म्हाडा सरळसेवा भरती 2022 गुणांकन पद्धत Pdf Download-म्हाडा सरळसेवा भरती 2022 गुणांकन पद्धत-MHADA Recruitment 2021-महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील सरळसेवा भरती 2022
म्हाडा सरळसेवा भरती २०२१ करीता दि.३१.०१.२०२२ दि.०९.०२.२०२२ या दरम्यान सात टप्प्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणा-या परिक्षेमध्ये क्लस्टर १, ४, ६ व ७ करीता एका पेक्षा जास्त सत्रांमध्ये परिक्षा घेण्यात येणार आहे. यास्तव या क्लस्टर्सची वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतलेल्या परिक्षांची काठीण्य पातळी तपासून गुणांकन करताना Mean Standard Deviation Method (पध्दत) वापरण्यात येईल. Mean Standard Deviation Method या पध्दतीने Normalisation करण्याचा Formula उमेदवारांच्या
माहितीकरीता सोबत देण्यात येत आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने उमेदवारांकरीता तपशिलवार सूचना व परीक्षा केंद्र आवंटन बाबतची माहिती लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावरून प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांनी म्हाडा संकेतस्थळास बारंबार भेट द्यावयाची आहे.