राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाची
पुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी ८७व्या वर्षात प्रदार्पण करीत आहे
आयोजक – राष्ट्रीय साततोटी मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे,
निमंत्रक – सर्व कार्यकारणी मंडळ व सभासद
आपल्याला माहीतच आहे….मंडळ म्हंटले की …ते चालवणं आलच… मग ते पारंपरिक कार्यक्रम असो किंवा सामाजिक कार्य. आपल्या राष्ट्रीय साततोटी हौद मंडळातर्फे असेच विविध प्रकारचे कार्य वेळोवेळी पार पाडले जातात.हे कार्य असेच निरंतर चालू रहाण्यासाठी आणि सतत नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येण्यासाठी आपले मंडळ सदैव उभे रहावे हीच… इच्छा…. याचसाठी…
The Rashtriya Sattoti Houd Mandal Trust Kasba Peth Pune is a Hindu Temple located in Pune and is dedicated to the Hindu god Ganesh. The temple is visited by over a hundred thousand pilgrims every year.
कसबा पेठ पुणे
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
एकेकाळी पुणे शहर पूर्वी कसबा पेठेपुरते मर्यादित होते. त्यावेळी ते कसबे पुणे या नावाने ओळखले जाई. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्याचा विस्तार झाला. आदिलशाही मध्ये कसबे पुणे हे दुर्लक्षित गाव होते. सर्वत्र रोगराई आणि घाण पसरलेली होती. आदिलशहाने शिवाजीचे वडील शहाजी भोसले यांना पुणे मुलुखाची जहागिरी दिली.१६४२ला आई जिजाबाई या बाल शिवाजीस घेऊन पुण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी पुण्याची झालेली दुरवस्था पाहून कसबे पुण्याचे रूप पालटवून टाकण्याचे ठरविले. या कार्यावर लोकांचा विश्वास बसावा आणि या कामासाठी त्यांचे सहकार्य मिळावे यासाठी शिवाजी महाराजांकरवी जिजाबाईने कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून कसबे पुणे पुन्हा भरभराटीला आणले. शिवाजीचे महाराजांचे बालपण त्यांची आई जिजाबाई यांच्या समवेत कसबे पुण्यातील लाल महाल येथे गेले. कसबा पेठेचे रूप पालटण्यास दादोजी कोडदेव यांचा सक्रिय सहभाग होता.
कसबा पेठेतील उल्लेखनीय स्थळे
- साततोटी हौद
- कसबा गणपती मंदिर : हे पुण्याचे ग्रामदैवत आहे.
- कुंभारवाडा
- गावकोस मारुती मंदिर
- झांबरे चावडी
- तांबट आळी
- त्वष्टा कासार देवी मंदिर : ही देवी कासार समाजाची कुलदेवी समजली जाते..
- त्र्यंबकेश्वर मंदिर
- पुण्येश्वर मारुती मंदिर
- शिंपी आळी
- शेख सल्ला याचा दरगा