राज्यात लवकरच १७०० तलाठ्यांची भरती होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली असून, या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठ्यांची ही पदे भरली जाणार आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून तलाठ्यांची १७०० पदे रिक्त होती. ही पदे भरण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना दिलासा मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मते, डिसेंबर अखेरपर्यंत या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती समोर येऊ शकते. सध्या राज्यात एकूण ४६४४ तलाठी पदे रिक्त असून त्यापैकी १७०० ही नवी पदे आहेत.
२०२३ सालच्या तलाठी भरती प्रक्रियेत काही गैरप्रकार झाले होते. तसेच, नियुक्तीवेळी पेसा क्षेत्रातील पदांवरूनही समस्या निर्माण झाली होती. यावर न्यायालयीन निर्णय प्रलंबित आहे. मात्र, शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना ११ महिन्यांसाठी नियुक्तीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
Talathi Bharti 2026:महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
महसूल सेवकांची एक प्रमुख मागणी होती की त्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करून मानधनाऐवजी वेतनश्रेणी मिळावी. या मागणीवर महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घेतली. वेतनश्रेणी लागू करणे शक्य नसल्याने, त्यांना तलाठी भरतीत काही जागा राखीव ठेवण्याचा आणि अनुभवानुसार अधिक गुण देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यावर सकारात्मक चर्चा झाली असून, महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासन महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहे.
या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश मिना, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव ओमप्रकाश गुप्ता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महसूल मंत्र्यांनी महसूल सेवकांचे उपोषण सोडवताना त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा झाली. महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, पर्यायी व्यवस्था म्हणून तलाठी भरतीत त्यांना काही जागा राखीव ठेवण्यावर भर देण्यात आला.
📌 उमेदवारांच्या सरावासाठी मागील वर्षांचे तलाठी भरतीचे प्रश्नपत्रिका खाली देण्यात आल्या आहेत. या प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यास परीक्षेची तयारी अधिक प्रभावी होण्यास मदत होईल.
Talathi Bharti 2026:
- पदाचे नाव –तलाठी
- पद संख्या – ४६४४ जागा
- शैक्षणिक पात्रता –पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
- परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (लिंक लवकरच सुरु होईल)
Talathi Bharti 2026:
| पदाचे नाव | पद संख्या |
| तलाठी | ४,६४४ पदे |
मागील वर्षांचे तलाठी भरतीचे प्रश्नपत्रिका डाउनलोड
| Download Question Paper | Shift | Question Paper PDF |
| Talathi Bharti Question Paper 2023 Out | 9-11 | Download |
| Talathi Bharti Question Paper 2023 Out | 12:30-2:30 | Download |
| Talathi Bharti Question Paper 2023 PDF | 26 Aug 1st Shift Talathi | Download |
| Talathi Bharti Question Paper 2023 Out | 19 Aug 3rd Shift talathi response sheet | Download |
| Talathi Bharti Question Paper 2023 Out | 10 sept 3rd Shift Talathi response sheet | Download |
| Talathi Bharti Question Paper 2023 Out | _5 Sept 2nd Shift Talathi response sheet | Download |
Talathi Bharti 2026:
Talathi Bharti 2026: महाराष्ट्रात तलाठी भरतीसाठी उपलब्ध जिल्हानुसार एकूण ४६४४ रिक्त पदांची माहिती समोर आली आहे, ज्यातून प्रत्येक जिल्ह्यातील उपलब्ध जागांचे स्पष्ट चित्र दिसते. यापैकी १७०० पदे ही नवीन वाढवलेली आहेत, ज्यामुळे या भरतीची व्याप्ती आणखी वाढली आहे. जिल्हानुसार जागांची संख्या निश्चित झाल्यामुळे उमेदवारांना आपल्या पसंतीच्या जिल्ह्यानुसार तयारी करण्यास आणि अर्ज प्रक्रियेची दिशा ठरवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा पॅटर्न याबाबतची अंतिम माहिती जाहीर केली जाईल.
महत्वाच्या लिंक्स:
- Job Today Official Website – Click here
Serch Your Dream Jobs


