आगकाड्या तयार करण्याची प्रक्रिया माहिती
आगकाड्या तयार करण्याची प्रक्रिया माहिती
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
कोणत्याही खरखरीत पृष्ठावर किंवा विशिष्ट प्रकारच्या पृष्ठावर घासल्यास पेट घेईल असे रासायनिक पदार्थांचे मिश्रण ज्या काडीच्या किंवा कागदी पट्ट्याच्या अथवा सुरळीच्या टोकास लाविलेले असते, तिला ‘आगकाडी’ असे म्हणतात.
लाकडावर लाकूड घासले गेल्याने वणवा लागतो असे आढळल्यावरून प्राचीन काळी यज्ञाकरिता अग्नी उत्पन्न करण्याचे अरणी-घुसळदांडू हे उपकरण प्रचारात आले असावे.
गारगोटी आणि लोखंड यांच्या घर्षणाने ठिणगी पाडण्याची युक्ती म्हणजेच चकमक त्यानंतर माहीत झाली.
या ठिणग्यांनी प्रथम कापूस पेटवीत. त्यानंतर कापसाऐवजी गंधकात बुडविलेल्या काड्या वापरात आल्या.
रासायनिक विक्रियेने विस्तव उत्पन्न करण्याच्या प्रयत्नांना एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी चालना मिळाली. पोटॅशियम क्लोरेट, साखर व डिंक यांचे मिश्रण लावलेल्या काड्या सल्फ्यूरिक अम्लात बुडविल्याने पेट घेतात, असे दिसून आल्यावर ‘तत्काळ अग्नी’ (इन्स्टंटेनियस-लाइट) या नावाची आगकाडी प्रचारात आली. तथापि ती वापरणे धोक्याचे आणि गैरसोयीचे असल्यामुळे लवकरच मागे पडली.
रासायनिक द्रव्यांच्या घर्षणाने पेटेल अशी आगकाडी १८२७ मध्ये जॉन वॉकर (इंग्लंड) यांनी बनविली. अँटिमनी सल्फाइड, पोटॅशियम क्लोरेट, डिंक किंवा स्टार्च यांच्या मिश्रणाचे गुल या काडीच्या टोकाला लाविलेले असे.
काचेची पूड लावलेल्या किंवा दुसऱ्या कोणत्याही खरखरीत पृष्ठावर ते घासले की पेट घेई. परंतु अशी काडी ओढल्यावर इतस्तत: ठिणग्या उडत आणि अपायकारक व दुर्गंधी धूर होत असे त्यामुळे ती लोकप्रिय झाली नाही.
वरील मिश्रणातील अँटिमनी सल्फाइडाऐवजी पांढरा फॉस्फरस वापरून बनविलेल्या ‘ल्युसिफर’ आगकाड्या १८३१ मध्ये निघाल्या.
आगकाड्या तयार करण्याची प्रक्रिया माहिती
परंतु पांढऱ्या फॉस्फरसाच्या संपर्कामुळे आगकाड्यांच्या कारखान्यातील कामगारांना ‘फॉसीजॉ’ नावाचा जबड्यांच्या हाडाचा रोग होतो, असे जेव्हा दिसून आले तेव्हा त्यांचे उत्पादन कायद्याने बंद करण्यात आले.
अँटोन फोन श्रोट्टे यांनी १८४५ मध्ये तांबड्या फॉस्फरसाचा शोध लावला. हा बिनविषारी असून सहजासहजी पेटत नाही त्यामुळे त्याचा उपयोग आगकाड्यांकरिता करणे शक्य झाले.
स्वीडनमध्ये लुंडस्ट्रॉम यांनी १८५५ मध्ये प्रथम सुरक्षित आगकाडी बनविली. ही काडी कोणत्याही खरखरीत पृष्ठावर घासून पेटविता येत नाही; ती पेटविण्याकरिता विशिष्ट रासायनिक मिश्रण लावलेला पृष्ठभाग लागतो. हिचे दुसरे वैशिष्ट्य हे की, तिच्यामध्ये घर्षणजन्य उष्णतेने पेट घेणारे द्रव्य (तांबडा फॉस्फरस) आणि अँटिमनी सल्फाइड व खरखरीतपणा आणणारा एखादा पदार्थ यांचे मिश्रण आगपेटीच्या अरुंद बाजूच्या पृष्ठाला लावलेले असते आणि त्या योगाने प्रज्वलित होणारी द्रव्ये काडीच्या गुलात असतात. या विभागणीमुळे या आगकाड्या पूर्वीच्या काड्यांपेक्षा जास्त सुरक्षित ठरतात.
गुलामध्ये पोटॅशियम क्लोरेट, पोटॅशिम डायक्रोमेट, मँगॅनीज डाय-ऑक्साइड, गंधक, काचेची बारीक पूड, सरस इ. द्रव्ये असतात. यांतील पहिली तीन द्रव्ये ज्वलनास आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवितात व त्यामुळे प्रथम गंधक जळू लागतो. कारण काडीच्या लाकडापेक्षा तो अधिक सुलभतेने पेटतो. त्यानंतर काडी पेट घेते. आगकाडीकरिता वापरावयाच्या काड्या अमोनियम फॉस्फेट किंवा बोरिक अम्ल यांच्या विद्रावात बुडवून नंतर सुकवितात त्यामुळे काडीची ज्योत विझविल्यावर लाकूड जळत राहत नाही.
काडीच्या एका टोकाला सु. १० मिमी. लांबीपर्यंत पॅराफीन मेणाचा पातळ थर देतात व नंतर ते टोक गुल बनविण्याच्या मिश्रणात बुडवून काढतात. पॅराफिनामुळे काडीचे ज्वलन सुलभ होते. सेव्हने व काहेन यांनी १८९८ मध्येफॉस्फरस सेस्क्विसल्फाइड वापरून घर्षक काड्या तयार केल्या.
बहुतेक सर्व देशांत आगकाड्यांचा पुरवठा पातळ लाकडी पेट्यांतून केला जातो. पेटीचे दोन भाग असतात : (१) आतील खण व (२) खणाच्या चार बाजू झाकील असे पातळ लाकडी झाकण – त्यात हा खण सरकवून बसविता येतो. झाकणाच्या दोन बाजूंना घर्षक मिश्रण लावलेले असते. काही देशांत आगकाड्या कागदाच्या केलेल्या असून त्या पुठ्ठ्याच्या पुस्तकासारख्या वेष्टनात ठेवलेल्या असतात. आगकाड्यांचे व आगपेट्यांचे इतरही अनेक प्रकार आढळतात. आगकाड्या बनविण्याच्या बहुतेक सर्व कृती यंत्राने केल्या जातात.
कच्चा माल
कच्चा माल : आगकाड्या तयार करण्यासाठी विशेष प्रकारचे लाकूड व कागद, खळ अथवा डिंक आणि आवश्यक ती रसायने यांची गरज असते.
लाकूड : हलके, मऊ व सच्छिद्र, गाठी किंवा तडे नसलेले, रचनेत सरळ व ज्याचे पातळ तक्ते निघतील असे लाकूड काड्यांकरिता लागते. काडी ओढताना ती मोडू नये इतपत कठीणपणा त्यास असावा लागतो. खण व झाकण यांकरिता लागणारे लाकूड नितळ पृष्ठाचे लागते. अशा लाकडामुळे घर्षकाचा लेप सर्वत्र सारखा देता येतो व कागद चांगला चिकटतो.
काड्या व पेट्या यांसाठी अॅस्पेन,टिलिया जॅपोनिका, सिमनॉक, कॉटनवुड, बालसम, पॉपलर, पोप्रावुड व सावर या झाडांचे लाकूड सामान्यत: वापरतात. भारतात उपलब्ध असणारे मलबार अॅस्पेन, अशोक इ. लाकडांच
सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा
इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा
इतर महत्वाच्या लिंक्स
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now