11 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download

11 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 11 August 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी

11 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.


येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 11 ऑगस्ट 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

11 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी
11 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी

राष्ट्रीय बातम्या(Current Affairs in Marathi)

 1. देशातील पहिले इंटरनेट गव्हर्नन्स फोरम

  • या वर्षी 20 ऑक्टोबरपासून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार देशातील पहिले इंटरनेट गव्हर्नन्स फोरम आयोजित करणार आहे.
  • या वर्षीच्या बैठकीची संकल्पना डिजिटल इंडियासाठी सर्वसमावेशक इंटरनेट ही आहे. या घोषणेसह, इंटरनेट गव्हर्नन्स फोरम नावाच्या संयुक्त राष्ट्र-आधारित फोरमचा भारतीय अध्याय सुरू झाला आहे.
  • नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (एनआयएक्सआय), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय) आणि समन्वय समिती अध्यक्ष. इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2021 (आयजीएफ) यांनी इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (आयआयजीएफ) -2021 सुरू करण्याची घोषणा केली.

 2. युनिसेफ इंडिया, फेसबुक मुलांसाठी सुरक्षित ऑनलाइन जग निर्माण करणार

  • युनिसेफ इंडिया आणि फेसबुकने ऑनलाईन सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करत मुलांवरील हिंसाचार नष्ट करण्यासाठी एक वर्षाचा संयुक्त उपक्रम सुरू केला आहे.
  • हा प्रकल्प मुलांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
  • मुलांची लवचिकता आणि त्यांची डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरण्याची क्षमता सुधारणे, मुलांविरूद्ध हिंसा आणि त्याचा मुलांवर, कुटुंबांवर आणि समुदायावर होणाऱ्या परिणामांविषयी जागृती निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
  • या भागीदारीमध्ये देशभरातील सोशल मीडिया मोहीम आणि 100,000 शालेय मुलांसाठी ऑनलाइन सुरक्षा, डिजिटल साक्षरता आणि मानसशास्त्रीय समर्थनासाठी क्षमता वाढवणे समाविष्ट आहे.
  • सुप्रसिद्ध अभिनेते आणि युनिसेफ इंडियाचे लहान मुलांवरील हिंसाचार नष्ट करण्याच्या चळवळीचे सदिछादूत आयुष्मान खुराना यांनी आभासी कार्यक्रमादरम्यान या प्रकल्पासाठी आपला मुख्य संदेश दिला.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • युनिसेफ मुख्यालय: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
  • युनिसेफचे कार्यकारी संचालक: हेन्रीएटा एच. फोर
  • युनिसेफची स्थापना: 11 डिसेंबर 1946
  • फेसबुकची स्थापना: फेब्रुवारी 2004
  • फेसबुक सीईओ: मार्क झुकरबर्ग
  • फेसबुक मुख्यालय: कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स

11 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी

 3. पंतप्रधान मोदींनी पाम तेल उपक्रमाची घोषणा केली

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाम तेलासह स्वयंपाकाच्या तेलांमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी 11,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-ऑईल पाम (एनएमईओ-ओपी) ची घोषणा केली आहे.
  • या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व सुविधा सरकार तर्फे  देण्यात येणार आहेत.
  • आयात कमी करण्याच्या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून भारतात तेलबिया आणि पाम तेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार तेलबिया आणि तेल पाम राष्ट्रीय मिशन राबवत आहे.

 4. 5.82 कोटींहून अधिक जन धन खाती निष्क्रिय

  • अर्थ मंत्रालयाने राज्यसभेला सूचित केले आहे की 5.82 कोटींहून अधिक किंवा एकूण खात्यांच्या 14 टक्के जन धन (पीएमजेडीवाय) खाती निष्क्रिय आहेत. याचा अर्थ 10 जन धन खात्यांपैकी किमान एक खाते निष्क्रिय आहे.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दोन वर्षांच्या कालावधीसाठी खात्यात कोणतेही व्यवहार नसल्यास बचत, तसेच चालू खाते, निष्क्रिय मानले जाईल.
  • योजनेच्या च्या संकेतस्थळानुसार, जन धन खात्यांची एकूण संख्या 42.83 कोटी आहे आणि त्यात जवळपास 1.43 लाख कोटी रुपये जमा आहेत.
  • खात्याची निष्क्रियता ठरविण्यासाठी ग्राहकांच्या तसेच तृतीय पक्षाच्या माध्यमातून झालेले दोन्ही प्रकारचे व्यवहार अर्थात डेबिट तसेच क्रेडिट विचारात घेतले जातात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • भारताच्या अर्थमंत्री: निर्मला सीतारमण

राज्य बातम्या (Daily Current Affairs in Marathi)

 5. महाराष्ट्राने आयटी क्षेत्रासाठी राजीव गांधी पुरस्कार जाहीर केला

  • महाराष्ट्र सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे नवीन पुरस्कार जाहीर केला आहे.
  • राजीव गांधी पुरस्कार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थांना दिला जाईल.
  • अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे केल्याचे जाहीर केले होते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • महाराष्ट्राचे राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी
  • महाराष्ट्राची राजधानी: मुंबई
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री: उद्धव ठाकरे

आंतरराष्ट्रीय बातम्या (Current Affairs for MPSC)

 6. दक्षिण आफ्रिकेने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला पेटंट दिले

  • दक्षिण आफ्रिककेने डीएबीयुएस नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीला “फ्रॅक्टल भूमितीवर आधारित फूड कंटेनर” शी संबंधित पेटंट दिले.
  • डीएबीयुएस (ज्याचा अर्थ “एकात्मिक भावनांच्या स्वायत्त बूटस्ट्रॅपिंगसाठी साधन अथवा डिव्हाईस फॉर द ऑटोनोमस बूटस्ट्रॅपिंग ऑफ युनिफाईड सेंटियन्स असा आहे) एआय आणि प्रोग्रामिंग क्षेत्रातील अग्रणी स्टीफन थेलर यांनी ही एआय प्रणाली तयार केलेली आहे.
  • डीएबीयुएस ला शोधक म्हणून सूचीबद्ध करणारा पेटंट अर्ज अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासह जगभरातील पेटंट कार्यालयांमध्ये दाखल करण्यात आला होता मात्र फक्त दक्षिण आफ्रिकेने पेटंट दिले आहे.

अर्थव्यवस्था बातम्या (Current Affairs
for MPSC)

 7. एटीएममधील रोकड संपली असल्यास बँकांना दंड

  • भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ‘एटीएम मध्ये रोकड नसल्यास दंड योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यानुसार ती एटीएम/डब्ल्यूएलएजवर रोख दंड आकारणार आहे.
  • एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे जनतेला होणाऱ्या गैरसोयीबद्दल उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेने अशा मशीनमध्ये चलनी नोटा वेळेवर भरण्यास अपयशी ठरल्याबद्दल बँकांना दंड करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • ही योजना 01 ऑक्टोबर 2021 पासून लागू होईल. एका महिन्यात दहा तासांपेक्षा जास्त एटीएममध्ये कॅश-आउट (रोकडविरहित) झाल्यास प्रत्येक एटीएमवर ₹ 10,000/- चा दंड आकारला जाईल.
  • व्हाईट लेबल एटीएम (डब्ल्यूएलए) च्या बाबतीत, दंड त्या बँकेला आकारला जाईल जो त्या विशिष्ट डब्ल्यूएलएची रोख आवश्यकता पूर्ण करत आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • आरबीआयचे 25 वे गव्हर्नर: शक्तिकांत दास
  • मुख्यालय: मुंबई
  • स्थापना: 1 एप्रिल 1935, कोलकाता

11 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी

 8. आरबीआयने बचत गटांना तारण-मुक्त कर्जाची मर्यादा वाढविली

  • भारतीय रिझर्व्ह बँकेने डीएवाय-एनआरएलएम (दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन) अंतर्गत स्वयं-सहायता गटांना (एसएचजी) तारण-मुक्त कर्जाची मर्यादा रु. 10 लाख वरून रु. 20 लाख केली आहे.
  • डीएवाय-एनआरएलएम हा सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे ज्याद्वारे गरीब, विशेषत: महिलांसाठी सक्षम संस्था उभारणे आणि या संस्थांना आर्थिक सेवा आणि उपजीविकेची साधने उपलब्ध करून गरीबी कमी करण्यास मदत केली जाते. बचत गटांनी घेतलेल्या संपूर्ण कर्जाला सूक्ष्म उद्योग पत हमी योजने अंतर्गत संरक्षण प्राप्त होणार आहे.
  • भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने (एमओआरडी) स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजने (एसजीएसवाय) ची पुनर्रचना करून राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (एनआरएलएम) सुरू केले.
  • 29 मार्च 2016 पासून एनआरएलएम ला दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन असे नाव देण्यात आले.

 9. सिडबीने “डिजिटल प्रयास” कर्ज वितरणाचे व्यासपीठ सुरु केले

  • भारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबी) ने कमी उत्पन्न गटांतील उद्योजकांना कर्ज सुलभ करण्यासाठी ‘डिजिटल प्रयास’ या अ‍ॅप-आधारित डिजिटल-कर्ज वितरण व्यासपीठाचे अनावरण केले आहे.
  • या व्यासपीठाचा उद्देश अर्ज केल्याच्या दिवसाच्या अखेरीस कर्ज मंजूर करणे हा आहे. तसेच ई-बाइक्स आणि ई-व्हॅन खरेदीसाठी डिलिव्हरी पार्टनर्सना कर्ज देण्यासाठी सिडबीने बिगबास्केटशी करार केला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • सिडबीचे सीएमडी: एस रमण
  • सिडबीची स्थापना: 2 एप्रिल 1990
  • सिडबी मुख्यालय: लखनौ, उत्तर प्रदेश

नियुक्ती बातम्या (MPSC daily current affairs)

 10. आरबीआयने बँकिंग फसवणूक जागृती मोहिमेसाठी नीरज चोप्राची नियुक्ती केली

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) डिजिटल बँकिंग फसवणूकींपासून लोकांना सावध करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
  • या नवीन मोहिमेसाठी आरबीआयने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला सदिछादूत म्हणून नियुक्त केले आहे.

11. मोहम्मद मोखबर: इराणचे पहिले उपराष्ट्रपती

  • इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी अमेरिकेने बंदी घातलेल्या सरकारी मालकीच्या फाउंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद मोखबर यांना इराणचे हिले उपराष्ट्रपती म्हणून नामांकित केले आहे.
  • मोहम्मद मोखबर अनेक वर्षांपासून सेताद किंवा इमाम खोमेनीच्या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या फाउंडेशनचे प्रमुख आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • इराणची राजधानी: तेहरान
  • इराणचे चलन: इराणी तोमन

पुरस्कार बातम्या(Current Affairs for maharashtra exams)

 12. वन धन योजने अंतर्गत नागालँडला 7 राष्ट्रीय पुरस्कार

  • आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्या. (ट्रायफेड) च्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नागालँडला पहिल्या वन धन वार्षिक पुरस्कार 2020-21 मध्ये सात राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
  • केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांनी झूम वेबिनारद्वारे या पुरस्कारांचे वितरण केले. नागालँडला ‘बेस्ट सर्व्हे स्टेट’, ‘बेस्ट ट्रेनिंग’ आणि ‘व्हीडीव्हीकेसीची सर्वाधिक संख्या’ स्थापन करण्यासाठी प्रथम स्थान मिळाले तर ‘बेस्ट सेल्स जनरेटेड’, आणि ‘बेस्ट इनोव्हेशन अ‍ॅण्ड क्रिएटिव्हिटी’ साठी तिसरे स्थान मिळाले.
  • नागालँडला गोसबेरी वाइन (पुरवठादार: टोका बहुउद्देशीय सोसायटी लि.) आणि मशरूमची लागवड यासारख्या वस्तूंच्या नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील उत्पादन कल्पनांसाठी पुरस्कार देखील मिळाला.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • नागालँडचे मुख्यमंत्री: नेफिउ रिओ
  • नागालँडचे राज्यपाल: आर. एन. रवी.

अहवाल आणि निर्देशांक बातम्या(daily Current Affairs for mpsc)

 13. नवीन जागतिक युवा विकास निर्देशांक

  • लंडनमधील कॉमनवेल्थ सचिवालयाने जारी केलेल्या तरुणांची स्थिती मोजण्यासाठी नवीन जागतिक युवा विकास निर्देशांक 2020 मध्ये 181 देशांमध्ये भारत 122 व्या क्रमांकावर आहे. सिंगापूर प्रथम स्थानावर आहे आणि त्यानंतर स्लोव्हेनिया, नॉर्वे, माल्टा आणि डेन्मार्क यांचा क्रमांक लागतो. चाड, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, दक्षिण सुदान, अफगाणिस्तान आणि नायजर अनुक्रमे शेवटच्या स्थानावर आहेत.
  • युथ डेव्हलपमेंटच्या त्रैवार्षिक क्रमवारीत भारत, अफगाणिस्तान आणि रशियासह 2010 आणि 2018 दरम्यान निर्देशांकातील पहिल्या पाच शिक्षण आणि रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सरासरी 15.74 टक्क्यांनी वृद्धी झालेल्या देशांमध्ये आहे.
  • युवकांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य, समानता आणि समावेश, शांतता आणि सुरक्षा आणि राजकीय आणि नागरी सहभागाच्या विकासानुसार या निर्देशांकाची रचना केली जाते.
  • 2020 ग्लोबल युथ डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये असे दिसून आले आहे की 2010 ते 2018 दरम्यान जगभरातील तरुणांची स्थिती 3.1 टक्क्यांनी सुधारली आहे.

निधन बातम्या (Current Affairs for mpsc)

 14. मल्याळम अभिनेत्री सरन्या ससी यांचे निधन

  • लोकप्रिय मल्याळम चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री, सरन्या ससी यांचे कोव्हीड -19 मुळे निधन झाले आहे. तसेच त्या 2012 पासून कर्करोगाशी झुंज देत होत्या.
  • छोटा मुंबई, थालाप्पवु, बॉम्बे 12 मार्च सारखे चित्रपट आणि कूटुकरी, अवकाशिकल, हरिचंदनम, मलाखामार आणि रहस्याम सारख्या टीव्ही धारावाहिक मध्ये त्यांनी काम केले आहे.

 15. प्रसिद्ध आयुर्वेदचार्य बालाजी तांबे यांचे निधन

प्रसिद्ध आयुर्वेदचार्य बालाजी तांबे यांचे निधन
  • सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आणि आयुर्वेद डॉक्टर व योगाचे अभ्यासक डॉ बालाजी तांबे यांचे निधन झाले आहे.
  • लोणावळ्याजवळील समग्र उपचार केंद्र ‘आत्मसंतुलन गाव’ चे संस्थापक, डॉ तांबे यांनी अध्यात्म, योग आणि आयुर्वेद यावर अनेक पुस्तके लिहिली होती.
  • त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आयुर्वेद आणि योगाला प्रोत्साहन आणि लोकप्रिय करण्यासाठी समर्पित केले.

Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

11 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply