सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स
सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला द्रव्य म्हणतात.
द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.
अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते.
अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर सुद्धा कायम असतो. ठराविक आकार व आकारमान असणार्याआ स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) असे म्हणतात.
ऑक्सीजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायु धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येतात.
स्थायूंमध्ये आंतररेंविय बल अतिशय प्रभावी असते.
द्रवांमधील आंतररेंविय बल मध्यम असते तर वायूंमध्ये आंतर रेंविय बल क्षीण असते.
अलीकडील काळात विज्ञानमध्ये रासायनिक पदार्थ या ऐवजी ‘पदार्थ’ हा शब्द प्रयोग करतात.
आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझिए याने मूलद्रव्याची व्याख्या मांडली.
दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनवलेल्या पदार्थ म्हणजे संयुग.
लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.
लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.
दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.
मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.
सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.
सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.
एक द्रव व एक अथवा अधिक स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला ‘निलंबन’ असे म्हणतात.
पचन विकारांवर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशिया हेही एक कलिल आहे.
Mpsc Exam Syllabus Pdf Download
All Exam Syllabus Pdf Download
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now