MH TET Exam Pattern 2021-22 : Teacher Eligibility Test (TET) Examination Fees is available here. Basically TET Exam will held by State Government and Central Government as well. In this page we will tried to listing all State TET and CTET Exam 2021 Syllabus. TET परीक्षा अभ्यासक्रम २०२१-२२: शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे. मुळात टीईटी परीक्षा राज्य सरकार आणि केंद्र सरकार देखील घेईल. या पृष्ठामध्ये आम्ही सर्व राज्य टीईटी आणि सीटीईटी परीक्षा 2021 अभ्यासक्रमाची यादी करण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका आराखडा व स्वरूप.
MH TET Exam Pattern 2021-22
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.
- प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
- उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
- प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील
पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)
एकूण गुण १५०
कालावधी-२ तास ३० मिनिटे
अ.क्र. | विषय (सर्व विषय अनिवार्य) | गुण | प्रश्न संख्या | प्रश्न स्वरुप |
---|---|---|---|---|
1 | बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र | ३० | ३० | बहुपर्यायी |
2 | भाषा-१ | ३० | ३० | बहुपर्यायी |
3 | भाषा-२ | ३० | ३० | बहुपर्यायी |
4 | गणित | ३० | ३० | बहुपर्यायी |
5 | परिसर अभ्यास | ३० | ३० | बहुपर्यायी |
एकूण | १५० | १५० |
पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी)
पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)
एकूण गुण १५०
कालावधी-२ तास ३० मिनिटे
पेपर II मधील अ.क्र १ ते ३ विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय ४ मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय ४ मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र ४ मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.