प्रदूषण प्रकार नुकसान उपाय

प्रदूषण प्रकार नुकसान उपाय Pollution type damage measures

प्रदूषण प्रकार नुकसान उपाय

– हवा प्रदुषन -*

———_—-_——-

हवेचे प्रदुशन दोन प्रकारांनी होते 

१) नैसर्गिक प्रदुषन  जसे वादळे, वनवे, ज्वालामुखी, अवर्षन इत्यादींमुळे हवेचे प्रदुषन होते.

अर्थात निसर्गत:च या प्रदुषनावर उपाययोजना होत असतात.

२) मानवनिर्मित हवा प्रदुषन – जसे विविध उद्योगधंदे, निर्मिती प्रक्रिया कारखाने, स्वयंचलित वाहने, घरगुती इंधन ज्वलनातून सातत्याने प्रदुषन होत असते.

नैसर्गिक प्रदुषनाचे परीनाम त्या त्या भागातच जानवतात अशा संकटांचे प्रमानही त्या मानाने कमी असते. पन मानवनिर्मित हवा प्रदुषनाचे परीनाम सर्वदूर राष्ट्राच्या सीमा ओलांडून होत असतात. 

*-विभिन्न प्रदूषकांचे दुष्परीनाम-*

🔸 *कार्बनडायॉक्साईड*

       हा वायू त्या मानाने कमी हानीकारक असुन , सायलंसरमधुन तो बाहेर फेकला गेल्यावर वायूचक्राचा घटक म्हनुन त्यात मिसळून जातो. परंतू तो जागतीक तापमान वाढवन्याचा दुष्परिनाम करत असतो.

🔸 *कार्बन मोनॉक्साइड*

        स्वयंचलित वाहनांमध्ये कार्बोरेटर व थ्रोटल यांच्या सहायाने हवा इंजिन मध्ये जात असते. थ्रोटल या हवेचे प्रमान नियंत्रित करत असतो व कार्बोरेटर या हवेमध्ये पेट्रोल मिसळत असतो. अशी हवा व पेट्रोल इंजिनमध्ये पाठवली जाते , तेंव्हा या मिश्रनाचे आदर्श.  प्रमान १४:५ असे असावे लागते. या आदर्श मिश्रनाच्या ज्वलनातून मुख्यत: कार्बनडायॉर्साइड व पान्याची निर्मिती होते. जर या मीश्रनातील हवेचे प्रमान कमी झाले तर, पेट्रोलच्या संपुर्न ज्वलनाला लागनारा प्रानवायू कमी पडतो. त्यामुळे पेट्रोलचे संपुर्न ज्वलन होत नाहू.त्यामुळे कार्बनडायॉक्साइड  त्याबरोबरच कार्बनमोनॉर्साइड हा अत्यंत विषारी वायू तयार होतो. तो रक्तात मिसळला गेला तर रक्तातील प्रानवायूचे प्रमान कमी होते. त्यामुळे शारिरीक क्रिया मंद होत जातात. या प्रदुषकाचा परिनाम मुथ्यत:श्वसन संस्थेवर होत असतो. र्हदयविकारग्रस्त, गर्भवती स्त्रीयाव गर्भ यांना हे प्रदुषक अतिशय घातक आहे. 

*उपाय*

कार्बनमोनॉक्साइडची निर्मीती मुळातच कमि व्हावा हाच महत्वाचा उपाय आहे. वाहन इंजिनचे सोग्य प्रकारे ट्युनिंग केल्याने इंधन व हवा यांचे प्रमान योग्य राखले जाउन इंधनाचे संपुर्ण ज्वलन होउ लागले की हा विषारी वायू अत्यल्प प्रमानात निर्मान होइल.

🔸 *अर्धवट जळालेले हायड्रोकार्बन*

         इंजिनच्या ज्वलनकक्षेतील इंधन पुर्णपने जळू न शकल्याने अर्धवट किंवा न जळलेले हायड्रोकार्बन्स निर्वात पंपाद्वारे बाहेर फेकले जातात. ‘ दोन स्ट्रोक ‘ वर्गातील स्वयंचलित वाहनातून अर्धवट जळालेले हायड्रोकार्बन्स निर्मान होन्याते प्रमान जास्त आहे. हे हायड्रोकार्बन्स श्वासाबरोबर शरिरात जाउन कँसर होउ शकतो. त्याचा जास्त दुष्परिनाम फुफ्फुसांवर होतो. या समस्येवर निश्चितपने मात करेल अशी उपाययोजना अद्याप तरी अस्तित्वात नाही.

🔸 *सल्फरडायॉक्साइड*

         इंधनात असलेल्या सल्फर यंयुगांचे ज्वलन झाल्यास हा वायू तयार बोतो. त्यामुळे घशात गुदमरने, नाकातून रक्त येने, , डोळ्यांची आग , खोकला अशा आजारांबरोबर फुफ्फुस व इतर अवयवांना हानी पोचते.

🔸 *नायट्रोजन ऑक्साइड*

      नायट्ट्रोजन्यची ऑक्साइड्स ही इंजनाच्या ज्वलनकक्षात उच्च तापमानाला प्रानवायू व नायट्रोजनच्या संयोगामुळे निर्मान होतात. नायट्रिक ऑक्साइड पासुन आरोग्याला तशी कोनतूही हानी पोचत नसली तरी त्यांचा अधिकांश भाग नायट्रोजन ऑक्साइडमध्ये रबपींतरीत होत असतो. हा वायू अत्यंत विषारी असतो. श्वसन शक्तिवर ते दुष्परिनाम करतात तसेच दृष्टी आणि गंधशक्तिवर ते परीनाम करतात. वातावरनातल्या आर्द्रतेशी त्यांचा संयोग झाला की नायट्रीक आम्ल तयार होते. पावसाच्या थेंबाबरोबर हे आम्ल जमिन प्रदुषित करते. पिके नष्ट करते  पान्याचे साठे प्रदुषित होतात. 

—————————-

हवा प्रदुषनावर उपाययोजना

१) लोकसंख्येला आळा घालन्यासाठी व्यक्ती, समाज व शासन या पातळायांवर नियोजनपुर्वक काम करायला हवे.

२) प्रदूषक जिथे निर्मान होतात , त्या जागा म्हनजे ऊर्जा प्रकल्प,रासायनिक कारखाने,अशा विविध ठिकानी प्रदूषके निर्मान होतात.तिथे सुरवातिलाच प्रदूषकांच्या निर्मितीवर कडक निसंत्रन ठेवता येने शक्य आहे. तसेच प्रदूषक आणि त्यांची सहनसीमा प्रत्येक उद्योगाने कटाक्षाने पाळली तर हवा प्रदूषनाचे प्रमान निश्चितच कमी होइल. 

३) कोळसा ट,डिजल इत्यादींचा वापर करुन उर्जा निर्मान करताना मोठ्या प्रमानात हवेचे प्रदूषन होते. त्याचप्रमाने अणुउर्जा प्रकल्पांमध्ये हानिकारक विकीरनाचा धोका असतो. ही हानी टाळन्यासाठी लौरऊर्जा, पवनऊर्जा, व जैविकऊर्जा , सागरीऊर्जा अशा पारंपारीक ऊर्डास्त्रोतांचा विकास सर्वत्र होने आवश्यक आहे.

४) उत्सर्जित होनारिया उपद्रवकारक वायूंवर प्रक्रिया करून , संस्करन करून ते निरूपद्रवी रसे होतूल यावर संशौधन करायला हवे.

५) एकाच ठिकानी कारखान्यांची गर्दी झाली की , त्या परीसरातील सर्वच वातावरन प्रदूषित होते. त्यासाठू कारखाने विकेंद्रुत स

्वरूपात निर्मान करन्याची गरज आहे.

६) कारखान्यांतून बाहेर पडनार्या विषारी वायुंवर व सुक्ष्म कनांवर , ते बाहेर पडन्या आधिच प्रक्रिया करन्याची यंत्रना सूक्ष्मपने सुरु असने आवश्यक आहे.

७) प्रत्येक लहानमोठ्या कारखान्या भोवती हरीतपट्टा निर्मान करन्याची कडक नियम व अमलबजावनी हवी.

८) लोकजागृती ही अत्यंत महत्वाची बाब असल्याने लोकशिक्षनातून जागृतीची मोहिम सातत्यानेवचालू रहायला हवी.

९) वाहनांची देखभाल स्वत:च कशी केली पाहीजे याची माहिती वाहन चालकांना करून घेणे आवश्यक आहे.

————————————————————————————————

जलप्रदूषन कारने

१) *दैनंदिन वापरातून प्रदूषन* –

      दैनंदिन स्वच्छता, कपडे,धुणे,भांडी घासने यामध्ये डिटर्जंट ,साबन,रासायनिक द्रव्य यांचा वापर केला जातो. यामुळे प्रदुषित झालेले पाणी ड्रेनेजमार्फत नदिला मिळते. मलमूत्रही त्यात असते. ड्रेनेदची सोय नसलेल्या ठिकानचे सांडपाणी जमिनीत मुरुन भूगर्भातील पाणी साठ्यात मिसळते. त्यांमुळे तलाव व विहिरींचे पाणी दूषित होते.

२) *औद्योगीक अपशिष्टे*

          कारखान्यांमध्ये पाण्याचा अनेक कारनांसाठी वापर केला जातो. वापरलेले अशुद्ध पाणी तसेच रसायने , वंगने,तेल,शिशे,लोखंड इत्यादी धातूंचे सुक्ष्म कन अल्केहोल,साखर,कागद या उद्योगातील टाकाउ पदार्थ तसेच गंधक आम्लांचे अंश अशी विभिन्न स्वरूपातील अपशिष्टे म्हनजेच टाकाऊ पदार्थ मिसळलेले पाणी कारखान्यातून बाहेर सोडले जाते. ते नदी , नाले, तवाव इत्यादीतवमिसळले की ते पान्याचे स्त्रोत प्रदूषित होतात.

३) *किटकनाशके व खते*

      उत्पादन वाढीसाठी शेतीत रासायनिक खते व किटकनाशकांचा फवारन ी साठी उपयोग केला जातो. यातिल काही अंशच वनस्पति शौषुन घेतात व उरलेले हवेत मिसळतात.द्रवरूपातील उरलेली नाशके जमिनीत,पान्यात विरघळतात. पाऊस पडताना ही नाशके जमिनीखाली जातात किंवा वाहुन नदी नाल्यांना मिळतातअशा विषारी द्रव्यांमुळे हवा , पाणी व जमिन प्रदूषित होते. 

४) *वातावरनातील प्रदुषके*

         उद्योगधंद्यामुळे निर्मान झालेली प्रदुषके वातावरनात असतात. ते पावसाबरोबर खाली पोचतात. हे प्रदूषित पानी नदी नाल्यांना मिळते त्यामुळे जल प्रदुषन होते.

५) *खनिज तेल*

       तेल वाहतुक करनार्या जहाजातून  गळती होते. जहाजाचा अपघात झाल्यास तेल संपुर्न समुद्रावर पसरते. त्यामुळे शेकडो मैल समुद्राचे प्रदूषन होते. यमुद्रात्या पान्यात तेल तवंगामुळे प्रानवायू समुद्रात पोचत नाही. त्यामुळे जलचरांची हानी होते. पृष्ठभागावर वावरनार्या पानपक्षाच्या पंखांना तेल चिकचून राहिल्याने ते उडू शकत नाहीत. त्यांची जिवितहानी होते. 

६) नद्यांमध्ये मृत प्राणी, अर्धवट जळालेली प्रेते, निर्माल्य राख, उत्सवातील मुर्ती, प्लास्टिक कचरा, मलमुत्र विसर्जन, अशा अनेक गौष्टी टाकल्या जातात. त्यामुळे दल प्रदुषन होते

 जलप्रदुषन नियंत्रण आणि उपाय

*🔸-सार्वजनिक उपाय-*

१) विहिरी व जलाशयांमध्ये तुरटी,पोच्याशियम परमँगन्ट टाकने.

२) विहीरी व तलावांची नियमित सफाई करने , बंदिस्त करने.

३) विहिरीत उतरन्यासाठी असलेला मार्ग बंद करने

४) जलाशयांजवळील सांडपान्याचे मार्ग बंदवकरने

५) फिल्टर पद्धतिचा अवलंब करने

*🔸- भौतिक पद्धती -*

१) पाणी काहीकाळ स्थिर ठेवने त्याने अशुद्ध पदार्थ तळाला बसतात. चांगले पाणी वर राहते.

२) पाणी उकळुन घेतल्याने त्यातिल जिवानु नष्ट होतात. हे पाणी बेचव असले तरी पिन्यास योग्य असते. ही पद्धति घरगुती स्वरूपात सोयीची आहे.

३) पाणी उकळुन वाफ करने व ती थंड करुन पाणी करने या पद्धतिने शुद्ध व गुनकारी पाणी मिळते. अशा पान्याचा उपयोग औषधनिर्मीती मध्ये करतात.

*🔸- रासायनिक पद्धती -*

     १)    गढुळ पाणी शुद्ध करन्यासाठी तुरटी फिरवतात. त्यामुळे माती, नविरगळनारे कन आणि ब्याक्टेरिया तळाशी बसतात. 

     दुसर्या प्रकारात पोटँशियम परमँगनेट , क्लोरिन ग्यास, चुना, आयोडिन, ब्लिचिंग पावडर यांसारखिया किटानुनाशक पदार्थांना पान्यात मिसळून ब्याक्टेरियासारखे किटाऩु नष्ट केले दातात.

*🔸- यांत्रिक पद्धति -*

१) मलमुत्रव टाकाउ पदार्थ , उतर सांडपाणी नाल्यात व समुद्रात सोडन्यापुर्वी त्यावर प्रकि्रिया करून मगच सोडायला हवे.

२) पाणी प्रदुषित होन्यासारख्या जागा हेरुन त्या ठिकानी पानी परीक्षनीची सोय होने आवश्यक आहे.

३) प्रदुषके सेडनारे उद्योग व कारखान्यांनी प्रक्रिया संयंत्रे उभारुन ती कार्यरत ठेवायला हवीत.

भूमी प्रदूषण प्रकार नुकसान उपाय

————————————————————————————————

*- कारणे -*

जमिनीचा गैरवापर यामुळे तिच्या प्रतित बदल घडतात. अगदी सुरवातीला मानव शिकार करुन जगत होता. नंतर शेतीचा शौध लावून तो स्थिर झाला. शेतीसाठी मानवाने अरण्ये तोडली आणि आता घर, कारखाने, खानी,धरने अशा गरजा भागवन्यासाठी उत्तम प्रतिची शेतदमिनही वापरली जात आहे. 

खते व कीटकन

ाशके व पाऩी यांचा जमिनीतलअतिवापरामुळे ती जमिन क्षारपज जमिन होत चालली आहे. 

            भूप्रदुषनाची प्रमुख कारने जमिनीचा गैरवापर, अयोग्य हाताळनी आणि बेफिकीरी ही असली तरी इतर ही कारनांनी भुप्रदुषन होते.जसे घरगुती व सार्वजनिक कचरा ,सांजपानी,औद्योगिक कचरा, वापरवेली टाकाऊ रसायने, कृषी कचरा खते , कुटकनाशके जमिनीवर फेकली जातात. जमिनीवर कचर्यांचा ढीग वाढत दातो. त्यामुळे दमिनीची गुणवता खालावत जाउन ती नापीक होते.

*

*- भूप्रदुषनावरील उपाय –

१) सेंद्रियव जैविक खतांचा वापर करने. कीटकनाशके व तननाशकांचा अनावश्यक वापर टाळने. 

२) जमिनीला बाध घालने. 

३) बाजूने चर खनने. त्यामुळे पिकांना दिलेले पाणी जादा झाल्यास ते जमिनीतुन बाहेर पडू शकत्य त्यामुळे जमिन पीनथळ होत नाही.

४) जमिनीवर विविध जातींची झाडे लावावीत. एकाच जातीच्या झाडांमुळे जमिनीचा कस कमि होत जातो.

५) सेंद्रिय व ओल्याकचर्यापासुन खत तयार करावे.

६) वृक्षापोपन कार्यक्रम अधिक वेगाने करने.

७) प्लास्टीकचा कचरा जमिनीवर टाकू नये. त्याचे कधिही विघटन होत नसल्याने तो तसाच जमिनीत कायमचा राहते.

ध्वनी प्रदूषन – प्रदूषण प्रकार नुकसान उपाय

१) *नैसर्गीक* — यात वादळ, पाऊस, विजांचा कडकडाट, भूकंप इत्यादीलआवाज येतात

३) *मानवनिर्मीत*—- यात स्वयंचलुत वाहनांचे आवाज, त्यांचे कर्कश भोंगे , कारखान्यातील यंत्रामचा खडखडाट, घरगुती उपकरनांचे आवाज, रेडिओ, टीव्ही यामचा उच्च आवाज,मिरवनुका, अशा अनेक प्रकारच्या तिव्र आवाजामुळेलध्वनिप्रदूषन होत असते.

*- ध्वनी प्रदूषन उपाय –

१) सर्व स्वयंचलित वाहनांचे हॉर्न्स विशिष्ट पातळिच्या तिव्रतेचेच ठेवन्याचे बंधन उक्पादकांपासुनच घातले गेले पाहिजे. अशा नियमामची कडक अमलबजावनी झाली पाहिजे.

२) सर्व वाहनांची देखभाल नियमित पने होने आवश्यक आहे.

३) आवाज उपकरनाच्या निर्मीतीच्या  वेळीच त्यावर नियंत्रन आवश्यक आह्.

४) सार्वजनिक ठिकानी ध्वनीक्षेपकावरील आवाजावर असलेले विशिष्ट बंधन काटेकोरपने पाळने गरजेचे आहे.

५) विशिष्ट जागा, इमारती, परिसर आवजरहीत विभाग म्हनुन निर्मान करुन अमलबजावनी आवशियक आहे.

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      About Prithviraj Gaikwad

      Check Also

      Science Notes PDF Download

      Science Notes PDF Download

      Sci notes mar

      Sci notes mar फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा …

      सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 1

      सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 1 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे इतिहास,भूगोल मधील प्रश्न यात घेतले आहेत …

      Contact Us / Leave a Reply