मंगळावरील हायड्रोजन नष्ट होण्याचा वेग अधिक

मंगळावरील हायड्रोजन नष्ट होण्याचा वेग अधिक The rate of hydrogen depletion on Mars is higher

मंगळावरील हायड्रोजन नष्ट होण्याचा वेग अधिक

अमेरिकेतील नासा या अवकाश संशोधन संस्थेने मंगळाच्या वातावरणाचा ‘मावेन’ यानाच्या मदतीने अभ्यास केला असून.

त्यात पाणी व हायड्रोजन तेथील वातावरणातून हळूहळू नष्ट होण्याऐवजी कमी-अधिक वेगाने नष्ट होत असल्याचे म्हटले आहे.

हायड्रोजन ज्या वेगाने नष्ट होतो त्यावर मंगळावरील पाणी नष्ट होण्याचा वेग अवलंबून असतो. मंगळ पृथ्वीजवळ असतो तेव्हा पाणी मोठय़ा प्रमाणावर नष्ट होते.

‘मावेन’ यानावरील उपकरणाच्या मदतीने वैज्ञानिकांनी पाणी व हायड्रोजन नष्ट होण्याचा वेग नेहमी बदलत असल्याचे म्हटले आहे.

मंगळाच्या वरील भागातील वातावरणीय थरातून हायड्रोजन नष्ट होण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले.

त्यामुळे मंगळावरील पाणी अब्जावधी वर्षांत कसे नष्ट झाले असावे, यावरही प्रकाश पडणार आहे.

असे ‘मावेन’च्या माहिती विश्लेषण पथकातील वैज्ञानिक व बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक आली रहमती यांनी सांगितले.

मंगळाच्या वातावरणाच्या खालच्या थरातील पाणी हा वरच्या थरातील हायड्रोजनचा महत्त्वाचा स्रोत असतो.

सूर्यप्रकाशात पाण्याच्या रेणूचे विघटन होऊन हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू वेगळे होऊन हायड्रोजन वातावरणाच्या वरच्या

थरात जातो. हायड्रोजन व पाणी हे घटक हळूहळू समान वेगाने मंगळावरून नष्ट होतात, असा आधीचा अंदाज होता.

आंतरराष्ट्रीय संशोधनात सहभाग

युरोपीय अवकाश संस्थेने (इएसए) मंगळावर ‘एक्सो मार्स २०१६’ यान यावर्षी फेब्रुवारीत पाठवले.

त्यातील शिपारेली मंगळयान कु पी १९ ऑक्टोबरला मंगळाच्या वातावरणात सोडली गेली.

म्हणजे तिचे तेथे अवतरण करण्यात आले. मंगळावर असे यान उतरवताना त्याचा वेग खूप कमी करावा लागतो.

त्याप्रमाणे तो तासाला २० हजार मैलांवरून सेकंदाला काही मीटर करण्यात आला.

त्यासाठी काही लहान अग्निबाण प्रज्वलित करण्यात आले. या यानाचे रेडिओ संदेश पुणे जिल्ह्य़ात नारायणगाव येथील खोडदच्या जीएमआरटी रेडिओ दुर्बिणीने टिपले.

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      इतर महत्वाच्या लिंक्स

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      About Prithviraj Gaikwad

      Check Also

      पर्यावरणशास्त्र नोट्स डाउनलोड करा

      पर्यावरणशास्त्र नोट्स डाउनलोड करा ह्या नोट्स MPSC व UPSC तसेच पशुसवर्धन व वनसेवा परीक्षेकरिता उपयुकत …

      Environment Science Notes PDF Download

      Environment Science Notes PDF Download Environment Science Notes PDF Download

      हवामान बदल रोखण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल

      हवामान बदल रोखण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल हवामान बदल रोखण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल एअर-कंडिशनिंग …

      Contact Us / Leave a Reply