महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग 2021

महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग 2021 -Department of Land Records 2021

महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग

• महसूल व वन विभागाकडील शासन मान्यता पत्र क्रमांक: राभूअ २०१९/प्र.क्र.५५/ई-६, दिनांक २०/०७/२०२१ नुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे व उपसंचालक भूमी अभिलेख, नागपूर प्रदेश, नागपूर यांचे अधिपत्याखालील विविध कार्यालयातील खालील रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळसेवा भरतीसाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

१.भरावयाच्या पदांचा तपशील

विभाग – नागपूर विभाग

पदाचे नाव व वेतनश्रेणी – भूकरमापक तथा लिपीक,

वेतन स्तर एस-६ (रु. १९,९००-६३२०० )

२. विहित शैक्षणिक अर्हता :

उमेदवाराने अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास (दिनांक ३१/१२/२०२१) रोजी धारण केलेली असावी.

केंद्र शासनाच्या मा. महासंचालक, रोजगार व प्रशिक्षण क्र.DGE&T-१९/०६ (१)/२०१४-CD दिनांक ०४ जुलै २०१४ अन्वये औद्योगिक | प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणाऱ्या सर्वेअर अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश सत्र ऑगस्ट २०१४ पासून एक वर्ष कालावधीचा झा
लेला आहे. त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरिता अर्ज करण्यास तसेच परीक्षेस बसण्यास पात्र असतील, मात्र त्याबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पुढील आदेशानुसार त्यांचे निवडीबाबत कार्यवाही करण्यात येईल व त्याबाबत | शासनाकडील निर्णय अंतिम राहील.

आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरतीसंदर्भात संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्जकरण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, इत्यादीबाबत सविस्तर तपशीलासाठी विभागाच्या https://landrecordsrecruitment 2021.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे तसेच सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे. ऑनलाईन अर्ज वरील संकेतस्थळावर दिनांक ०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ पर्यंत स्वीकारण्यात येतील. विभागाच्या https://landrecordsrecruitment 2021.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थव्यवर प्रसिद्ध करण्यात आलेली

माहिती व जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.

ROHINI SHARAD SAGARE

सदस्य सचिव, गट क निवड समिती

मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा

About Sayli Bhokre

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक पदांची भरती Pdf Download 2021

मुंबई येथील उच्च न्यायालयाची लिपिक पदांची भरती Pdf Download 2021 – पात्रता निकष-Bombay High Court …

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट अ ते क संवर्गातील …

गट-क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१

गट-क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१-Group-D recruitment 2021 महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, …

Contact Us / Leave a Reply