पहिली पंचवार्षिक योजना
पहिली पंचवार्षिक योजना
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
पहिल्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्ट्ये –
कालावधी – १ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६. पंडित नेहरूंनी पहिली योजना मांडली.
अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू
उपाध्यक्ष – गुलझारीलाल नंदा
प्रतिमान – हेराल्ड डोमर यांचे जास्त गुंतवणुकीचे प्रतिमान
मुख्य भर – कृषी क्षेत्र
उद्दिष्टे – दुसरे महायुद्ध व देशाची फाळणी यातून सावरणे, भाववाढ नियंत्रित करणे, सामाजिक न्यायासाठी प्रयत्न करणे.
दुसरे नाव – पुनरुत्थान योजना
प्रकल्प –
- दामोदर खोरे विकास योजना (झारखंड – पश्चिम बंगाल )
- भाक्रा- नानगल प्रकल्प (सतलज नदी, हिमाचल प्रदेश – पंजाब)
- कोसी प्रकल्प (कोसी नदी, बिहार)
- हिराकुड योजना (महानदी, ओडिशा)
- हे चारही प्रकल्प अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पावर आधारित, बहुउद्देशीय प्रकल्प होते.
कारखाने –
- खत कारखाना – सिंद्री, झारखंड
- रेल्वे इंजीन कारखाना (चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स) – चित्तरंजन, पश्चिम बंगाल
- रेल्वे डब्यांचा कारखाना (पेराम्बुर लोको वर्क्स) – पेराम्बुर ,तामिळनाडू
- हिंदुस्तान antibiotics – पिंपरी, महाराष्ट्र (WHO आणि UNICEF च्या मदतीने)
विशेष घटनाक्रम –
- सप्टेंबर १९५१ – पहिल्या IIT ला मान्यता देण्यात आली (खरगपूर, पश्चिम बंगाल).
- ८ मे , १९५२ – औद्योगिक विकास व नियमन अधिनियम, १९५१ लागू
- २ ऑक्टोबर १९५२ – समुदाय विकास कार्यक्रम सुरु
- १९५२ – भारतीय हातमाग बोर्ड स्थापन
- १९५३ – समुदाय विकास कार्यक्रमाच्या चांगल्या अंमलबजावणीच्या उद्देशाने राष्ट्रीय विकास योजना (NES) सुरु .
- १९५३ – अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड स्थापन
- २८ डिसेंबर १९५३ – १९४५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या University Grants Committee चे University Grants Commission मध्ये रुपांतर करण्यात आले. पुढे १९५६ मध्ये UGC ला वैधानिक दर्जा मिळाला.
- १ जुलै १९५५ – Imperial Bank चे रुपांतर SBI मध्ये केले
- ५ जानेवारी, १९५५ – भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (ICICI) स्थापन
योजना यशस्वी होण्याची कारणे –
- योजना कालावधीत मान्सून अनुकूल होता
- योजनेची लक्ष्ये कमी होती
आर्थिक वाढीचा दर –
- संकल्पित दर – २.१ %
- साध्य दर – ३.६ %
- योजना कालावधीत राष्ट्रीय उत्पन्न १८ % , दादोई उत्पन्न ११ % नी वाढले
- किंमतीचा निर्देशांक १३ % नी कमी झाला – आजपर्यंतची एकमेव योजना ज्यात किंमतीचा निर्देशांक कमी झाला.
- अधिक अन्नधान्य उत्पादन व संथ औद्योगिक वाढ साधली गेली.
योजना कालावधीतील राजकीय घडामोडी –
- १९५१-५२ मध्ये स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुका पार पडल्या . सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त होते. कॉंग्रेस ला बहुमत मिळून पं. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले.
- १ ऑक्टोबर १९५३ ला आंध्र प्रदेश या पहिल्या भाषिक तत्वावर आधारित राज्याची निर्मिती झाली.
- १९५३ मध्ये फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला गेला. पं. हृदयनाथ कुंझरू व के. एम. पण्णीकर हे सदस्य होते. ३० सप्टेंबर १९५० ला अहवाल सादर झाला.
- अमेरिका Public Law – 480 कायद्यांतर्गत इतर देशांना धान्य पुरवठा करते. १९५६ मध्ये भारताने हा करार केला व गहू आयात केला. या गव्हात गजर गवताचे बी आल्याने भारतभर त्याचा प्रसार झाला.
दुसरी पंचवार्षिक योजना वाचा.
अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा
- अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेचे प्रकार
- दारिद्र्य : संकल्पना व मोजमाप
- जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक
- बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार
- भारतातील दारिद्रयाची करणे
- रघुराम राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागार
- भारतीय अर्थव्यवस्था विमुद्रीकरण प्रभाव माहिती
- भारतीय अर्थव्यवस्था नोट्स PDF डाउनलोड करा
- Million Well Scheme दशलक्षी विहीर योजना (MWS)
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now