17 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download

17 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download-17 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 17 August 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

17 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 17 ऑगस्ट 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

राष्ट्रीय बातम्या(Current Affairs for mpsc in Marathi)

 1. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना

17 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करताना 100 लाख कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेची घोषणा केली.
  • प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेचा हेतू पायाभूत सुविधांच्या वाढीमध्ये एक समग्र व एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारणे आणि देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे.
  • गतिशक्ती हा आपल्या देशाच्या पायाभूत सुविधा विकासाचा एक मास्टर प्लॅन असेल जो समग्र पायाभूत सुविधांची पायाभरणी करेल आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी एक एकीकृत आणि समग्र मार्ग तयार करेल.
  • प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी, औद्योगिक उत्पादकता सुधारण्यासाठी, उत्पादन जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी, भविष्यातील आर्थिक क्षेत्र सुलभ करण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गांमधील बंधने तोडणे हे पीएम गतिशक्ती योजनेचे उद्दिष्ट आहे.

 2. 75 नवीन वंदे भारत रेल्वेगाड्या

  • 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत पुढील 75 आठवड्यांत 75 नवीन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या देशाच्या कानाकोपऱ्याला जोडतील अशी घोषणा केली. ‘आझादी का अमृत महोत्सव’ 12 मार्च 2021 पासून 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा होणार आहे.
  • वर्तमान स्थितीत भारतात दोन वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्या भारतीय रेल्वेद्वारे चालविल्या जातात. पहिली वंदे भारत एक्सप्रेस वाराणसी आणि नवी दिल्ली दरम्यान धावते तर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस कटरा आणि नवी दिल्ली दरम्यान धावते.

17 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी

 3. जगातील दुसरी सर्वात मोठी नूतनीकृत जनुक बँक

  • केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नॅशनल ब्यूरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (एनबीपीजीआर), पुसा, नवी दिल्ली येथे जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय जीन बँकेचे (जनुक पेढी) उद्घाटन केले आहे.
  • नूतनीकरण केलेले अत्याधुनिक नॅशनल जीन बँक बियाणांचा वारसा -20 अंश सेल्सिअस तापमानात सुरक्षित ठेवण्यासाठी जर्मप्लाझमची सुविधा पुरवते.
  • नॅशनल जीन बँक (राष्ट्रीय जनुक पेढी) ही भविष्यातील पिढ्यांसाठी प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (पीजीआर) च्या बिया जतन करण्याची सुविधा आहे.

 4. जेएनसीएएसआर येथे नाविन्यता आणि विकास केंद्र

  • भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च (जेएनसीएएसआर)-प्रगत वैज्ञानिक संधोधनासाठी जवाहरलाल नेहरू केंद्र; येथे एका नाविन्यता आणि विकास केंद्राचे उद्घाटन केले.
  • हे केंद्र प्रयोगशाळेतील शोधांना प्रत्यक्षात वापरून “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिभर भारत” च्या अभियांनाना पूर्ण करण्यात मदत करेल.
  • जेएनसीएएसआरची स्थापना जक्कूर, बंगलोर येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने केली आहे.

राज्य बातम्या(Current Affairs for MPSC)

 5. छत्तीसगडमध्ये 4 नवीन जिल्हे

  • छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यात चार नवीन जिल्हे आणि 18 नवीन तहसील निर्माण करण्याची घोषणा केली आहे.
  • चार नवीन जिल्हे आहेत; मोहल्ला मानपूर, सारणगड-बिलागढ, शक्ती, मनेंद्रगढ.
  • चार नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे राज्यातील प्रशासकीय जिल्ह्यांची एकूण संख्या 32 वर पोहोचली आहे.
  • या व्यतिरिक्त, प्रत्येक जिल्हा मुख्यालय आणि राज्यातील महानगरपालिकांमध्ये केवळ महिलांसाठी एक बाग विकसित केली जाईल, ज्याला “मिनीमाता उद्यान” म्हणून ओळखले जाईल. 1952 मध्ये निवडलेल्या छत्तीसगडच्या पहिल्या महिला खासदार ‘मिनीमाता’ यांच्या नावावरून या उद्यानाला नाव देण्यात आले आहे.

 6. एम्स दिल्लीच्या आवारात अग्निशामक केंद्र

  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स)-अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, नवी दिल्ली हे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी हॉस्पिटलच्या आवारात अग्निशामक केंद्र उभारणारे भारताचे पहिले हॉस्पिटल बनले आहे.
  • यासाठी एम्सने दिल्ली फायर सर्व्हिस (डीएफएस) सोबत करार केला आहे.

अर्थव्यवस्था बातम्या(MPSC daily current affairs)

 7. आरबीआयने कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला

  • भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील रायगड येथील कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे.
  • भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा परवाना अपुऱ्या भांडवलामुळे आणि कमाईच्या कमी संभाव्यतेमुळे रद्द करण्यात आला असून तसे केल्यास ठेवीदारांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती.
  • आरबीआयने सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांनाही बँक बंद करण्यासाठी आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी परीसमापाकाची (लिक्विडेटर) नियुक्ती करण्याची विनंती करण्यात आली आहे.
  • आरबीआयने कळवले आहे की 95 टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची पूर्ण रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून मिळेल.

 8. आरबीआयने राबो सहकारी बँक युए ला रु.1 कोटी दंड ठोठावला

  • नेदरलँड स्थित राबोबँक समूहाचा एक भाग असलेल्या मुंबईस्थित राबो सहकारी बँक युए ला भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग नियमन अधिनियम, 1949 च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल तसेच आरक्षित निधी हस्तांतरण’ संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
  • गेल्या वर्षी 31 मार्च रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात बँकेची पर्यवेक्षी मूल्यमापन (आयएसई) साठी केलेल्या वैधानिक तपासणी दरम्यान आरबीआय ला निर्देशांचे उल्लंघन उघडकीस आले होते.

 9. एचडीएफसीने ‘हरित आणि शाश्वत’ मुदत ठेवीचे अनावरण केले

  • एचडीएफसी बँकेने जलवायू परीवार्तानापासून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ‘हरित आणि शाश्वत मुदत ठेवी’ सुरू करण्याची घोषणा केली आहे.
  • या मुदत ठेवी हरित आणि शाश्वत गृहनिर्माण क्रेडिट सोल्यूशन्स आणि सेवांना वित्तपुरवठा करण्यासाठी निर्देशित केल्या जातील.
  • 36-120 महिन्यांच्या ठेवी कालावधीसह, रहिवासी आणि अनिवासी भारतीय दोघेही या साधनामध्ये गुंतवणूक करू शकतात ज्याचा 6.55% पर्यंत व्याज दर असेल. ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी पर्यंतच्या ठेवींवर अतिरिक्त 0.25% वार्षिक व्याज मिळेल.
  • जर या मुदत ठेवी बँकेच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे/नूतनीकरण केल्या तर 50 लाखांपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येक ग्राहकाला अतिरिक्त 0.10 % व्याजदर मिळेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • एचडीएफसी बँकेचे मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
  • *एचडीएफसी बँकेचे एमडी आणि सीईओ: शशिधर जगदीशन
  • एचडीएफसी बँकेची टॅगलाईन: आम्हाला तुमचे जग समजते

क्रीडा बातम्या(Current Affairs for mpsc)

 10. हर्षित राजा: भारताचा 69 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर

  • महाराष्ट्रातील पुण्याचा 20 वर्षीय बुद्धिबळपटू हर्षित राजा बुद्धिबळातील भारताचा 69 वा ग्रँडमास्टर बनला आहे.
  • त्याने बीएल मास्टर्स ओपन 2021 मध्ये डेनिस वॅग्नरविरुद्ध खेळ अनिर्णीत ठेवत ग्रँडमास्टर हा किताब मिळविण्याचा पराक्रम केला.
  • जागतिक बुद्धिबळ संघटना एफआयडीई द्वारे बुद्धिबळ खेळाडूंना ग्रँडमास्टर (जीएम) पदवी दिली जाते. एका बुद्धिबळपटूला मिळणारे हा सर्वोच्च किताब आहे.

पुरस्कार बातम्या(daily Current Affairs for mpsc)

 11. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शौर्य पुरस्कार प्रदान केले

  • सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर या नात्याने राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्य दिन 2021 च्या निमित्ताने सशस्त्र दल, पोलीस आणि निमलष्करी जवानांसाठी 144 शौर्य पुरस्कारांचे वितरण केले.
  • या शिवाय विविध लष्करी कार्यात महत्त्वपूर्ण योगदानासाठी लष्कराच्या 28 जवानांना विशेष उल्लेख मंजूर देखील मंजूर केले.

नियुक्ती बातम्या(Current Affairs for mpsc)

 12. वंदना कटारिया: उत्तराखंडच्या महिला व बाल विकासाच्या सदिच्छादूत

  • उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी भारतीय महिला हॉकी ऑलिम्पिक संघातील खेळाडू वंदना कटारिया यांना राज्याच्या महिला सक्षमीकरण आणि बालविकास विभागाच्या सदिच्छादूत म्हणून नियुक्त केले.
  • याआधी, धामी यांनी भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडू वंदना कटारिया यांना टोकियो ऑलिम्पिकमधील चमकदार कामगिरीसाठी 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

पुस्तके आणि लेखक बातम्या(daily Current Affairs for mpsc)

 13. जयप्रकाश नारायण यांचे जीवन आणि कार्य उलगडणारे पुस्तक

  • क्रांतिकारी नेते आणि स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्ते जयप्रकाश नारायण यांचे इतिहासकार बिमल प्रसाद आणि लेखक सुजाता प्रसाद लिखित “द ड्रीम ऑफ रिव्हॉल्यूशन: अ बायोग्राफी ऑफ जयप्रकाश नारायण” हे चरित्रात्मक पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.
  • या पुस्तकाचे प्रकाशन पेंग्विन रँडम हाऊस इंडिया ने केले आहे.

Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

चालू घडामोडी

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply