एमपीएससी’च्या परीक्षा ढकलल्या पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केला निर्णय
By ऑनलाइन लोकमत on Tue, October 13, 2020 5:33pm सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे एसईबीसी आरक्षण रद्द झाले.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्यानंतर आता अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यातचा निर्णय आयोगातर्फे घेण्यात आला आहे.

एमपीएससी’च्या परीक्षा ढकलल्या पुढे

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे एसईबीसी आरक्षण रद्द झाले. त्यामुळे राज्यातील विविध मराठा समाजाच्या संघटनांनी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही ; तोपर्यंत एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली. त्यानुसार ११ ऑक्टोबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात आली.
परंतु १ नोव्हेंबर व २२ नोव्हेंबर रोजी आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. मात्र, मंगळवारी आयोगाने परिपत्रकाद्वारे १ नोव्हेंबर रोजी होणारी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबर रोजी होणारी दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक यथावकाश प्रसिद्ध केले जाणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले.
Mpsc Job Updates, All Job Updates, Mpsc Notification,