8 May 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा

8 May 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा

8 May 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा

प्रतिबंधक कायद्याच्या सुधारित अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

– कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीनं साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. – केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच त्याच्या मसुद्याला मान्यता दिली.  – देशात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रतिबंध करणाऱ्या आरोग्य सेवकांवर हल्ले झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर कायद्यात ही सुधारणा करण्यात आली आहे. – त्यानुसार डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर ते कर्तव्य बजावत असताना हल्ला करणं हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षेची तरतूदही सुधारणेत आहे.

कोविड-19 नमुने गोळा करण्यासाठी DRDOने विकसित केली फिरती प्रयोगशाळा

– हैद्राबादमधले ESIC रुग्णालय आणि खाजगी उद्योगांच्या संयुक्त विद्यमाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) रिसर्च सेंटर इमारत येथील संशोधकांनी एक मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी (MVRDL) विकसित केली आणि त्याला हैदराबादमध्ये तैनात केली आहे. –

6 महिन्यांचा कालावधी आवश्यक असलेल्या फिरत्या जैव-सुरक्षा श्रेणी-2 आणि श्रेणी-3 प्रयोगशाळांची स्थापना 15 दिवसांच्या विक्रमी कालवधीत पूर्ण केली गेली आहे.

▪️ठळक वैशिष्ट्ये –

या चाचणी सुविधेत दिवसाला 1000 हून अधिक नमुन्यांची चाचणी होऊ शकते ज्यामुळे कोविड-19 विरुद्धच्या लढाईत क्षमता अधिक वृद्धिंगत होणार.

– कोविड-19 ची जलदगतीने चाचणी आणि संबंधित संशोधन आणि विकास कामांना गती देणारी अशाप्रकारची ही पहिलीच फिरती सुविधा आहे.

– ही फिरती प्रयोगशाळा BSL 3 प्रयोगशाळा आणि BSL 2 प्रयोगशाळेचे संयोजन आहे जे उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करण्यासाठी WHO आणि ICMR जैव सुरक्षा मानदंडांनुसार प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे.

– या प्रणालीमध्ये विद्युत नियंत्रणे, लॅन, टेलिफोन केबलिंग आणि सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघ ‘इंग्रजी’ आणि ‘स्पॅनिश’ भाषा दिन: 23 एप्रिल

– दरवर्षी 23 एप्रिल या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘इंग्रजी भाषा दिन’ आणि ‘स्पॅनिश भाषा दिन’ पाळला जातो.

▪️पार्श्वभूमी – संयुक्त राष्ट्रसंघाची 6 भाषांना मान्यता आहे. या सहाही भाषांना समान रूपाने उपयोगात आणण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी प्रत्येकी एक दिन पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत

– ▪️अरबी (18 डिसेंबर) ▪️फ्रेंच (20 मार्च) ▪️चीनी (20 एप्रिल) ▪️इंग्रजी (23 एप्रिल) ▪️स्पॅनिश (23 एप्रिल) ▪️रशियन (6 जून)

– 23 एप्रिलला प्रसिद्ध विल्यम शेक्सपियर यांचा जन्म आणि मृत्यू झाला. तसेच प्रसिद्ध लेखक मिगुएल डी. सर्वेन्टेस यांची पुण्यतिथी आणि अनेक महान लेखकांची जयंती याच दिवशी येते.

– त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी 2010 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजनिक माहिती विभागाने भाषा दिनाची स्थापना केली.

– बहुभाषिक आणि सांस्कृतिक विविधता पाळणे तसेच संघटनेत सर्व सहा अधिकृत भाषेचा समान वापर होण्यास प्रोत्साहन देणे हा भाषा दिनाचा उद्देश आहे.

————————————————-जॉइन करा

मे 2020 महिन्यातील मधील चालू घडामोडी

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

8 May 2020 Chalu Ghadamodi PDF Download

About Prithviraj Gaikwad

Check Also

8 ऑक्टोबर : दिनविशेष

8 ऑक्टोबर : दिनविशेष-Today’s Special पहा आजचा दिनविशेष हे वर्ष विशेष ठरणार आहे कारण नव्याने …

१६ नोव्हेंबर २०२० चालू घडामोडी

१६ नोव्हेंबर २०२० चालू घडामोडी १६ नोव्हेंबर २०२० चालू घडामोडी फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड …

१७ नोव्हेंबर २०२० चालू घडामोडी

१७ नोव्हेंबर २०२० चालू घडामोडी १७ नोव्हेंबर २०२० चालू घडामोडी फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड …

Contact Us / Leave a Reply