5 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 5 September 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.
5 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
5 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर :
- जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे.
- तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
- द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने हे सर्वेक्षण केलं होतं. जगभरातल्या 60 शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं.
- सुरक्षित शहरं निवडण्यासाठी 76 निकषांची पुर्तता करण्याची अट होती. यामध्ये डिजीटल, हेल्थ, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि संबंधित शहरात माणूस वैयक्तिकरित्या किती सुरक्षित आहे, या सर्व गोष्टींचा समावेश होता.
- भारताची राजधानी दिल्लीसह मुंबईचे या यादीत नाव आहे. यामध्ये दिल्ली 60 पैकी 48व्या क्रमांकावर तर मुंबई 50व्या क्रमांकावर आहे.
- दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध ही दोन शहरं आहेत.
- डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन 100 पैकी 82.4 पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.
इयत्ता नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात केली घट :
- मध्य प्रदेश बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (एमपीबीएसई) ने शैक्षणिक सत्र 2021-22 साठी इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम कमी केला आहे.
- विद्यार्थ्यांना या वर्षी देखील सुरू असलेल्या करोना लॉकडाउनमुळे शैक्षणिक उपक्रमांमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- तर हे पाहून एमपीबीएसईने इंग्रजी, हिंदी, संस्कृत, उर्दू, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञानाबरोबरच मानव्यविद्या, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच सर्व इयत्ता आणि शाखांसाठी हटवण्यात आलेल्या विषयांची यादी एमपीबीएसईच्या mpbse.nic.in. या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- अशातच आसाममध्ये माध्यमिक शिक्षण बोर्ड (एसईबीए)ने इयत्ता नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात देखील घट केलेली आहे.
- काउन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन (सीआयएससीई)ने आयसीएसई(इयत्ता दहावी) आणि आयसीएसी(इयत्ता बारावी) परीक्षांचा अभ्यासक्रम कमी केला आहे.
5 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी
‘हिटमॅन’ने ओव्हल टेस्टमध्ये रचले रेकॉर्डवर रेकॉर्ड :
- भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात सलामीवीर म्हणून 11,000 धावा पूर्ण केल्या आहेत.
- सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11,000 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.
- यात रोहितने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनचा विक्रम मोडला.
- याशिवाय रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15,000 धावा देखील पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा रोहित आठवा भारतीय आहे.
- राहुल द्रविड, सौरव गांगुली, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद अझरुद्दीन हे या यादीतील इतर भारतीय खेळाडू आहेत. रोहितने 397 डावांमध्ये 15 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत.
पॅरालिम्पिक मध्ये प्रमोद भगतला सुवर्ण, तर मनोज सरकारला कांस्यपदक :
- पुरुषांच्या SL3 प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.
- तर याच प्रकारात मनोज सरकारने जपानच्या डेसुके फुजीहाराला पराभूत करत कांस्यपदक पटकावले.
- पुरुष एकेरीच्या SL4 प्रकारात, सुहास यथिराजने सुवर्णपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे.
- प्रमोदपूर्वी भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना यांनी P4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल SH1 नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले.
- भारताच्या खात्यात आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये 17 पदके झाली आहेत.
- भारताने 4 सुवर्ण, 7 रौप्य आणि 6 कांस्यपदके जिंकली आहेत.
5 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी
पॅरालिम्पिक मध्ये मनीष नरवालला सुवर्ण तर सिंहराजची रौप्य पदकाची कमाई :
- भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज यांनी पी4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल एसएच1 नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले आहे.
- पात्रता फेरीत, सिंहराज 536 गुणांसह चौथ्या, तर मनीष नरवाल 533 गुणांसह सातव्या स्थानावर होता.
- तर या पॅरालिम्पिकमध्ये 39 वर्षीय सिंहराजला दुसरे पदक मिळाले. यापूर्वी त्याने 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.
- तसेच 19 वर्षीय नरवालने 218.2 गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केला आहे.
दिनविशेष :
- 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन तसेच आंतरराष्ट्रीय दान दिन म्हणून पाळला जातो.
- भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये झाला होता.
- भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म 5 सप्टेंबर 1895 मध्ये झाला.
- सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म 5 सप्टेंबर 1928 रोजी झाला.
- सन 1984 मध्ये एस.टी.एस. 41-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download