकळा बोट काढताच उसळी मारून पाण्याच्या पृष्ठभागाशी येतो.
पाण्यात बुडलेला असल्याने ठोकळ्यावर कार्य करणारे पाण्याचे बल ठोकळ्याला वर ढकलते.
द्रवात बुडलेल्या वस्तूला वर ढकलणार्यार बलाला प्लावी बल असे म्हणतात. प्लावी बलालाच प्लावक बल किंवा उत्प्रनोद असेही म्हणतात.
द्रवात बूडालेल्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.
द्र्वाची घनता जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.
द्र्वामध्ये एखादा पदार्थ तरंगणार की बुडणार हे प्लावाकबल ठरविते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तु तरंगते.
प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असल्यास वस्तु बुडते. प्लावक बल वस्तूच्या वजना इतके असल्यास वस्तु द्रवाच्या आतमध्ये तरंगते.
आर्किमिडीजचे तत्व :
घन पदार्थ द्र्वात अंशत: किंवा पूर्णत: बुडाल्यास तो त्याच द्रवात बुडलेल्या आकारमानाएवढे द्रव बाजूला सारतो. यावेळी पदार्थाच्या वजनात घट होते. ही घट पदार्थाने बाजूला सारलेल्या द्र्वाच्या वजनाएवढी असते.
हा निष्कर्ष आर्किमिडीज या विख्यात शास्त्रज्ञाने इ.स.पूर्व 332 मध्ये प्रस्थापित केला. याला ‘आर्किमिडीज तत्व’ असे म्हणतात.
आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ व गणिती होते. बाथटबमध्ये उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना हा शोध लागला. ‘युरेका’असे म्हणजेच ‘मला मिळाले’ असे म्हणत ते बाहेर आले होते.
आर्किमिडीजचे तत्व जहाजे व पाणबुड्यांच्या रचनेसाठी उपयोगी पडते.
दुग्धतामापी (Lactometer), आद्रतामापी (Hydrometer), यासारखी विविध उपकरणे याच तत्वावर आधारीत आहेत.
तरंगण्याचा नियम :
पाण्याहून कमी घनता असलेला पदार्थ पाण्यावर तरंगतो.
लाकडाचा ठोकळा पाण्यावर तरंगतो. पाण्यात जातांना तो पाणी बाजूला सारतो. सारलेल्या पाण्याचे वजन ठोकळ्याच्या वजनाएवढे होते.
या वेळी ठोकळ्याचे वजन आणि ठोकळ्यावर कार्य करणारे प्लावी बल समान असते.
एक लोखंडी जाड पत्रा पाण्यात पडला की तो बुडतो. तथापि तोच पत्रा ठोकून घमेले केले तर ते पाण्यात तरंगते.
अॅल्युमिनियमची फॉईल पाण्यावर तरंगते पण त्याचीच चुरगळून बनविलेली गोळी मात्र पाण्यात बुडते आणि पार्यांवर तरंगते. यांचे कारण घनतेतील बदल होय.
पदार्थाची घनता म्हणजे त्याचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय. त्याचे SI पद्धतीतील एकक किलोग्रॅम/मीटर3 असे आहे.
जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा अधिक असेल तर ती पाण्यात बुडते. मात्र जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा कमी असेल तर ती पाण्यावर तरंगते.
पदार्थाची सापेक्षा घनता म्हणजे त्याच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असणारे गुणोत्तर होय.
सापेक्ष घनता = पदार्थाची घनता / पाण्याची घनता
यालाच पदार्थाचे ‘विशिष्ट गुरुत्व’ म्हणतात.
सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा
इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now