आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad 13 Hajar Padanchi Bharti, जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती
जिल्हा परिषद भरती
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

जिल्हा परिषदेतील १३,५२१ विविध पदांची भरती रखडली
स्पर्धा परीक्षा क्षेत्राला सध्या भ्रष्टाचाराची मोठी कीड लागली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गातील २,७३९, तर गट ‘ड’ ३८ संवर्गातील ३,४६६ पदांसाठी झालेल्या भरतीत घोटाळा झाला आहे. चौकशीअंती या दोन्ही परीक्षेत घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले असून, अनेक आरोपींना अटक केली आहे. मात्र, तरीही या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात येत नाहीत. केवळ रद्द करू, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतात
एमपीएससी समन्वय समितीच्या प्रमुख मागण्या

राज्याच्या ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदांमधील रिक्त असलेल्या पदांची जाहिरात मार्च २०१९मध्ये प्रसिद्ध केली होती. रिक्त असलेल्या १३,५२१ विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. • ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयात बदल करून परीक्षा एका महिन्यात घ्याव्यात. परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्या किंवा खासगी कंपन्या मार्फत घ्यायच्या असल्यास फक्त टीसीएस मार्फत घेण्यात याव्यात. • ग्रामविकास विभागातील फक्त आरोग्य प्रवर्गाच्या परीक्षा न घेता, सरसकट सर्व पदांची भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे, राहुल कवठेकर यांनी केली आहे.
मात्र, निर्णय जाहीर करत नाहीत. त्यामुळे या दोन्ही परीक्षांसह रखडलेली जिल्हा परिषदेच्या १३ हजार ५२१ या विविध पदांची भरती तत्काळ सुरू करावी या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी १० ते ११ या वेळात द्विटर वॉर केला. एमपीएससी समन्वय समितीच्यावतीने या ट्रिटर ट्रेण्डचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील २,७३९ जागांसाठी ४ लाख ५ हजार १६३ विद्यार्थ्यांनी, तर गट ‘ड’ ३८ संवर्गातील ३,४६६ जागांसाठी तब्बल ४ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांनी राज्यातील वेगवेगळ्या केंद्रात परीक्षा दिली आहे. मात्र, या परीक्षेचा पेपर एक दिवस आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे..
चौकशीअंती या दोन्ही परीक्षेत घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले असून, अनेक आरोपींना अटक केली आहे. मात्र तरीही या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात येत नाहीत. सातत्याने या परीक्षा रद्द करण्याबाबत विद्यार्थी मागणी करत आहेत. मात्र, त्यावर काहीही निर्णय घेतला जात नाही.

Serch Your Dream Jobs


