खनिजद्रव्य व त्याचे उपयोग Minerals and their uses
खनिजद्रव्य व त्याचे उपयोग
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते. आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.
खनिज – फॉस्फरस
उपयोग – हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी ए.टी.पीची निर्मितीकरण्याकरिता
अभावी होणारे परिणाम – हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात
स्त्रोत – अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या..
खनिज – पोटॅशियम
उपयोग – चेतापेशीच्या पोषणाकरिता
अभावी होणारे परिणाम – चेतापेशीवर परिणाम होतो
स्त्रोत – सुकी फळे
खनिज – कॅल्शियम
उपयोग – हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता
अभावी होणारे परिणाम – हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.
स्त्रोत – तीळ व पालेभाज्या
खनिज – लोह
उपयोग – रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.
अभावी होणारे परिणाम – लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.
स्त्रोत – हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी
खनिज – तांबे
उपयोग – हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे
अभावी होणारे परिणाम – तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.
स्त्रोत – पालेभाज्या
सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा
इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा
इतर महत्वाच्या लिंक्स
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
Serch Your Dream Jobs