MPSC 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

MPSC 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

MPSC 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेची अंमलबजावणी

मुंबई दि.  13 : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाईल. 

MPSC 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.   

अखेर 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे.  यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.  अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले आहेत.

About Prithviraj Gaikwad

Check Also

नागपूर तलाठी भरती 2026 – 177 पदांची संपूर्ण माहिती

नागपूर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत नागपूर जिल्ह्यात एकूण 177 तलाठी (ग्राम …

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 – 43 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 43 …

मुंबई शहर तलाठी भरती 2026 – 19 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई शहर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई शहर जिल्ह्यात एकूण 19 …

Contact Us / Leave a Reply