योजना अवकाश / योजनेला सुट्टी / Plan Holiday
योजना अवकाश / योजनेला सुट्टी / Plan Holiday
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
कालावधी – १ एप्रिल १९६६ ते ३१ मार्च १९६९
अध्यक्ष – इंदिरा गांधी
उपाध्यक्ष – अशोक मेहता
दुसरे नाव – स्वावलंबन योजना
या काळात तीन वार्षिक योजना राबवल्या गेल्या.
पहिली वार्षिक योजना –
- कालावधी – १ एप्रिल १९६६ ते ३१ मार्च १९६७
- अजून एका दुष्काळाला या काळात सामोरे जावे लागले.
- १९६६ च्या खरीफ हंगामात हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेला. प्रख्यात शास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांनी हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली.
- उच्चतम उत्पादनाचे वाण कार्यक्रम (High Yielding Variety Program-HYVP) हा कार्यक्रम तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका यांचे उच्चतम उत्पादनाचे वाण तयार करून अधिकाधिक क्षेत्रावर लागवड करण्याच्या उद्देशाने सुरु केला.
- ६ जून १९६६ ला ३६.५ % ने रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले.
- १ नोव्हेंबर १९६६ रोजी पंजाब या द्विभाषिक प्रांतातून पंजाब व हरियाना या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.
दुसरी वार्षिक योजना –
- कालावधी – १ एप्रिल १९६७ ते ३१ मार्च १९६८
- मागील वर्षीच्या हरितक्रांती तंत्रज्ञान व पुरेशा पावसामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली.
- या कालावधीत अन्नधान्याचे उच्चांकी उत्पादन झाले. ७४.२ दशलक्ष टनावरून (१९६६-67) उत्पादन ९५ दशलक्ष टनापर्यंत वाढले.
- महागाईचा निर्देशांक १50 वरून १६7.3 पर्यंत वाढला. (आधारभूत वर्ष १९६१-62)
तिसरी वार्षिक योजना –
- कालावधी – १ एप्रिल १९६८ ते ३१ मार्च १९६९
- अन्नधान्य उत्पादन व किंमती स्थिरावल्या.
- परकीय व्यापारातील व्यवहारतोलाची परिस्थिती सुधारली.
- किमतीचा निर्देशांक १६७.३ वरून १६५.४ इतका घसरला. (आधारभूत वर्ष १९६१-62)
या काळातील आर्थिक वाढीचा दर –
- १९६६-67 ते १९६८-६९ या कालावधीत किमतीचा निर्देशांक १५० वरून १६५.४ इतका वाढला.
- पूर्ण कालावधीत ३.९ % वृद्धीदर साधला गेला.
- एकूण अर्थव्यवस्थेला स्थैर्य लाभून नियमित चौथी पंचवार्षिक योजना सुरु करण्यास योग्य स्थिती तयार झाली.
- एकूण अन्नधान्य उत्पादन ७४.२ दशलक्ष टनावरून ९४ दशलक्ष टनापर्यंत वाढले.
चौथी पंचवार्षिक योजना वाचा.
अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा
- तिसरी पंचवार्षिक योजना
- भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप
- दुसरी पंचवार्षिक योजना
- राष्ट्रीय उत्पन्न
- पहिली पंचवार्षिक योजना
- अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेचे प्रकार
- दारिद्र्य : संकल्पना व मोजमाप
- जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक
- बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार
- भारतातील दारिद्रयाची करणे
- रघुराम राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागार
- भारतीय अर्थव्यवस्था विमुद्रीकरण प्रभाव माहिती
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now