बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार

बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार

बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार

बेरोजगार म्हणजे ज्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा आहे परंतु काम मिळत नाही.

बेरोजगारीचे प्रकार

अ. शहरी बेरोजगारी

१. संरचनात्मक बेरोजगारी – ही बेरोजगारी ‘मजुरांची मागणी कमी व पुरवठा जास्त’ या अवस्थेमुळे उद्भवते. औद्योगिक विकासदर कमी असल्याने पुरेसा रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही .

२. शैक्षणिक / सुशिक्षित बेरोजगारी – शिक्षण घेऊनही काम न मिळणे म्हणजे शैक्षणिक बेरोजगारी होय. याचे मूळ कारण संथ आर्थिक विकास हे आहे. तसेच, सदोष शिक्षण व्यवस्था, तांत्रिक शिक्षणाचा अभाव, योग्य शिक्षण पातळीचा अभाव, शिक्षित लोकांच्या मागणी व पुरवठ्यातील मोठी तफावत ही इतर कारणे आहेत.

३. कमी प्रतीची / न्यून बेरोजगारी – इच्छित कार्याक्षामातेपेक्षा कमी प्रतीचे काम करावे लागणे म्हणजेच न्यून बेरोजगारी होय .

४. घर्षनात्मक बेरोजगारी – जेव्हा कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्यास घर्षनात्मक बेरोजगारी म्हणतात. यास यांत्रीकुत बेरोजगारी असेही म्हणतात कारण ती तंत्रज्ञान बदलामुळे घडून येते .

५. चक्रीय बेरोजगारी – विकसित भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत ही बेरोजगारी दिसून येते .

६. प्रासंगिक बेरोजगारी – करारावर काम करणाऱ्या कामगारांना करार संपल्यानंतर पुढील काम मिळेपर्यंत या बेरोजगारीला सामोरे जावे लागते .

ब. ग्रामीण बेरोजगारी

१. हंगामी बेरोजगारी – ही बेरोजगारी मुख्यता शेती क्षेत्रात दिसून येते. तसेच ही बेरोजगारी पर्यटन क्षेत्र, आईस्क्रीमचे कारखाने, इत्यादी ठिकाणीही निर्माण होते .

२. प्रच्छन्न / अदृश्य बेरोजगारी – आवश्यकतेपेक्षा जास्त लोकं एकाच कामात गुंतलेले असल्यास त्या जास्तीच्या व्यक्तींना अदृश्यपणे किंवा प्रच्छन्नपणे बेरोजगार असे म्हटले जाते . हा प्रकार मुख्यत्वे शेती क्षेत्रात दिसून येतो . या बेरोजगार व्यक्तींची सीमांत उत्पादकता शून्य असते.

बेरोजगारी कमी करण्याचे उपाय –

  • तुटीचा अर्थसंकल्प मांडून जास्तीचा खर्च योजनांवर करणे
  • वर्षभर काम मिळेल अश्या विकास योजना व रोजगार कार्यक्रम आखणे व राबवणे
  • बँकांकडून रोजगारासाठी अग्रक्रम क्षेत्रास कर्ज पुरवठा करून देणे
  • ‘चालणाऱ्या महागाईकडे ‘ झुकणाऱ्या चलनविषयक धोरणांची आखणी करणे
  • तांत्रिक शिक्षणास प्रोत्साहन देणे .

अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit NowWhatsAppTelegramFacebookTwitter

About Prithviraj Gaikwad

Check Also

पर्यावरणशास्त्र नोट्स डाउनलोड करा

पर्यावरणशास्त्र नोट्स डाउनलोड करा ह्या नोट्स MPSC व UPSC तसेच पशुसवर्धन व वनसेवा परीक्षेकरिता उपयुकत …

पहिली पंचवार्षिक योजना

पहिली पंचवार्षिक योजना फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा …

संगणक नोट्स डाउनलोड करा

संगणक नोट्स डाउनलोड करा Computer Notes PDF Download संगणक नोट्स डाउनलोड करा

One comment

  1. Pingback: पहिली पंचवार्षिक योजना »

Contact Us / Leave a Reply