प्रकाशाच्या वेगाबाबत आइनस्टाइनला आव्हान

प्रकाशाच्या वेगाबाबत आइनस्टाइनला आव्हान

प्रकाशाच्या वेगाबाबत आइनस्टाइनला आव्हान Testing the speed of light

प्रख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याच्या भौतिकशास्त्रातील सिद्धान्ताला आव्हान देणाऱ्या सिद्धान्ताचा पडताळा लवकरच घेतला जाणार आहे, त्यामुळे दुसरा सिद्धान्त खरा ठरला, तर आपले विश्वाचे ज्ञान बदलून जाईल. प्रकाशाचा वेग स्थिर असतो या आइनस्टाइनच्या म्हणण्याविरोधात हा वेग बदलत असतो, असे प्रतिपादन नवीन सिद्धान्तात केले आहे.

आइनस्टाइनने असे म्हटले होते, की कुठल्याही परिस्थितीत प्रकाशाचा वेग हा सारखाच असतो व अवकाश तसेच काळ हे वेगवेगळय़ा परिस्थितीत वेगवेगळे असतात. प्रकाशाचा वेग हा स्थिर असतो, या प्रतिपादनामुळे महाविस्फोटात विश्वाच्या निर्मितीनंतरच्या बालविश्वाबाबतच्या आपल्या संकल्पना त्यावर आधारित आहेत. काही वैज्ञानिकांच्या मते पूर्वीच्या विश्वात प्रकाशाचा वेग खूप जास्त होता. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजचे जोआओ माग्वेजो यांनी कॅनडातील पेरीमीटर इन्स्टिटय़ूटचे नियायेश अफशोरदी यांच्यासमवेत असा सिद्धान्त मांडला आहे, की त्यात प्रकाशाचा वेग स्थिर नसतो हे भाकीत तपासता येऊ शकेल.

विश्वातील दीर्घिका या स्पंदनांमुळे तयार झाल्या आहेत, कारण त्या वेळी काही भागांतील घनता वेगवेगळी होती. वैश्विक मायक्रोवेव्ह नकाशात या स्पंदनांची नोंद आहे व तो विश्वातील जुना प्रकाश स्पेक्ट्रल इंडेक्स मानला जातो. या स्पंदनांवर प्रकाशाच्या वेगातील बदलांचा परिणाम झाला आहे, असे नवे प्रारूप मांडण्यात आले असून, त्यात स्पेक्ट्रल इंडेक्सचा नेमका आकडा शोधण्याचा प्रयत्न आहे. हा आकडा अचूक काढण्यासाठी विश्वरचना शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. हा आकडा ०.९६४७८ असल्याचे सांगितले जाते.

सिद्धान्ताची पडताळणी लवकरच होणार

१९९० मध्ये हा सिद्धान्त मांडला होता. आता तो परिपक्व अवस्थेत आहे व त्यातील भाकिते तपासली जाऊ शकतात असे माग्वेजियो यांचे म्हणणे आहे. यातील आकडा अचूक निघाला तर आइनस्टाइनच्या गुरुत्व सिद्धान्तात बदल करावे लागतील. प्रकाशाचा वेग बदलतो ही कल्पना प्रथम अचूक वाटत नव्हती, पण आता आकडा हाती असल्याने या मुद्दय़ावरील सिद्धान्ताची पडताळणी शक्य आहे. जर्नल फिजिकल रिव्हय़ूमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

                            
४) सामान्य ज्ञान – तात्याचा ठोकळा/नोबेल ठोकळा

१) अंकगणित – नितीन महाले/सतीश वसे          

२) बुद्धिमत्ता चाचणी – पंढरीनाथ राणे/सतीश वसे

३) मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे

४) आधु. भा. इतिहास – ग्रोव्हर & बेल्हेकर/समाधान महाजन  

२) महाराष्ट्राचा भूगोल – ए. बी. सवदी 

३) भा. राज्यघटना – रंजन कोळंबे 

१) विज्ञान व तंत्रज्ञान – अनिल कोलते/रंजन कोळंबे/ज्ञानदीप प्रकाशन

५) भा. अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे     

६) अंकगणित – नितीन महाले/सतीश वसे   

७) बुद्धिमत्ता – पंढरीनाथ राणे/सतीश वसे  

८) चालू घडामोडी – पृथ्वी परिक्रमा/युनिक बुलेटिन 

All Exam Booklist Download

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

About Prithviraj Gaikwad

Check Also

संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name

संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram …

Science Notes PDF Download

Science Notes PDF Download

Physics Science India Notes PDF Download

Physics Science India Notes PDF Download

Contact Us / Leave a Reply